Rahul Jagtap

Inspirational

3  

Rahul Jagtap

Inspirational

सोनं

सोनं

1 min
8.6K


मला काल वरच्या मजल्या वर ठेवलेल्या जुन्या लाकडी कपाटात सोनं सापडलं....मग काय सार्‍या गावात चर्चा. ही घटना वार्‍यासारखी आलीशान बंगल्या पासुन तर गवताच्या झोपडी पर्यंत पोहचली...पुरुष मंडळी पेक्षा स्री वर्ग जरा जास्तच हौसेने माझ्या घराकडे येऊ लागल्या... किती आहे... हंड्डा आहे कि संदुक... तर कुणी बिस्किट आहे कां ,कि माळा आहेत.. अश्या वेगवेगळ्या सुरात घराचा पुर्ण संगीत महल करुन टाकला होता... आईला कळतं नव्हते यांना काय सांगायच अन काय नाही... मग मीच बाहेर आलो... सर्वाच्या नजरा विलक्षण झाल्या होत्या.... जसा कुणी गावात कलेक्टर यावा किंवा हिरो... मग आमचे नानी काकु म्हणाल्या... बाबु दाखव नं असं लपुन कायले ठ्युन रायला.. आमाले पाऊ दे सोनं... मी हळुच पाठी मागुन माझी ५ वी तली मराठी भाषेची वही काढली... हे बघा सोनं... सर्वांनी नाक मुरडली.. बायांनी जरा जास्तचं... एक एक बाई घराकडे जाऊ लागली... काल एक कळलं माझ्यासाठी माझी वहीच सोनं होती पण ज्यांना सोन्याच्या दर्शनाची आस होती ती मला विचित्र वाटायला लागली होती.... जपुन ठेवलेलं किंवा जपुन असलेलं' राहीलेलं खर सोनं ते असतं पुस्तक, वही....जे कधीच चोरलं जात नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational