प्रिय बेटा श्रध्दास
प्रिय बेटा श्रध्दास
बेटा श्रध्दा तुला या चक्रव्यूहाने गिळल ग!..
प्रिय श्रध्दा
आता गोड आशीर्वाद देखील नाही देऊ शकत नाही ना यशवंत हो म्हणू शकत. या सगळ्या आशीर्वादाच्या पलिकडे गेल माझं बाळ.
श्रध्दा माझी देवावर खुप श्रध्दा होती म्हणूनच मी तुझ नाव श्रध्दा ठेवले..हो मी होते मी देवभोळी, देवभक्त.
बाळा तुला नऊ महिने उदरात जपलं अगदी तुझ्या तयार होणाऱ्या एक एक अवयवाची मी साक्षीदार आहे ग! तु जन्म तुझ्या बाललीला यात मी माझे बालपण उपभोगून घेतले.
लहान होतीस तेंव्हा माझ्याशिवाय पान तुझे हलायचे नाही.झोपायला मी घास भरवायला मी, शाळेत सोडायला मी.
मोठी होत होतीस हूशार होतीस, परिस्थिती बेताचीच आपली पण तुझे लाडकौतुकात कुठे आम्ही कमी नव्हतो.
वयानुरुप तुझे जग बदलले. आईच्या विश्वातून बाहेर पडून मित्रमैत्रिणीत जास्त रमायला लागलीस. थोडा मोकळेपणा मी तुला दिला. पप्पा म्हणायचे मुलीची जात आहे इतके मोकळे नको देऊस त्यामुळे नेहमीच आमच्या मध्ये वाद व्हायचे.
कदाचित या घरातील वातावरणाचा तुमच्या मनावर परिणाम व्हायचा.नेहमीच माझे मन साशंक असायचे.
खुपदा अश्या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे आमच्या दोघात वाद व्हायचे. श्रध्दा तुला मोकळीक दिली खरी आणि त्याचे परिणाम आम्ही दोघे विभक्त झालो.
तु मोठी झाली आणि तुझे जग आता पुर्णच बदलले सुरवंटाचे फुलपाखरू आता वेगळ्याच विश्वात रमायला लागले. कमावती झालीस आणि मग पैसा तुझ्या हातात खेळ लागला.कारण वयाने मोठी झालीस स्वतःहाचे निर्णय स्वतःहा घेऊ लागली.
थोडे विषयांतर पण या सोशल मीडिया वरदान तितकाच शाप ग! अग असे कसे केलेस न पाहता एका सोशल मिडिया तो तुला hi, hallo करतो. थोडी तुझी तारीफ करतो. लगेच तो तुला आपलासा वाटतो.कधीही न भेटता. आणि चोवीस तास सहवासात राहणारे परके?..
अग हे आम्ही खुप उन्हाळे, पावसाळे पाहिले म्हणून तुला आवरण्याचा प्रयत्न केला. धर्म पण आडवा येत होताच.
तू चक्क आम्हांला धमकी दिलीस. करेल तर याच्याशी लग्न करेल. जन्मदात्या बोललीस मुलगी मेली म्हणून समजा! आणि तडकाफडकी निघून गेलीस.
कुठे कमी पडलो आम्ही. म्हणून इतक्या तडकाफडकी नातं देखील तोडलेस?
तु निघून जाण्याने मी खचले. बाहेर कोणाला तोंड देखील दाखवू शकत नव्हते. जो तो आपल्या घराकडे बोट दाखवतो आहे असेच मला वाटायचे.
अन्न पाणी गोड लागेना. माझ्यामुळेच हे झाले.असा ठिपका तुझ्या वडिलांनी माझ्यावर ठेवला.मग तेही घर सोडून दुसरीकडे राहू लागले.
तुझ्या लाडक्या भावावर याचा परिणाम होत होताच. मी हे सगळं धक्के सहन नाही करू शकले आणि त्याचा परिणाम शरीरावर झाला.
एक दिवस माझा देवच शेवटी माझ्याकडे आला.चल येतेस का मला विचारू लागला. मी तरी कोणामध्ये अडकणार?
छोट्याच्या जबाबदारीचा विचार न करता.माझाच स्वार्थ साधला.मी देवाला हो म्हणाले, आणि अनंतात विलीन झाले.
बाळा आज तिथून हे माझे मनोगत खास तुझ्यासाठी!
वाटत तितके सोपे नाही ग! तुमची पिढीला सगळे कसं सोपे वाटते. पण तसे नसते.आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाशी तुमचे काही देणे घेणे नसते.
बाळांनो पहिले आई वडिलांचे मित्र बना,ज्या समाजात राहतो त्या समाजाचे पण आपण काही देणे लागतो हे विसरू
नका.
