जय जवान
जय जवान
फार मोठा प्रचंड मोठ्या प्रमाणात संग्राम घडला डोगराईला. अयुबची जी इच्छा कधीच पूर्ण झाली नाही, ती लाल किल्यावर हिरवा झेंडा फडकाविणारी ’ऑपरेशन ग्रॅंड स्लम योजना डोगराईवरुन जाणार होती. ज्या ग्रॅंड ट्रेक रोड ने अमृतसर काबीज करून अयुब दिल्ली वर येणार होता. त्या रोडवर आहे डोगराई. त्याच्या बाजूला आहे इच्छोगिल कालवा आणि पलीकडे आहेत लाहोरची उपनगरे. गाव आहे सुमारे दहा हजार लोकवस्तीचे. बाजार कंपनीचा बूट-चपलांचा फार मोठा कारखाना त्या गावालगत आहे. लाहोर वाचवण्यासाठी या गावात शत्रूने प्रचंड सैनिक गोळा केली आहे. पाकिस्तान ची गाजलेली सोळावी पंजाबी पलटण येथे ठाण मांडून बसले होते व तिचे कमांडिंग अधिकारी म्हणून लेफ्टनेंट क. गोलवाला.
इकडे भारतात गाजलेल्या जाट पलटणीचे प्रमुख आहेत लेफ्टनेंट क. डेस्मंड युजिन हाईड. नाव जरा वेगळे वाटते. ते जन्माने आयरिश जरी असले तरी त्यांचा जन्म झाला आहे इंग्लंडमध्ये. परंतु ते लहानाचे मोठे झाले भारतात. भारतावरील नि:स्लॅम प्रेमामुळे त्यांनी या देशाचे नागरिकत्व तर पत्करली, परंतु देशाची सीमा रक्षण करण्याची महान जबाबदारी पार पाडली. आपल्या जाट जवानांवर त्यांचे अपार प्रेम आहे. त्यांनी जटू भाषा हे उत्तम बोलतात. या चढाई वर डोगराईला नवा इतिहास निर्माण झाला.
लेफ्टनेंट क. हाईड यांनी डोंगराच्या स्वारीचा पद्धतशीर आखणी केली. आपल्या पलटणीचे त्यांनी चार भाग केले. एका कंपनीचे प्रमुख होते मेजर आसाराम त्यागी. दुसऱ्या कंपनीचे प्रमुख होते मेजर संधू, तिसऱ्या कंपनीचे प्रमुख होते मेजर यादव, आणि चौथ्या कंपनीचे प्रमुख होते मेजर वत्सानी.
डोगराईला ठिकठिकाणी पिल बाईक्स तयार ठेवले होते. सैनिक प्रचंड, दारुगोळा भरपूर. डोगराई गाव जिंकण्याची कामगिरी जाट पलटणीकडे होती. पंजाबी प
लटण गावाबाहेरचा रस्ता रोखून थांबणार होती. सारी आखणी तयार होती. गावाच्या सुरुवातीच्या पिलबाॅक्सच्या दिशेने पहिली कंपनी जायचे होते. त्यामागील पिलबाॅक्सच्या शेताकडून तिसरी कंपनी सरकणार होती. दोन्ही पिलबाॅक्समध्ये चौथी कंपनीने घुसायचे होते. त्या मागून दुसरी कंपनी हलणार होती. पळणाऱ्या शत्रूला अडवून ठेवण्याची जबाबदारी या कंपनीवर होती. हल्ला रात्री व्हायचा होता.
नंतर लेफ्टनेंट क. हाईड डोगराई सर करण्यासाठी निघाले होते. त्यांच्याबरोबर लेफ्टनेंट जबरसिंग होते. सगळ्या कंपन्या पुढे पुढे सरकू लागल्या. मोठी जबाबदारी होती लेफ्टनेंट आसाराम त्यागीवर. जाटांनी प्रचंड रणगर्जना केली. "जय भगवान" आगीला आग भिडली. कलहकल्लोळ माजला. लेफ्टनेंट क. हाईड हुकुमावरून हुकूम देवू लागले. लढाई रंगली. दोन्ही बाजूकडून गोळीबार प्रचंड प्रमाणात सुरू झाला. त्यात लेफ्टनेंट क. जबरसिंग ठार झाले. लागलीच जबरसिंगाच्या जागी नवा लेफ्टनेंट क.बाधेर आला. त्यांनी धुवांधार गोळीबार सुरू केली. ग्न इकडील म्हणजे भारतीय लष्कराने निकराची झुंज दिली. सर्व भारतीय लेफ्टनेंट क. यांनी जीवापाड प्रयत्नाने पाकिस्तानवर मारा केला त्यात पाकिस्तानी सैनिक, लेफ्टनेंट यांचा खात्मा झाला. बाकीचे पाकिस्तानी सैनिक रणांगण सोडून पळून जाऊ लागले. भारतीय सैनिक त्यांच्या पाठलागावर होते. लेफ्टनेंट क. हाईड यांनी प्रसंगानुसार, मोक्याच्या ठिकाणी अचूक गोळीबार केला. त्यात पाकिस्तानचे अनेक लेफ्टनेंट क. ठार मारले गेले. पाकिस्तानची अवस्था फार मोठ्या प्रमाणात फसली होती.
आणि शेवटी डोगराई गाव भारतीय सैनिकांनी काबीज करून तेथे तिरंगा फडकाविला. आणि "भारत माता की जय" अशा घोषणांनी सरा गाव दणाणून गेला. आणि डोगराई गाव भारताच्या ताब्यात आला.
जय जवान जय किसान!!!!!.