STORYMIRROR

Rahul Jagtap

Others Romance

3  

Rahul Jagtap

Others Romance

एक चहा एक काँफी

एक चहा एक काँफी

3 mins
7.7K


पुर्वी पेक्षा स्थिर झालेला शंतनु ने  समोरील टेबलाकडे बघीतलं... आँर्डर केलेल्या दोन कपाकडे बघुन... तो भुतकाळात गेला...

काँलेजच्या कट्टा... मस्तीची बेधुंद यारी... गँदरींग ते रँगींग पर्यंत सर्वच व्हायचं तिथे.. एखादी छोटेखाणी योजना आखण्याची जागा म्हणजे काँलेज कँन्टीन... खर तर महत्वाच्या मोहिमांच नियोजन शांततेत व्हायला हवं परंतू इथे आजुबाजुंनी भरलेल्या काँलेजविरांच्या गर्दीतचं त्या तयार व्हायच्या... प्राध्यापकांच्या नावाने बोंब मारुन एखाद्या विषयात फेल झाल्याच दु:ख तर नव्हतचं....

दोस्त दुनियेच्या धुंदित चालणारं आयुष्य तेव्हा ते लाईफ होतं. युवागीरी ५ व्या गिअर मध्ये पळत होती.

अश्यातच एक दिवस... गँदरींग मध्ये एक चेहरा त्याच्या गितारची तार चुकवून गेला.. एखादा बँट्समन ९९ धावांवर अचानक फुलटाँस बाँल वर आऊट व्हावा अगदी तशीच त्याची दांडी उडाली...

दुसर्‍या दिवशी पासून चालु असलेल्या सांघीक योजनांना स्वल्पविराम देऊन तो वैयक्तिक शोध मोहिमेवर निघाला... म्हणजे ती कोण, कुठल्या ब्रांन्च ला आहे.. ती कुठे राहते अश्या बर्‍याच प्रश्नाच्या उत्तर शोधात.

ती फस्ट यिअर ला होती...अशी प्राथमिक माहीती गोळा करुन त्याने... आपल्या राखीव खेळाडूंना मिशन प्रपोज चं आमिष दाखवून मोठ्या पार्टीची घोषणा सुध्दा करुन टाकली... मग काय कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन दोघांची भेट घडवून आणली...

वेळ सकाळची पहीले लेक्चरला अटेंन्ड करणे म्हणजे मुर्खपणा या सेल्फ डिफेंस तत्व प्रणाली नुसार कुणीही आज कँन्टीन ला नव्हतं... उकळता सकाळचा पहीला चहा आणि ती बस्स याच विचाराने तो फ्रेश दिसतं होता.. ठरल्या प्रमाणे ती आली.. हळुवार चालत येतांना तिला बघून शंतनु चा काँन्फीडन्स जरा लो झाल्यासारखा होतं होता.. कमीत कमी ती रागवेल कि, जास्तीत जास्त सँन्डलचा पाहुनचार करेल यातल काय होईल हा विचार सुध्दा भांगावून सोडत होता...

"तुम्हीच शंतनु सर कां !

जरा अडखडतं "हो, बस ना"

"सर, तुम्ही मला इथे कां बोलावलं अहो मी तुमच्या नोट्स परत केल्या असत्या रश्मी कडे"

नोट्स.... हा हा त्या का

ं ! नाही दिल्यात तरी चालेल परत, माझ्या कडे आहेत झेराँक्स काँपी..

सर, तुमच्या नोट्स मिन्स पुस्तकां बद्दल बोलतेय

"अच्छा ! पुस्तक कां ! ते पण असु देत..."

"सर, काय झालय काय होतयं तुम्हाला...

 

नोट्स काय पुस्तक काय... तुम्ही कम्फर्ट फिल नाही करीत आहात कां !

तिच्या येणार्‍या प्रत्येक प्रश्नाने शंतनू च्या मनातले रट्टा मारलेले प्रश्न पानगळ झाल्यागत गळत होते...

शेवटी तिने शेवटचा प्रश्न केला...

 

"सर, चहा कि काँफी...."

"नाही मला चहाचं..."

चहा आणि एक काँफी आली... तब्बल ७ मिनिटं चाललेल्या या लघु चित्रपटात शंतनु फक्त हो आणि नाही याच संवादावर टाळ्या मिळवेल अशी परिस्थीती निर्माण झाली...

कप रिकामे झालेत... आणि तीने बाय करुन संहितेला पुर्ण विराम दिला...

शंतनु व्दीधा मनस्थीतीतं होता एकटा बसुन एकटक बघत होता.. काँफीच्या कपा कडे.. आज मी तिला प्रपोज कराव म्हणुन तीला इथ बोलावलं...गेल्या ५ -७ मिनीटाच्या भेटीत मी तीला एक शब्दाने सुध्दा माझ्या मनातल्या प्रेमाबद्दल सांगू शकलो नाही.. यात माझा पराजय कि तीचा विजय...

खर तर हा पराजय विजयाचा खेळच नव्हता... माझ्या दृष्टीकोनातून ती माझ्यासाठी अल्प काळात परफेक्ट वाटली... परंतू तिच्या सरळ साध्या बोलण्याचा मी काय अर्थ लावायचा... ती जशी आहे तशीच तिला राहु द्यायचं कि पुढल्या भेटीत माझ्यातल्या हिम्मतीला रिचार्ज करुन बिनधास्त बोलून टाकू

प्रेम व्यक्त सहज करता आलं असतं तर हा प्रश्न स्वतहालाच विचारीत होता...उत्तर मात्र ती होती.. बोलू शकलो नाही याच काही काळ दुःख वाटेलही पण एक आनंद मिळेल, प्रत्येकाच्या प्रत्येक प्रसंगानुसार वागण्याच्या तर्‍हा असतात.. गैरसमज आपण करीत असतो प्रसंगाला आपल्या परीने नियोजीत करुन....

शंतनु भुतकाळाच्या पडद्या बाहेर आला... समोरच्या टेबलावरची ती आणि तीचा नवरा निघुन गेले होते... आज सुध्दा शंतनु त्या काँफीच्या कपा कडे बघत होता...

 


Rate this content
Log in