Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

वसतिगृहातील जीवन

वसतिगृहातील जीवन

2 mins
170


    शहर नवं, माणसं नवे आणि अनोळखी, सगळच वेगळे! घराकडची आठवण, नवे मित्र यातच पहिला आठवडा निघून जातो. नंतर मग खरी सुरुवात होते ती वसतीगृहातील जीवनाची. 

     प्रथमतः त्याचा सामना होतो रॅगिंगशी वसतीगृहाच्या सिनीयर मुलाशी ओळख तर व्हायलाच हवी. वसतिगृहात हेही भरपूर एन्जॉय केलं जातं. नंतर मग सकाळी काॅलेज साठी लवकर उठणे, अंघोळीसाठी नंबर लावणे. नवे मित्र - मैत्रिणी, नवे जग जगताना खूप मजा येते. सकाळचा मित्र-मैत्रिणीबरोबरचा चहाचा आस्वाद तर काही वेगळाच. घरी जेवणासाठी, वेगळं झोपण्यासाठी हट्ट धरणारा तो शहरात सुमार जेवण गिळतो. झोपायची मजा तर वेगळीच. " रातज्ञको बारा बजे दिन वकलता है/ " या उक्तीप्रमाणे रात्र होते जर वसतिगृहाचा रेक्टर असेल तर धम्माल. जाणूनबुजून वसतिगृहाचे नियम तोडायचे. रात्री सिनेमाला जायचं. गेट वरुन रात्री- अपरात्री उडया टाकण्याची किंवा पाईपवरुन चढून रुममध्ये शिरण्याची मजा काही वेगळीच! 

    हे सगळं जरी मस्त वाटत असले तरी वसतिगृह आपल्याला खूप काही शिकवून जाते. सकारात्मक, नकारात्मक विचारांची माणसे, जीवाला जीव देणारे, आपल्या आजारपणात आपला जीव सांभाळणारे, काळजी घेणारे मित्र इथेच भेटतात. वेगवेगळ्या भाषांचा शब्दकोष इथेच वाढतो. माणुसकीची माणसे इथेच दिसतात. 

     वसतिगृह म्हणजे एक छोटेसे जग! रुम नंबर 1 मध्ये घडलेली एक गोष्ट रुम नंबर 30 मध्ये ताबडतोब कळते. त्यातल्या त्यात त्याच्या गावाकडचे कोणी आल्यावर सज्जनतेचा आव आणून घरचे गेल्यावर त्याला कॅंटीनमध्ये कारणाने जिवलग मित्र इथेच भेटतात. इथे विविध विचारांची मते एकत्र होतात. सर्व स्तरावरच्या चर्चा होत असत. परिक्षेचा काळ तर कोजागिरी सारखाच असतो. सबमिशन रात्री जागून पूर्ण होतात. सबमिशन मध्ये अडचण आली तर " एकमेका साहय करु अवघे धरु सुपंथ " या उक्तीप्रमाणे मोठे मदतीला धावून येतात. एखाद्या विशिष्ट सरांकडे वशिला लावला जातोय. परिक्षा संपल्यावर तो घरच्या ओढीने घराकडे पळतो. परंतु आपल्या छोट्या जगात परत येण्याचे वचन देऊनच. वसतिगृहातील जीवन हे मुला - मुलींना खऱ्या अर्थाने स्वत:चं अस्तित्व निर्माण करायला मदत करते. आपले कपडे धुणे, इस्त्री करणे शिकवते. कोजागिरी च्या रात्री जागून काढणे. आपल्या मागण्यांसाठी रेक्टरला धारेवर धरणे. सारं काही मस्त असते. काळाच्या ओघात आपण कितीही पुढे गेलो तरी या आठवणी सदैव सोबत करतात. 

     आपल्या घरची परिस्थिती ही फार गरिबीची असल्यामुळे या वसतिगृहामुळे आमचे शिक्षण पूर्ण झाले, केवळ वसतिगृहामुळे. नाहीतर आम्ही गुरे चारत अडाणी राहिलो असतो....... 


Rate this content
Log in