Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्य

2 mins
198


    मराठी माणसाच्या हक्काचं, राज्य स्थापन व्हावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाचं रान केले. त्यांच्या अथक परिश्रमातून, प्रयत्नातून मराठी माणसाची मान उंचावेल आन, बान, शान शाबूत असं स्वराज्य उभं राहिलं. स्वातंत्रोत्तर काळात द्वैभाषिक रचनेमुळे मराठी माणसावर अन्याय झाला. त्याचे हितसंबंध दुखावले गेले म्हणून पुन्हा एकदा मराठी माणूस पेटून उठला. त्यांच्यातील मावळा जागा झाला. आणि त्यातून उभा राहिला संयुक्त महाराष्ट्महाराष्ट्राचा संगर . 

    108 हुतात्म्यांच्या बलिदानातून लाखो कार्यकरत्यांच्या अथक परिश्रमातून शेवटी दिल्लीश्वरांना झाकवे लागले. आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला किंवा आपल्याला मिळाला. आज या घटनेला 73 वर्षे पूर्ण झाले. आज मराठी माणसाचं मराठी राज्य तर अस्तित्वात आहे परंतु आजही मराठी माणसावर अन्याय झाला आहे. ज्या गुर्जर भाषिक मोरारजींची हुकूमशही, दंडेलशाही मराठी माणसाने मोडून काढले. त्याच मोरारजींचे आधुनिक वंशज आज मराठी माणसाची गळचेपी करत आहेत. 

   स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राने लढा उभा केला. या चळवळीत 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, नाशिक, मराठवाडा, विदर्भ, खानदेश व अजूनही महाराष्ट्र राज्याच्या बाहेर असलेले बेळगांव, डांग, निपाणी, व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, व राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली. ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती. परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. सन 1920 साली झालेल्या नागपूरच्या काॅंग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळी भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा महात्मा गांधीनी मान्य केला होता. लोकमान्य टिळक पण भाषावार प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला विशेषतः पंडित नेहरूंना , संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यतः अमहाराष्ट्रीय होते त्यांचा मुंबई महाराष्ट्र राज्याला द्यायला कडाडून विरोध होता. सन 1946 साली माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. आणि या समितीने फार मोठा लढा उभारला त्यात पोलीसांच्या लाठीहल्ल्यात महाराष्ट्रातील 108 जणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले सर्वोच्च बलिदान दिले. मग तेव्हा कुठे मुंबई सह महाराष्ट्र स्थापन झाला. आज देशात महाराष्ट्र राज्याची मान उंचावत आहे. याचा तमाम मराठी बांधवांना सार्थ अभिमान वाटतो आहे. 

     


Rate this content
Log in