चित्र
चित्र
मोबाईल वरती रिंग जात होती... फारशी उत्कंठा नव्हती परंतु वर्कींग डे असल्या कारणाने काँल घेणे जबाबदारीचे होते...
चिन्मय अगदी साध सरळ व्यक्तीमत्व. सामान्य कुटूंबातलं, असामान्य बापाचं, एकुलतं एक पोर. वडील राजकारणात. घरात कार्यकर्ता मंडळींची गर्दी असायचीच्. लहानपणापासून राजकारण हा शब्द कानांना इतक्यांदा ऐकायला मिळाला की, घरी आलेला कोणत्या पक्षाचा असावा हे तो पहिल्या दोन वाक्यातुन ओळखून घ्यायचा.
इतक सारं असलं तरी राजकारणात भविष्यातही न येण्याची खुणगाठ मनाशी पक्की बांधलेली. आवडीच्या क्षेत्रातच करीअर कराव हा त्याचा निर्धार पक्का होता.
चित्र कलेच्या प्रेमात चिन्मय हरवून गेलेला. कागदावरती रेषा जरी ओढल्या तरी ते दर्शक चित्रासारख असायचं. याच चित्र कलेने त्याला पुढे नाव दिलं. वारसा हक्काने मिळणारं कदाचित या पेक्षा मोठं असतं, परंतू आनंद, समाधान, किंबहुना वाट्याला आलेल्या स्ट्रगल चा आस्वाद जरा निराळाच्.
फाईन आर्ट्स ला शिकत असतांना ती त्याला आवडली. तीलाही तो आवडु लागला होता, परंतु तिला नेमकं काय आवडत होतं हे कळत नव्हतं. त्याचे बोलके चित्र... कि चित्रांना रेखाटणारा तो.
भावनेच्या भरात कां होईना एक दिवस तिला प्रपोज करायला तो गेला. ती कँनव्हास वर्क करीत होती.
"मला तुझ्याशी बोलायचयं"<
/p>
"अरे! आज असं डायरेक्ट..."
" नेहमी सारखं वाक्यांना फोडणी न देता बोलतोय. हो! आता माझ्या मनाची घुसमटं होतेय. गेल्या काही दिवसात मी एकाही चित्राला पुर्णपणे न्याय देऊ शकत नाहीये."
" अरे, होतं असं कधी कधी. कामाचा व्याप वाढला की. मनही थकतं. मग नाही सुचतं काही"
"आणि मनचं हरविल असेल तर....?"
ती निशब्द झाली. तिला काय बोलावं काही कळेना. भांबावून सोडलेल्या मनस्थीतीतं ती विषय बदलू बघतं होती.
"आपण उद्या फिरायला जायचं लोणावळ्याला..?"
"सुरभी, विषय भरकटतोय. मला काय म्हणायच आहे हे कदाचित तुला कळलं असेल. माझ्या प्रष्णाचे उत्तर हवयं."
ती गंभीरतेनें हळु हळु हाँल बाहेर निघुन गेली.
आज पर्यंत तिने त्या प्रष्णाच उत्तर दिलेलं नव्हतं.
चिन्मय ने मोबाईल उचलला. काही वाक्या नंतर डोळ्यात पाणी तरारलं. तिच्या नकळतं तीच्या पासुन इतक्या वर्षापासुन लपुन ठेवलेलं तीच चित्र... चित्रप्रदर्शनी मध्ये अव्वल आलेलं होतं. तीच्या चित्राला जास्तीत जास्त बोलीवरती खरेदी करण्यात आलं होतं.
मोबाईल च्या स्क्रिनवरती आसवांचे थेंब पडत होते. स्क्रिनवरती असलेला तीचा चेहरा धुसर होत होता.