प्रिय मराठी
प्रिय मराठी
मराठी दिनाच्या निमित्ताने मनातले
प्रिय मराठी,
स.न.वि.वि.कशी आहेस क्षमा कर हं? बरेच दिवसांनी तुला पञ लिहीत आहे. अग रोज तुझी आठवण येते पण, तुला पत्र लिहायचे राहून जाते.
काय लिहू? कशी आहेस? कविता कथा ताई कश्या आहेत? कादंबरी ताईची काय खबरबात!
काय करणार अग तो इंग्लिश भाऊ आला आहे माझ्याकडे राह्यला आणि येताना हिंदी बाईला पण घेऊन आला आहे. त्यांची ऊठबस करण्यात दिवसभराचा वेळ कसा निघून जातो.कळतच नाही.
राग येतो ग मी जास्त बोलायला जातच नाही त्याच्याशी. कामापूरतेच बोलते पण आग मुलांचे त्यांच्याशिवाय पानच हालत नाही.
अग कालचीच गंमत सांगते तुला! जेवायला पाटपाणी घेतले. जेवणाचा बेत तुझ्या आवडीचा होता ज्वारीची भाकरी पिठलं मिरची चा ठेचा.
फार आठवण आली तुझी! मनात म्हटले आज तु किती आवडीने ताव मारला असतास.
पण सगळे पण आणि परंतु? अग ही मुले! जाऊ दे! हा प्रश्न अनुत्तरित आहे. कधी कधी खुप किव येते ग, यांची आपल्या मातृभाषेला तळघरात लपून ठेऊन इंग्लिश चा टेंभा मिरवतात.
चूक माझीच आहे, हे मला कळतय पण वळत नाही. माझी अलंकारीक भाषा समझते ना ग तुला? का तू पण तशीच जाऊ दे आपलं दु:ख पर दु:ख शितल आसते आसे तुच म्हणतेस ना!
आता तुझ्याच भाषेत सांगायचं तर आपलेच दात आणि आपलेच ओठ! किती छान
दिवस होते ग ते, सकाळी आईचे दारी सडामार्जन, गोठ्यात कपिलेचे हंबरणे, चिमण्याचा किलबिलाट, रेडिओवर भक्तीगीतांची सुरेल मैफल, चूलीवर चहाचे आधन, सगळी कडे तुझीच तर लगभग. किती छान वाटायचे म्हणून सांगू!
आता वाटतं हे सगळे सोडुन धावत येऊन तुझ्या कुशीत शिरावे. खुप खुप बोलायेचे आहे ग तुझ्याशी! या आजूबाजूच्या बेगडी वातावरणचा कंटाळा आला ग!
आई तुझं लेकरू वेड ग कोकरू मोहजालात आडकलयं रस्ता चुकलंय सांग मी काय करु?
जाऊ दे हा भापट पसारा, तुझ्या प्रेमाची ऊब कायम माझ्या मनात राहणार. बेगडया प्रेमाच्या शालीला शत:शहा नमस्कार. आज तुझा हक्काचा दिवस तुझीचगोडवी गाणार.
खुपच पाल्हाळ लावते पण कोठे तरी थांबायला हावे हे प्रकर्षाने वाटतं.
सावाकाशीने दूसरं पत्र लिहील पत्ता बरोबर आहे पण पोस्टमन काका तरी येईल ना वाचायला का त्यांच्या कडे पण त्यांचेच राज्य ऐक अनुत्तरीत प्रश्न?
काळजी घे तु काय काळजी घेणार म्हणा आता मला ललित कथा काव्य व कादंबरी यांनाच पूढाकार घ्यायला हवा.
मराठी बोलले म्हणून रागावली तर नाहीस ना माझ्यावर! माझं आपले काहीतरीच हं!
तुझ्या प्रेमाला भुकेलेली भाववेडी पण मनोमन तुझ्यावर प्रेम करणारी अनामिका! "बोलते मराठी लिहते मराठी, वाचतेही मराठी"भाववेडी ऊज्वलाची लेखणी...