Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

काळ्या ढगातील सोनेरी कड

काळ्या ढगातील सोनेरी कड

2 mins
181


    आयुष्य म्हणजे सुखदुःखांचा मिलाप. कधी चांदणगालिचा, तर कधी कंटकांची दाटी!!काव्यामधे वापरुन गुळगुळीत झालेले शब्द.प्रत्यक्षात सुख असते तेव्हा आपण आनंदात दंग असतो. आपल्याच नादात आपण असल्याने ,आपली नजर इतरांवर जातच नाही. सुखाचे क्षण हलकेच निघून जातात. लग्नानंतरचे पहिले वर्ष!! कसे भुर्रकन उडाले ते दिवस असे वाटते. सुख पहाता जवापाडे , दुःख पर्वताएवढे ही मानवाची मानसिकताच आहे.


   सध्या कोरोनाचा सुळसुळाट आहे. तो बाहेर असतो ,तेव्हा धीर धरी रे धीरापोटी असे मनाला समजावणे सोपे असते पण एकदा का उंबरा ओलांडून तो आपल्या घरात आला , की त्याचे अक्राळविक्राळ स्वरुप समजते. माझ्या घरात सूनेला आणि मिस्टरांना कोरोना पॉझीटीव्ह निघाल्याने आम्ही सगळेच हादरलो. सून निदान तरुण तरी ,पण माझे मिस्टर दोन अँजिओप्लास्टी झालेले वय वर्षे ६८.पण सर्वांनी मानसिक धीर दिला. वहिनी बहिणीने काही न सांगताच भला मोठा खाऊ , तयार पीठे पाठवली. मला त्रास नको म्हणून मुलाने डबा लावला. दोघांचे लक्ष मला त्रास पडू नये ह्यावरच!!


पायी चालणाऱ्याने खुरडत चालणाऱ्याकडे बघावे ह्या म्हणीचा खरा अर्थ समजला. काही लोकांचे नातेवाईक हाँस्पिटलमधे आणि घरचे क्वारंटाईन त्यांच्यासाठी ही लढत किती शर्थीची असेल हे समजले. त्यातच स्टोरीमिररचे Author of the year ची winner trophy घरपोच आली. फोनला हात लावायलाही वेळ व्हायचा नाही. असे सरप्राइझ मिळाल्याने मी आणि सगळेच घरातले आनंदले.घरातले वातावरणच बदलले.छोट्या अनुरागनेही ततड ततड करुन आनंद व्यक्त केला.


  Every cloud has silver lining. अगदी खरे आहे. जे कोरोनाच्या प्रचंड काळ्याकुट्ट बोगद्यातून बाहेर आले आहेत, त्यांनाच सुखी घरकुलाचे महत्त्व कळते. आता सर्वांसाठी शेवटी एकच प्रार्थना. 

सर्वेपि सुखिनःसन्तु

सर्वे सन्तु निरामयाः

सर्वे भद्राणि पश्यन्तु

मा कश्चित् दुःखमाप्नुयात्


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract