STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Abstract Inspirational Others

4  

Anjali Bhalshankar

Abstract Inspirational Others

काॅमरेड

काॅमरेड

5 mins
232

अण्णा! आज मैने च्या जागी आम्ही आहोत जीवाची आजही काहीली होत आहे.आजही पावलोपावली बंड करावे लागत आहेत.लढलयाशिवाय हक्क मिळत नाहीत.अण्णा आम्ही दलित आजही अस्वस्थ निराश आहोत मात्र शांत नाहीत तुम्ही हाती घेतलेला लाल बावटा असंघटित असुरक्षित कष्ट करयांना आजही मार्गदर्शन करतोय.हक्कासाठी लढण्याची प्रेरणा देतोय 1958 सालच्या बाँबे साहीत्य संमेलनातील भाषणात "पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर दलित कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे."तुम्ही चेतविलेलया मशालीने कामगार शब्दाचा आवाका काही प्रमाणात बदलला आहे मुंबई पुण्यातील घरकाम करणारे ,कागद कचरा वेचनारे व चौकाचौकांत ठिय्या मांडून बसलेला मजुरच,नाही तर गाविगावातले शेतमजुर बारा बलुतेदार भटक्या विमुक्तांपर्यंत एकीचा एल्गार पोहोचला आहे. आपल्या हक्कासाठी साऱ्या देशात नवे वारे संचारत आहे अशा वेळी तुम्ही हयात असता तर ""जग बदल घालुनी घाव,सांगून गेले आम्हा भीमराव"" या ओळीं खर्या अर्थाने सार्थ होत आहेत, याचा तुम्हाला अभिमानच वाटला असता. हे जग दलित व श्रमिकांशिवाय अपूर्ण आहे हे सांगून तुम्ही प्रस्थापितांना झिडकारले.कष्ट करणारे हातच पृथ्वीचे व विश्वाचे निर्माते असल्याचा असल्याचे ठामपणे दावा करणारे अण्णाभाऊ साठे उर्फ तुकाराम भाऊराव साठे यांचा आज जन्मदिन.काॅ.लोकशाहीर,लोककवी,मार्क्सवादी, सुधारक, साहित्यिक लेखक, कार्यकर्ते व भारताचा मॅकसिम गाॅरकी अशी उपाधी लाभलेले,अण्णाभाऊंनी पुढे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक प्रकारचे लिखाण केले. दलित मातंग समाजातील श्रद्धास्थान म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय!! सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर आधारित असलेले लेखन अण्णाभाऊंनी केले.खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ दलित साहित्यांचे संस्थापक होते. सांगली जिल्ह्यात, वाळवा तालुक्यातील वाटेगाव या छोट्याशा गावी वडील भाऊराव आणि आई वालुबाई यांच्या पोटी अत्यंत हलाखीच्या कुटुंबात जन्मलेल्या अण्णाभाऊंना शाळेत तर घातले मात्र ते केवळ दीड दिवसच, शाळेत गेले कारण तेथील सुवर्णांकडून होणाऱ्या भेदभावाला कंटाळून शाळेत जायचे त्यांनी बंद केले.पुढे मुंबईत आल्यावर राजकारणात सुरुवातीला अण्णाभाऊ साठे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, यांच्या कम्युनिस्ट विचाराने प्रभावित झाले होते 1944 मध्ये दत्ता गव्हाणकर शाहीर अमर शेख यांच्यासोबत लाल बावटा कलापथक त्यांनी स्थापन केले.अनेक सरकारी निर्णयांना आव्हान देऊन,स्वातंत्र हे स्वातंत्र नसुन केवळ सत्तांतर आहे.अशी भूमिका त्यांनी घेतली भारतीय बहुजणांमधये जागृती करून,"" यह आजादी झुठी है,देवकी जनता भूकी है असा नारा देऊन 16/8/1947रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढला प्रचंड पाऊस असताना वीस हजार लोक हातात मशाली घेऊन अण्णाभाऊ व शाहीर अमर शेख यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात सामील झाले स्वातंत्र्यानंतरचे उच्चवर्णीय शासन त्यांना मान्य नव्हते. इंडियन पीपल्स, असोसिएशन मध्येही ते महत्त्वपूर्ण व्यक्ती होते.भारतीय कम्युनिस्ट पक्षाची ती एक शाखा होती.संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मराठी भाषिक बॉम्बे राज्य निर्माण करण्याची मागणी त्या संस्थेतर्फे केली गेली होती.यानंतर अण्णाभाऊंवर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा प्रभाव पडला आंबेडकरांच्या शिकवणुकीतून अनुसरून दलित कामगार, कार्याकडे वळले .आले दलित कामगारांच्या जीवनावरील अनुभव प्रकट करताना कथांचा वापर केला.त्यांनी गणेश पुजा नाकारत करांची म्हणजेच हाताची पूजा करण्याचा विचार मांडणारे अण्णाभाऊ खर्या अर्थाने बुद्धिजीवी ठरतात.मार्क्सवादी विद्यालयातून श्रमाचे, संस्कार क्रांतीची मुल्य कष्ट हक्क व स्वातंत्र, स्वाभिमान समजुनघेतलेल्याअण्णांनी आपली लेखणी क्रांतीकारी विचारांच्या प्रसारासाठी झिजवली.