माझ्याच लोकांनी छळले
माझ्याच लोकांनी छळले
मी सर्वजण माझेच आहेत म्हणून वागत होतो.सर्वावर विश्वास ठेवत होतो.माझेच लोक स्वार्थी निघाले होते. मला मोठेपणा देऊन माझ्याच लोकांनी मला छळले तेव्हा मला नातेसंबंध कळले होते.तेव्हा मग मी हताश झालो, मनात अनेक विचार येऊ लागले.जेव्हा स्वाभिमानाने तारले होते तेव्हा विश्वास ज्यांच्यावर होता त्यांनीच मला मारले होते. चारही बाजूंनी जेव्हा संकटांनी मला घेरले होते तेव्हाच मला स्वतःचे अस्तित्व कळले होते. होतो एका ओसाड वाळवंटात विचार करत बसलो होतो पाण्याची तहान लागली होती, मिळणार नाही पाणी म्हणून मित्राने आनलेल्या ताकावर ती भागवली होती.तेव्हा कुठे हायशे वाटले होते. नसताना मजपाशी काही तेव्हा परिस्तिथीशी झुंजलो होतो. आलेल्या नैराश्यात असताना काही यशस्वी व्यक्तीसोबत बसलो होतो. त्यांच्या बोलण्यातून निघणाऱे वाक्य होते ' एकमेकांना सहाय्य करु' हे वाक्य ऐकून मला हसू आले होते. तेव्हा म्हटले तुमच्यासारख्या वाचकांनी पामरांस साथ दिली होती. असे वाटले सर्वत्र सुविचारांची पेरणी केली होती.तेव्हा "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार " हे वामण पै यांच्या पंक्ती आठवल्या. माझे पोट होते रिकामे तेव्हा जागून काढली होती संपूर्ण रात्र. तेव्हा मग सकाळ झाली, एका मित्राने एक ग्लास दूध आणले, त्यात आम्ही चौघे वाटून पिलो. तेव्हा कुठे थोडे समाधान वाटले. हे दूध पिताना आकाशात वीज चमकून गेली . तेव्हा माझ्या ज्ञानाने मला तारले होते. तेव्हा कळले की माझ्याच लोकांनी मला छळले होते.
