The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Rahul Jagtap

Tragedy

2.9  

Rahul Jagtap

Tragedy

वैदही

वैदही

2 mins
14.5K


दरवाजा जोरात बंद केला... पर्स रागाने सोफ्यावर भिरकवली... फ्रिज मधली थंड पाण्याची बाटली घेऊन डायनिंगच्या खुर्चीवर कोसळली... पाण्याच्या बाटलीचा गारपणाही आज तिच्या रागापुढे पाझरतं होत‍ा...

रोज आँफिसला न्यु डे - न्यु चॅलेंजचा सकारात्मक विचार करणारी वैदही आज मात्र, नकारात्मक वाटतं होती.. कामाचा वाढता ताण की, खाजगी नोकरीच्या नेहमीच्या त्या सवयी...

आज सकाळी मार्निंग वॉकला जाताना शरीरासारखचं मनाला ताज वाटत होतं.. ऑफिसच्या काही महत्त्वाच्या फाईल्स कारमध्ये टाकून वैदही कामावरती निघाली... रेड सिग्नलला ग्रीन होताना बघून होणारा आनंद हा प्रमोशन मिळण्यासारखाचं...

आज ट्रँफिक सिग्नलचा लपंडाव जरा जास्तचं लांबत होता.. कार रस्त्याच्या कडेला घेऊन पार्किंग करुन... प्रदुषणाच्या हवेतही तिला श्वास घ्यावासा वाटला... कारण बाजुलाच आईसक्रिमची छोटीसी गाडी उभी होती... तसा तिला सर्दीचा अनुवांशिक त्रास तरीही बर्फाची चव उन्हाळ्यातच नव्हे तर गुलाबी थंडीतही घेणारी वैदहीचे पाय आपोआप त्या गाडीकडे वळू लागले...

रंगबिरंगी आईस क्रिमच्या कोन्स तिला छेडीत होते... मग कसलाही विचार न करता एक आर्डर केलीच... दोन मिनिटं आयुष्याची पुरेशी असतात आनंद मिळवायला असचं असतं आईसक्रिमचं.

क्षणात तिच्या डोळ्यात पाणी तरारलं.... कॉलेजच्या दिवसांची आठवण आईसक्रिमने थंडावा देत ताजी केली...

कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना फ्रेशर्स पार्टीत खरपूस इन्ट्रो घेणारा अभि तीला पहिल्याच नजरेत प्रेमात पाडून गेला. अभि सिनिअर असल्यामुळे... नोट्स पुस्तकं मिळविणे अशा कारणांची जुळवाजुळव करुन ती त्याला गाठायची..

लायब्ररीच्या स्मशान शांततेत तिने त्याला केलेलं प्रपोजसुद्धा त्या शांततेला सुखावून गेलं.. परिस्थिती एकचं नाती उलगडण्याची खरी मजा यायला लागली..

कडाक्याच्या थंडीत लाँग ड्राईव... त्यात आईसक्रिम चघळणारी वैदही औरच होती.. मग सर्दीने डोकं पकडून बसलेल्या वैदहीला लेडीज हॉस्टेलच्या भिंतींना भेदून तिच्याकरीता विक्स आणि औषधी आणून देणारा अभिसुध्दा वैदहीचा होऊन गेला...

आईसक्रिमप्रमाणे चविष्ट गार प्रेमळ मनाला स्फुरण देणारं नातं कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला तुटलं... माणसांची ताटातुट झाली तरी ती भेटू शकतात मात्र नात्यांची ताटातुट परवडणारी नक्कीच नव्हती.... ती सुद्धा साध्या अपरिपक्व मनःस्थितीमुळे...

आज तिचं आईसक्रिम तिला खुणावत होती... सिग्नल क्लिअर होताच ऑफिसकडे सवार झाली. तिच्या टेबलावरती तिला गिफ्ट दिसलं... अगदी साधं आणि अगदी जिव्हाळ्याने रॅप केलेलं...

कुतुहलाने गिफ्ट बघण्यासाठी सरसावणारे हात थोड्याच वेळात थरथरु लागले... मनाचा ठाव लागणार नाही अशी अवस्था झालेली... त्या गिफ्ट मध्ये तब्बल ७ वर्षानंतर पुन्हा अभीने विक्स आणि आईसक्रिम पाठवलेलं होतं...

एका चिठ्ठीत लिहिलं होतं...

"गेली ७ वर्ष मी फक्त तुझा गैरसमज दुर करण्याची संधी शोधत होतो... परंतु वैदु नाती तुटली की अगदी सिलबंद आईसक्रिमसारखं होतं... नात्याप्रमाणे आईसक्रिमसुध्दा अल्पकाळ टिकणारी असते परंतु ती टिकवायची असतात आपल्याला... मनाला फ्रिज इतकचं थंड ठेवून... बुद्धीला पटण्यापलिकडचं काय असतं ते हे... तेव्हा नाती जपायला हवी अगदी मनापासुन... विश यु हॅप्पी बर्थ डे...!

भानावर आली तेव्हा डायनिंगवरची पाण्याची बाटली... वैदही अश्रू ढाळत होती.....


Rate this content
Log in

More marathi story from Rahul Jagtap

Similar marathi story from Tragedy