Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

मनोरुग्ण

मनोरुग्ण

2 mins
195


सर्व मानसिक रुग्ण दवाखान्यातच नसतात, तर काही आपल्या आसपासही फिरत असताना. एक व्यक्ती अॅटोरिक्क्षा मध्ये बसून चालला होता. अॅटो ड्रायव्हर आरामात अॅटो चालवत होता. तेवढयात एक कारण पार्कींगमधून निघून रोडवर आली होती. अॅटो ड्रायव्हर ने जोराचा ब्रेक लागला होता आणि कार -अॅटो चा अपघात होता होता टळला. कार चालकाची चूक असूनही तो अॅटो ड्रायव्हर ला घालून पाडून बोलू लागला. अॅटो ड्रायव्हर कार चालकावर क्रोधित झाला नाहीनाही आणि त्यालाच साॅरी म्हणून पुढे निघून गेला.. अॅटो मध्ये बसलेल्या व्यक्तीला कार चालकावर वर्तन पाहून खूप राग आला होता तो अॅटो ड्रायव्हरला म्हणाला तू त्या कार चालकाला काही न बोलता तसेच जाऊ का दिले. त्याची चूक असूनही तो तिला वाईट बोलून गेला. आपले नशीब चांगले म्हणून वाचलो नाहीतर आता आपण दवाखान्यात असलो असतो. 

    अॅटो ड्रायव्हर म्हणाला , साहेब, काही लोक कचऱ्याचा ट्रक प्रमाणे असतात. हे लोक खूप कचरा आपल्या डोक्यात घेऊन फिरत असतात. ज्या गोष्टींची आयुष्यात काहीच गरज नाही त्या गोष्टी मेहनत करून जोडत असतात. उदाहरणार्थ क्रोध, राग घृणा, चिंता, निराशा इत्यादी. अशा लोकांच्या डोक्यात कचरा जास्त असतोअसतो आणि हे लोक आपले ओझे कमी करण्यासाठी हा कचरा इतरावर फेकत असतात. यामुळे मी अशा लोकांपासून दूरच राहतो. आणि दूरचित्रवाणी स्मितहास्य करुन त्यांना मार्गी लावतो. . कारण अशा लोकांनी फेकलेल्या कचऱ्याचा मी स्वीकार केला तर मी सुद्धा एक कचऱ्याचा ट्रक बनेल. आणि स्वत: बरोबर इतरावर ह हा कचरा फेकत असेन. 

   मला असे वाटते की, आयुष्य खूप सुंदर आहे. जे लोक आपल्याशी चांगले वागतात त्यांचे जरुर आभार मानले पाहिजे, आणि जे लोक आपल्याशी वाईट वागतात त्यांना आपण मोठ्या मनाने माफ केले पाहिजे. आपण हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजेपाहिजे की सर्व मानसिक रुग्ण दवाखान्यातच नसतात तर काही वेळेस आपल्या सभोवताली फिरत असतात. 

   शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने पेरुन टाकतो. याप्रमाणे आपण आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा घेतात. दुसरा विचार हे आहे की ज्याच्याजवळ जे आहे तेच दान देण्याचा प्रयत्न करतो. . सुखी- सुख, दु:खी- दु:ख, ज्ञानी - ज्ञान, भृमीत भृम, आणि भयभीत भय वाटत राहतो.


Rate this content
Log in