साहित्य संमेलनातील विद्रोही भाषणात त्यांनी जागतिक संरचनामध्ये दलित कामगार वर्गाचे महत्व किती मोलाचे आहे ते स्पष्ट केले.दलित लेखकांवर,कामगार कष्टकऱ्यांना, संघटित,हिंदू अत्याचारापासून मुक्त करण्याची आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आली आहे.असेही ठणकावून सांगितले. दीर्घकालीन पारंपारिक श्रद्धा परंपरा नष्ट होऊ शकत नाहीत परंतु लेखकांनी आपल्या लेखणीतून समाज उद्धाराचे कार्य करायला हवे असेही अण्णाभाऊंनी स्पष्ट केले.अण्णाभाऊनी लिहीलेली मुंबईची लावणी अण्णाभाऊंचा वैचारिक उच्च दृष्टीकोन दाखवून देते एकुन 35 पैकी फकीरासारखया ऐतिहासिक कादंबरीला सन. 1969 मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. त्याबरोबरच 15 लघुकथा संग्रह ज्या बऱ्याच भारतीय भाषांमध्ये रूपांतरित झाल्या नाटके रशियातील भटकंती 12 पटकथा मराठी पोवाडे व गाणी असे विविध लिखाण त्यांनी केले पोवाडा लावणी व वगनाटय लोककथात्मक शैलीचा वापर अशा विविध सामाजिक, ऐतिहासिक राजकीय व दलित जीवनावर आधारीत कथा,कलात्मक विनोदी कथा,शोकांत व हदयदावक कथा,आत्मचरित्र पर कथन,गुन्हेगारी जीवनाचे कथन करणारे लेखन,अंधश्रद्धा विरूद्ध च्या कथा, प्रेमकथा व कुटुंब कथा अशा विविधांगी लेखकाने परिपूर्ण लेखणी होती अण्णाभाऊंची लेखन काव्यातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले. काव्य व पोवाड्यातून त्यांनी जनजागृतीचे अफाट कार्य केले.अद्वितीय अतुलनीय अशी फकीरा ही कादंबरी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. फकिरा या कादंबरीमध्ये आपल्या समुदायाला दैन्य, दुःख व भूकबळी यापासून वाचवण्यासाठी नायकाने इंग्रज सरकारविरुद्ध केलेले बंड विद्रोह अतिशय प्रभावीपणे मांडले आहे.फकीरा अण्णाभाऊंच्या गावचा व नात्यातला होता.वारणेच्या लाल मातीत फकीरा जन्मला, अण्णाभाऊनी फकीरा आपले आयुष्य ओतले.आपल्या आप्त स्वकीयाना भूकेने तडफडताना पाहुन विचलीत झालेला फकीरा इंग्रजाची संपत्ती लुटुन आणतो बंड करतो पुढे फकीराला इंग्रज सरकारने पकडून अटक करून आतोनात छळ करून फासावर चढवले हे सारे वाचताना डोळे भरून येतात आपसूकच वाहू लागतात.साहित्य क्षेत्रात एका झुंजार क्रांतीकारक खऱ्याखुऱ्या पात्राने वास्तववादी हजेरी लावली आहे.साठेंचे जीवन मुंबईमध्ये व्यतित झाल्याने शहरी पर्यावरणाने त्यांच्या लेखणीवर लक्षणीय प्रभाव टाकला . मुंबईची लावणी व मुंबईची गिरणी कामगार त्यांचा छळ करणारी दुष्ट, अव्यवहारी, शोषणकारी, अन्यायपूर्ण, अशी मुंबई आहे हे म्हणले अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर अनेक विद्यार्थी,संशोधन करतात अनेक लेखकांनी समीक्षापर पुस्तके लिहुन ऊदा: अण्णाभाऊ साठें याचे विचारधन (विठ्ठल साठे) अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा वर समीक्षा ((डॉक्टर श्रीपाल सबनीस)) अण्णाभाऊ साठे(( हिंदी प्राध्यापक रतनलाल सोनगरा)) क्रांतिकारी अण्णाभाऊ साठे (प्राध्यापक गौतम निकम ) यासारख्या अनेक दिग्गज लेखकानी व समीक्षा व लेखन व अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास केला आहे.अण्णाभाऊ च्या या अलौकिक कार्यामुळे ते शोषित,पिढीत, दलित,मातंग समाजाचे श्रद्धास्थानाचे प्रतीक बनले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ची स्थापना 1985 मध्ये मातंग समाजाच्या कल्याणासाठी उभारली गेली.सन 2001 भारतीय पोस्टपाल खात्याने चार रुपयाच्या तिकिटावर अण्णाभाऊ साठेंचे चित्र ठेवले साठेंच्या जन्मशताब्दी वर्ष 2019 पोस्ट टपाल तिकीट वितरण केले. ""जगाच्या साहित्य क्षेत्रात रिचर्ड अॅटनबरोने,गांधी निर्माण केला. आता कोणीतरी इंग्रजीत फकीरा निर्माण करायला हवा तर ज्युलियस सीझर स्पार्टकस,लिक्स स्पॉटलिक्स पोर्टल स्पार्टाकस, रॉबिन हूड,सॅमसंग,च्या तोडीचा नायक ऊभा राहील असे मी एके ठीकाणी वाचले होते.""""लाल झेडा घेऊन हाती,करायला इथे क्रांती. मजुरांची पिढी नवी पाऊल टाकती अण्णाभाऊ साठे म्हणे बदलून हे दूबळे जीणे होणार जे विजयी ते रण करती """"अशी साद घालून कष्टकऱ्यांच्या चळवळीविषयी दुर्दम्य आशावाद व्यक्त करणार्या व दूबळे जीणे बदलण्याची हाक देणाऱ्या व ""जग बदलून टाक घालूनी घाव सांगून गेले भीमराव """अशी साद घालणाऱ्या अण्णाभाऊ अर्थात तुकाराम भाऊराव साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract