End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Rahul Jagtap

Others


3  

Rahul Jagtap

Others


मृगजळ

मृगजळ

2 mins 7.5K 2 mins 7.5K

तिने खिडकीचा पर्दा बाजुला केला. डाव्या हाताने चेहर्‍यावरची केसांची बट बाजूला करत रस्त्याच्या कडेला उभा असलेला तो तिला दिसला. रोज तो याच वेळेस सिटी बस पकडतो. खांद्यावरती अाँफिस बँग...वारंवार हातातल्या घड्याळाकडे बघणे, हे सारे नित्याचेचे होते. आज मात्र त्याने बाजूला असलेल्या गजरे वाल्याकडून एक गजरा घेतला. मोगर्‍याच्या फुलांचा अलगद सुवास घेत होता. इकडे खिडकीला जरा जळल्यागत झाले.

         'मी रोज त्याला न्याहाळते. माझ्या आणि त्याच्या आँफिसच्या वेळा वेगवेगळ्या असल्यामुळे हा योग गेल्या वर्षभरापासून जुळून येतो. आज त्याने गजरा घेतला. कुणाच्या केसांत माळायला ? प्रियसी? की कुणी वेगळीच? किंबहुना बायको तर नसेल?'

     नियमित चाललेल्या नजरेच्या कवडस्यांच्या खेळात आज तिला पहिल्यांदा त्याच्यावर प्रेम झालयं अस जाणवलं. ते यापुर्वी जाणवल असेलही परंतू आजचा दिवस बहाणा ठरला.

       ती आता काय करायच या विचाराने हैराण झाली. 'खाली जाऊन त्याला सरळ सरळ विचारुनच येते. पण त्याने "तुमचा काय संबंध असा सवाल केला तर ?"' मग तिने स्वतहाचीच समजूत काढली. 'मी त्याला ओळखते ते फक्त रोज खिडकीचा पडदा बाजुला करुन. इतकीच त्याची नी माझी एकतर्फी ओळख. त्याला तर कळत सुध्दा नसेल की, कुणीतरी आपल्याकडे असं लपून छपून बघतय अाणि मनातून प्रेम  करायला लागलयं.'

त्याच्यावरच्या प्रेमाचा तो क्लास संपत आला होता. त्याची बस आली. तो बसून निघून गेला.

     दुसर्‍या दिवशी ती तळमळीने भिंतीवरच्या घड्याळाकडे आणि खिडकीच्या आडोश्याला उभी होऊन वाट बघत होती. आज मात्र त्याचे दर्शन झाले नाही. तिची चिडचिड व्हायला लागली. ती घरातल्या घरात चकरा मारायला लागली. तेवढ्यात तिची नजर वर्तमानपत्रातल्या बातमी कडे गेली. सिटी बसला जोरदार अपघात. सर्वच प्रवाशी जागेवर ठार. ती आता पुरती गोंधळली. बातमीतील ओळन ओळं वाचून काढली. तिच्या खिडकीतून ती न्याहाळायची, तो चेहरा त्या मृत्युमूखी पडलेल्या प्रवाश्यांमध्ये होता.

       अवचित तिच्या डोऴ्यातील आसूंनी आकांत केला. पाणावलेले डोळ्यासकटं ती धावत खिडकी जवळ गेली. मृगजळा सारखं तिला तो पुन्हा घड्याळाकडे बघतांना दिसतं होता.हवे बरोबर कधी न उडणारे पडदे बंद होऊ पाहतं होते.

 


Rate this content
Log in