काळ, काम आणि वेग
काळ, काम आणि वेग
लहानपणी शाळेत असताना गणितात एक धडा होता.
काळ, काम आणि वेग...
ही गणितं सोडवताना फार तारांबळ उडायची माझी.बाई म्हणायच्या, "तुला कशी गं जमत नाहीत ही गणितं? "शाळा..कॉलेज...संपलंसंसार नीट मार्गी लागला. रोजच्या दगदगीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात वेळ वाऱ्यावर स्वार होऊन पळू लागला. आजही मी काळ, काम आणि वेगाचचं गणित सोडवते आहे.
आणि तारांबळही अजूनही तशीच.......