आज ज्याच्या साठी तु घरदार सोडले तो तरी तुझ्याशी एकनिष्ठ होता का ग?सांग कोणाचे भले झाले? तुझे ना आपल्या कुटुंबाचे.जाणारा जातो मागच्यांना त्याच्या कर्माची फळं भोगायला लागतात.
आज ज्या बाबांना बोलली होतीस, तुमची मुलगी मेली म्हणून समजा.बाळा तेच कटू सत्य झाले.पण तुझा बाबा तुला रोज सोशल मिडियावर तुझे काही ना काही अपडेट बघून मनाचे समाधान करून घ्यायचा.
त्यामुळेच बरेच दिवसात तु सोशल मिडियावर active नव्हतीस म्हणून बावरला, आणि तुझा शोध घेऊ लागला. तेंव्हा हे विदारक सत्य समोर आले.
बोलून जाता ग तुम्ही पण आईबाप आहोत. तुमचे बोलणं काळजाला लागते.
अग साधे खेळताना पडलीस आणि थोडं गुडघ्याला खरचटले तरी, जीव कासावीस व्हायचा आमचा. शेवटी काळजाचा तुकडा.
तुझं वागणे बघितले कि,मी मनाशी म्हणायची आत्ता नाही कळणार आई होशील तेंव्हा कळेल,
नशीब इतके बलवत्तर तुला आई काय, कोणतेच सुख लाभले नाही.
आज तुझ्या शरीराचे तुकडे करणारा नराधम एकेकाळी तुला जवळचा वाटत होता. त्यांनीच तुझा घात केला. बाळा या आंधळ्या प्रेमापायी जिवाला मुकलीस.
जंगलात तुझ्या शरीराच्या तुकड्यांना हुंकताना जंगली श्वान पण क्षणभर स्थब्ध झाले असतील नक्कीच?.
कोणाच्या तरी काळजाच्या तुकड्याची ही अवहेलना केली. म्हणून त्या मुक्या श्वानांनी सुध्दा त्या तुकड्यांवर आश्रू गाळले असतील.
न तोंड लावता बाजूला उचलून ठेवले असतील. हे पुरावे हाती लागुन तुला न्याय मिळावा हिच त्यामागची त्यांची देखील सद्भावना नक्कीच असणार.
कितीही चुका झाल्या तरी आईबापच त्या पोटात घालतात. वाट चुकलेल्या वासराला घराची वाट दाखवतात..
म्हणूनच माझ्या मागे तुझा बाबा तुला शोधत होता.कारण तो देखील तुझ्यासाठी तितकाच हळवा होता. सापडलीस पण कोणत्या आवस्थेत?आहेत तुझ्या कडे उत्तरं?
तुकडे विघूरले जंगलात.पण तुझा आत्मा मात्र आला बघ धावत विसावलं माझ्या मांडीवर. बोल आता तरी. माणसं ओळखायला शिक जरा माणसं ओळखायला शिक!..
माझ्या लाडक्या अनेक श्रध्दांनो एकच सांगते. आईबाप दुश्मन नाहीत ते हितचिंतक आहेत. सोशल मिडियाच्या जास्त आहारी जाऊ नका.
कोठेही अती तिथे मातीच. एक श्रध्दा गेली अश्या अनेक श्रध्दा या मार्गाने चालत असतील तर वेळीच सावध व्हा.स्वत्:हा उध्वस्त होऊ नका.
मोह क्षणाचा असतो.त्यामुळे आयुष्यभराचा तो पश्चातापाच भोगावा लागतो. न्याय देवता सुध्दा आंधळी असते.
शेवटी श्रध्दा, श्रध्दा कोणावर ठेवायची? आज श्रध्दा या शब्दाची व्याख्या काय हे जाणून घेतली असतीस तर आज या श्रध्दावर ही पाळी आली नसती आफताबला हा मोका मिळाला नसता ग!.
फक्त प्रत्येक श्रध्देने अपरिचित व्यक्तीवर विश्वास ठेवताना त्यात हा आफताब तर नाही ना याची कसून तपासणी करावी. हिच कळकळीची विनंती.
आपल्या मुलांवर चांगलेच संस्कार करतात. पण मुले त्यांच्या संस्काराचा गैरफायदा उठवून असे गुण उधळतात. त्यातलाच हा एक आफताब!
दोष कोणाला द्यायचा? पण शेवटी सगळे आफताब नसतात. फक्त माणसे ओळखायला शिकले पाहिजे.
टीप - लेख काल्पनिक आहे. काही संबंध या प्रकरणाशी मिळते जुळते असतील तर तो केवळ योगायोग समजावा!