झाले मोकळे आकाश
झाले मोकळे आकाश


#महिला दिनाच्या निमित्ताने!...
"निर्भयाच्या आरोपीच्या फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती"ही बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून दूरदर्शन वर झळकत होती.न्यायदेवता खरच आंधळीअसते यांचा प्रत्यंतर पून्नच्छ आला.
तिने स्वतःहाला आधीच बंदिस्त करून घेतले होते. कोणातही मिसळत नव्हती. घराच्या भिंतींनाही बोलायला लावणारी आज ओठांनाही चिकटपट्टी लावून बसलेली. आई काळजीत; लेकीची अवस्था तिला पाहवत नव्हती. तिच्या जिवाशी खेळ खेळणारे मात्र आपल्या विश्वात मश्गुल होते. बिनधास्त जामिनावर सुटून मजा लूटत होते. हिने मात्र स्वतःला पिंजऱ्यात बंद करून घेतले होते. लेकीची अवस्था आई पाहू शकत नव्हती, रोज ती पण कणाकणाने खचत होती. येणारे जाणारे दोन शब्द बोलून फक्त सांत्वन करत होते. मदतीचा हात मात्र अखडता घेत होते. समाजाच्या नजरा पण बदलत होत्या. रोज नवीन मरण तिचा पाठपुरावा करत होते. बापाचं छत्र तर परमेश्वराने आधीच हिरावून घेतलं होते. सौंदर्याचा खजिना ओटीत घालून देवानं मात्र तिला जणू काही शापच दिला होता. लेकीची ही अवस्था आईचं काळीज जाळत होती. शेवटी आईनेच मनावर दगड ठेवला, 20 वर्षे फुलवलेला संसार लुगड्याच्या पदरात गुंडाळला आणि लेकीचा हात ठाम विश्वासाने पकडला.
कोनाड्यात पडलेले कुलूप उचलले, एकदा घरावर नजर फिरवली व आजूबाजूच्या आठवणींसहित घरालाही कुलूप लावले. लेकीला घेऊन बाहेर पडली तिला आता फक्त परिचित जागेच्या आठवणी मिटवायचा होत्या. वाट नवीन शोधायची होती. आत्महत्येसारखं भ्याड कृत्य ती करणार नव्हती नि मुलीला पण करू देणार नव्हतीच मुळी! आणि मग तिने मनाला ठाम बजावले रडायचं नाही, आपले अश्रू दुबळे नाहीत, ठरवले तर क्षणात ह्या जगाचा प्रलय करू आपण शकतो. फक्त आठवणीच्या मायाजालापासून मैलोनमैल दुर तिला लेकीला न्यायचं होत. तिचा बंदिस्त पिंजरा उघडून तिच्या पंखात जोमाने बळ आणायचे होतं.
ती आई नावाची रणरागिनी निघाली होती. वेगळ्याच कामगिरीवर, स्वतःच सुप्रीम कोर्ट होऊन आरोपींना शिक्षा द्यायला. लेकीला न्याय आता ती देणार होती. आता तिला ना समाजाची पर्वा होती ना न्यायालयाची आस? फक्त तिला न्यायदेवतेच्या डोळ्यावरची झापडं उघडायची होती. अपराधी हा अपराधीच! मग वय नावाचं लेबल तिला मान्य नव्हते. वयाचा विचार कृत्य करताना कुठे गेला? शारीरिक भूक वय लहान होते तर त्यांना लागलीच कशी? आज ती न्यायदेवतेच्या पुढे झुकणार नव्हती, शेवटी ती आई होती. स्वत:च बंदिस्त पिंजर्यातून बाहेर पडून मोकळे आकाश, शोधायला लेकीच्या पंखात बळ देणारी रणरागिनी. एक निश्कंलकित बलात्कारीत निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी ठामपणे उभी राहिलेली एक सबला. दोषींचा संहार करायला निघालेली चंडिका!..