उगाच नको गुंतवू
उगाच नको गुंतवू
उगाच नको गुंतवू तुझ्यात आता कुठे जगायला शिकलोय मुक्तपणाने.. आधी तासानतास् बसून रहायचो किनार्यावरती तू येशील या प्रतिक्षेत एकटाच रेतीशी बोलत बसायचो.. मग समुद्राला जरा जळल्यागत होत असावं, माझं असं रेतीशी बोलणं खपत नसावं.. लाट यायची काही क्षणांपूर्वी झालेली रेतीशी मैत्री सोबत घेऊन जायची. मग मी सावरतं घ्यायचो. तू आता येशील या आशेने..
खरंतर हक्काची तू होतीस. निवांत बोलायला मनापासून मनापर्यंत पोहचविण्याचं एक स्वच्छ आणि निःस्वार्थ नात तुझ्यात शोधायचो. तू मात्र तेव्हा एकदाही वेळ पाळली नाहीस. गप गुमान येऊन समाज वर्तुळात एकटीच बसायची.. मी आग्रह केला की वैयक्तिकतेचे मला कारण ही द्यायचीस. मला कळत नव्हत मी काय बोलायच पुढे, गंभीर दमट वातावरण कसं बदलवायचं मुळात मूर्ख मीच होतो. तू नुसतीच आभासिक दिसायची मला दूरुन येताना मी लाटेच्या वेगाचा अंदाज व माझ्या भावनांची मांडणी रेतीशीच करीत असायचो. कारण तू अस्तित्वाने नव्हती कधीच आलीस.. निर्जिव रेतीलाच तू समजून तिच्याशी व्यक्त व्हायचो.. ती सुद्धा तुझ्यासारखीच अंशत: लाटेबरोबर मला निरोप न देताच निघून जायची. आता बर्यापैकी सावरलंय स्वतःला भास आभासाच्या नावे लिंबू ही उतरुन फेकलीत मी.. तुझ्या अन् रेतीच्या आठवणीसुध्दा करार करुन लाटेशी कवडीमोल विकलीत मी. घेऊन जा म्हटलं या दोघींच्या आठवणीत, नकोत मला त्यांच्या खुणाही इथे ओघळतांना पुन्हा....