Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

हरवलेल गाव पुन्हा सापडेल

हरवलेल गाव पुन्हा सापडेल

2 mins
80


जीवनात म्हणजे जगण्या मरणाच्या दरम्यान सिमारेषाच नसते. त्याच्या वाटेला भुकंप किंवा अशाच प्रकारच्या आपत्ती आल्या. ज्यात त्यांचे नातलग, सगेसोयरे, रक्ताचे नाते तन-मन-धन सर्वकाही काळाने हिसकावले.ठेवल्या फक्त क्रुर दु:खद आठवणी त्यांचे अनुभव कोणाच्याही वाटेला न येवो. हीच मनोकामना. 

    भुकंप किंवा त्याच्यासारख्या कित्येक प्रलयंकारी गोष्टीमुळे कित्येकांची गावे हरवलेली असतील. त्यांना मिळालेले नवीन गावे इतरांच्या गावासारखेच असेल. ज्वालामुखीच्या उद्रेकाकानंतर जो तप्त लावा बाहेर पडतो त्याचा संबंध हवेशी आल्यानंतर तो थंड होतो व त्याचे पाषाणात रुपांतर होते. त्याचप्रमाणे भूकंपानंतर कित्येकांचे रुपांतर माणसात किंवा राक्षसात झाले. पण हरवलेले घर, हरवलेले गाव पुन्हा उभारले जाऊ शकेल. राखेतून भरारी कशी मारायची हे त्या फिनिक्स पक्षाला जसे माहीत असेल तसेच शून्यातून विश्व उभं करण्याची जिद्द आपल्यात असायला हवी. 

    दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानला बेचिराख केले. कित्येक निरपराध माणसे मेली. काही कायमचे जायबंदी झाले. पण त्या जपान्यांना खरंच महान म्हणावी अशी मोठी कामगिरी केली. ते त्या धक्यातून सावरले आणि हो स्वत:ला हरवू न देता अजूनही त्या शहरातील त्या अवशेषांची तेथे जपणूक केली जाते. असं म्हणतात तिथे अजूनही गवत उगवत नाही. पण त्यांचे अश्रू त्या भूमीवर गवत उगवण्याची प्रयत्न करताहेत. त्यांनी दाखवून दिले या जगाला अशा धक्यातून सावरायला कसे ते. आणि तेही स्वतः च्या गावाला हरवू न देता. अशाच आठवणी समोर काहितरी करण्यास प्रवृत्त करतात. मग आपण तसे का करु नये? आपल्या पंखात तितके बळ नाही का❓दुसऱ्याचे दु:ख वाटून घेता येत नाही तरी स्वत:चे सुख तर वाटू शकतो नि. 

     जे निसर्गाने केले ते निसर्गाची क्रूर नियती म्हणावी लागेल. पण असे काहीच न होता कित्येक गावे गढताना मी पाहतोय..., 


Rate this content
Log in