STORYMIRROR

Ujwala Rahane

Comedy

3.5  

Ujwala Rahane

Comedy

तू, तू, मै, मै

तू, तू, मै, मै

5 mins
42


 तुमचं नेहमीच,मी आहे म्हणुन तुमचा संसार झाला हो! माझ्या जागी दुसरी आसती तर केव्हाच पळून गेली असती हो!...


 जळलं मेलं लक्षण कौतुक म्हणून नाही कशाचं. दिवसभर राब राब राबायचे, रांधा वाढा उष्टे काढा फक्त नि फक्त.! ताड, ताड सुधा बोलत होती. भांड्यांची आदळआपट, डोळ्यातून गंगा यमूना वेगळ्याच.


 श्रीकांतचा पण पारा चढला; हो हो बरोबर मी नव्हतो आलो तुझ्या मागे, तुझं बाबा आले होते मला विचारायला. माझ्या बाबांनाआणू नका हो मध्ये परत सांगते. मग नकार द्यायचा ना? का फसवलतं ? 


 आम्ही नाही तुम्ही फसवलं. आसे भन्नाट वादळ सुधा, श्रीकांतच्या संसारात मधून मधून यायचं. पण इतरांना मस्त मजा… मुलांनी तर त्यांना टोपणनाव नांव दिले होतं 'टाॅम न् जेरी'!…

आशी 'टॉम अन् जेरी' ची जोडी घरोघरी बोलत नाही तीचं बरी.!


  लग्नाला 25 वर्ष झाली लव्ह कम् अरेंज्डच वादळ शिक्कामोर्तब करून एकमेकांच्या घरात घूसले. एकतर्फीच प्रेम श्रीकांतच भाळला टॉमबाॅय वर. तसा सुधाला पण तो आवडायचा पण सगळ पण नि परंतु अशी तिची गत.सुधाचे बाबा नव्या विचारांचे लेकिची तगमग ओळखून होते. मुलगा होतकरू घरंदाज घराणे हेरून श्रीकांतच्या घरीच पोंहचले ते ऐकदिवशी.


 श्रीकांतचा पण मासा गळाला लागला होता.सगळे कसं कळत नकळत हाताशी आले. शुभमंगल झाले. राजाराणी मस्त दोन्हीही घरांचा दोघांवरही वरदहस्त. मग काय प्रेम फुलत होते, बहरत होते. हळूच प्रेमाला अंकूर फुटला मातृत्वाची चाहूल. 


 मग सुधा पण कळत नकळत संसारात गुरफटली गेली. सगळ्यांचे हावे नको बघण्यात आपण कोण होतो व काय झालो हेच ती विसरली.


 बघता बघता 25वर्षाचा प्रवास 'तु, तु मै मै' तच पार केला.हे सगळं चित्र तीच्या समोर फेर धरून नाचतअसतानाच,श्रीकांत ओरडला !आज काय फक्त सगळा इतिहास, भुगोलच उगाळणार कि काय? काही पोटापाण्याचे बघणार आमच्या कि, बाहेरून मा ssss! मागवू आ शब्द पुर्ण व्हायच्या आतच इति संध्या उवाच! हो! मागवा, मागवा बघू किती दिवस मागवातायं ? 


 पाहतेच सारख आपल्या धमक्या, नि धमक्या! बर मग मागवतो पण ते तुझं काय ते आवडीचं?ते पण मागवू का?काही नको हं मला! हो ना परत आम्ही बसलो खायला कि, म्हणशील मला विचारले पण नाही. इति श्रीकांत.! 


 आज मी दिवसभर बाहेर जाते कशी. करा तुमचे तुम्ही.जा, जा पण मोबईल घेऊन जा बर.! मला नको काही तो मोबईल.अग तुझ्यासाठी काय ते लिखाण वगैरे करतेस त्यासाठी म्हणतो. हो, हो आले परत माझ्या लिखाणावर! लिहा ना तुम्ही दोन शब्द बघू जमतंय का ते?अग तू सुधा प्रत्येक गोष्टीत चुकीचा अर्थ लावतेस? हो मला सवयच लागली ना चुका शोधायची. मग काय?तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही. बाहेरच जातो. हो जा,जा!


  आता बहिणीकडे जा मग जेऊनच या ! बघू देते का ती जेवायला ? सांगा जाऊन तीला मी कशी वागते ते. नशीब माझं ती नणंद पण जवळच. तीला आपल्यात गोवू नकोस सुधा तीने काय बिघवडले ग तुझं? वा मार पुळका आहे हो तीचा?

हो आहे! काय करणारेस बोल? काही नाही हो! लग्न तुमच्याशी केल तेच पुष्कळ पावलं. जा मग सोडून! हो, हो जाईन पण अशी बरी जाईन? कटकट सारखी क्षणभर शांतता नाही. हो मी कटकट करते ना? एकाच हाताने टाळी वाजते का? 


