काँमन मँन विरुध्द सामान्य माणुस
काँमन मँन विरुध्द सामान्य माणुस


दुनियादारीची गणितं चुकतात तेव्हा नव्याने उत्तरांची मांडणी करावी लागते. आपण दुःखात असलो की आसपासचं जग खुप आनंदी वाटतं किंबहूना एक परकं अनओळखी डोळयापुढे येवुन उभं राहतं; खर तर "जग खुप सुंदर आहे ! असे पुरावे नेहमी चर्चे दरम्यान वाट्याला येतातं. हो ! "जग खुप सुंदर आहे ! "मी जगतोय नं; मी समाधानी आहे मला नको काही वेगळं" जातीच्या बंधनानी बांधले गेलो आहोतं पण सामाजिक बांधीलकीचे काय ? आम्ही कॅन्डल मार्च काढतो , आम्ही हक्कासाठी लढत आलोय आणि लढत राहणार . सामान्य माणसांनी काही असामान्य केले की, काही समाज कंटकांचा ञास ही सहन करावा लागतो. तरी आमची जगण्याची जिद्द पक्की आहे. म्हणुन आम्ही डोंबीवली फास्ट सारखा सिनेमा पाहुन एका दिवसा पुरते कां होईना आम्ही चार्ज होतो. अचानक हिंदुत्व जागे झाले की, आॅरेंज दिसणारा रंग लगेच भगवा होतो. आम्ही सर्व धर्माचा सन्मान करतो अन् असहिष्णुता या किचकट अश्या शब्दासाठी निषेध दर्शवितो. आम्ही कर्मयोगी गाडगे बाबाला मानतो पण ग्राम स्वच्छता अभियानातं झाडू फक्त फोटो सेशनं आणि वृत्तपञातं जागा मिळविण्या इतकाचं उचलतो. आम्ही स्वतंञ बुद्धी चे माणसं अगदी साधी सरळं माणसं . जो कुणी येतो तो आम्हाला समजावून सांगण्यातचं रस घेतो माञ आम्हाला समजुन घेणारे मामाच्या पञासारखे हरवलेतं, मिळाले तर नक्की परतं पाठवा फक्त पाकीटं फोडुन प्रायव्हसीचा आवं आणण्याचे बहाणे बंद करा म्हणजे मिळवलं सरता सरता उरताही येत तर सामान्यातील लपलेला काॅमन मॅन जरा मुखवट्या बाहेर येवू द्या...