 बस्स बाई आता सरक बाजूला चहा करू दे मला. बघा आता माझ्

या हातचा चहा पण नको आता तुम्हाला ! कशाला राहयचे आता मी?माहेरीच जाते.


आता कशाला माहेरी? अज्ञातवासात जाणार होतीस ना? बघा बघा वाक्य न् वाक्य लक्षात ठेवता हो! अग या वयात उगाच त्या आईबाबांना कशाला त्रास? हो मी त्रास देते नी तुम्ही काय करता?मी माझ्या आई वडिलांची काळजी घेतो.


 बघा बघा आरशात तोंड काळजी घेणारे, तरी बरयं आईबाबांच्या तोंडात सतत सुधा, सुधाच असते. तुझ्या आईबाबांच्या तोंडात श्रीकांत,श्रीकांत मग झालं तर. हो का काय दिवे लावता हो माझ्या आईबाबांचे करून? त्यांची इंगळी सांभाळतोय ना मग काय! कोणाला इंगळी म्हणता हो? तुम्ही विंचू आहात विंचू, डंख असा मारता कि आग नसानसात भिडते. हो ना मग हि इंगळी नाचायला लागते बरोबर? 


 अग तुझं तोंड आहे तरी कशाचं? खापराचं असतं तर येव्हांना फूटून गेलं असतं ग! हो ना साधू महाशय तुम्ही एकच शब्द बोलता मला दहा बोलायला भाग पाडता. पी थोडा चहा पी साखर बघ घालू का अजून? आरेच्चा आलं घालायच विसरलो डोकं दुखत असेल ना? पण डोकं आसेल तर दुखेल ना! 


 हो का काय म्हणालात डोकं नाही मला! एक कपभर मेला तो चहा केला तर दहा वाक्य जोडलीत हो त्याला! साखर ना पाखर नुसता तो पांचट. 


 म्हणूनच आई म्हणतात, सुधे तुच कर ग बाई चहा तुझ्या हातचा सकाळचा चहा प्यायला कि, दिवसभर नाही मिळाला तरी चालतो हो! हो का!स्वतःहाचेच दिवे ओवाळा काय करणार बिच्चारी मि नसतो ना घरी मग जमवून घ्यावं लागतं. 


 काय बोललात जमवून घ्यावं लागतं? मग तुमच्या बहिणाबाई कडे सोडत जा आॅफिसला जाताना आईबाबांना. येताना घेऊन येत जा म्हणजे चांगले गुळपीठ एक होईल हो!जाऊ दे तुझ्या तोंडी लागणच नको, फक्कड नाष्टा करून येतो बाहेर जाऊन.


  हो जा जा करून या नाष्टा माझं मेलं चुकलच, उगाचंच सकाळी कुकर लावलं बटाटे उकडायला.कणिक हि भिजवलेली. खजूर, चिंचेची चटणी पण केली. उगाच सगळी मेहनत केली. सुट्टी होती ना तुम्हाला म्हणलं करावं आवडीचं.


 नशीब फुटकच् कधी मी ठरवलं ते झाले आसं घडते का कधी?हो मी कारणीभूत आहे या सगळ्यांला? का तुच उकरून काढतेस सगळे? कितीदा सांगितले एकटी नको करू सगळे, वाटून दे सगळ्यांना काम, पण नाही तुलाच सगळ करायचे. मग चीडचीड होणारच ना? पण ऐकशील तर तू माझी बायको कसली? आता हे काय मग कोणाची आहे? परत परत आगीत तेल ओतू नका समजले !…


 अग हो तेच तर म्हणतोय तूच माझी शाहणी राणी, तुझ्याशिवाय माझे दुसरं नाही ग कोणी! या चार दिवसात थोडी तुझी चिडचिड होते मला माहीत आहे, म्हणून मी जपतो शांत बसतो तर तु वेगळा अर्थ घेऊन चिडतेस! चल आता Ohk ना सगळे राहू दे, असू दे, पसारा काही बिघडत नाही. मी आवरतो चहा घे फक्कड आहे. बघ तो कोपऱ्यात ब्रेड चा पूडा वाट पहातोय तुझी. चल आणि आज फक्त आराम नि आराम झोॅमॅटो वरून आॉर्डर करतीय प्राची. आज्जी आजोबांना पण आज झोॅमॅटो क्या चीज है हे अनुभवायचे. होना आईबाबा !… 


खरच हि सुधा श्रीकांतची जोडी घराघरात,घराघरात हा शिजणारा पदार्थ! मालमसाला थोडा वेगवेगळा, प्रत्येक हाताची चव वेगळी हो.! पण करण्याची पध्दत बहुतेक सारखीच.


 तुमचा अनुभव कसा आहे? कळवायला विसरू नका! आमचे बापडं आसचं हो! 'सुधा श्रीकांत' 'तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना!' तुम्ही काय म्हणताय?


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy