पहिले प्रेम -प्रेमाची परिभाषा
पहिले प्रेम -प्रेमाची परिभाषा
प्रिय नवरोबा,
आजचा दिवस तुमच्या प्रेमाची नांदी उठवण्याचा . नक्की कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही. तुझ्या प्रेमाला व्यक्त करण्यासाठी कागद व लेखणी याची मदत घ्यावी इतके स्वस्त प्रेम नाही आपले! आज तीस वर्षेची तुझ्या सोबतची वाटचाल, अल्पशी काटेरी तर बरीचशी सुखदायक.
लग्न होऊन तुझ्या घरी पहिले पाऊल टाकले पण माप ओलांडताना तु माझा धरलेला घट्ट हात बरेच काही सांगून गेला.
तुझ्या माझ्या नात्यातील विण सुबकपणे विणू लागला. खुपशी अल्लड होते रे काहीशी चुलभुल पण.तुझी प्रेमळ नजर मला तुझ्यात गुंतवत होती.
तुझ्या घरातील बंदिस्त वातावरण आणि माझे माहेरचे मोकळे पण यांचा मिलाफ करणे जरा कठीणच गेलं.हे चित्र जरा पूर्व पश्चिम झाले. पण आहे त्या परिस्थितीत जूळवून घेण्याची आईबाबांची शिकवण कामी आली.
स्त्रीत्वाचे मोठ मोठी वादविवाद स्टेजवर गाजवणारी मी, वास्तविक जीवनात कुचकामी ठरली.नकळत चुका होत गेल्या.नात्यात गढूळता आली.तुझ्या प्रेमळ स्पर्शाला असुसलेली ईच्छा पण अबोल्यात लुप्त पावु लागली.
समजून घेणारे तर दुरच पण समजून सांगणारे पण कोणी नव्हते. फक्त चुका शोधणारे जास्त.रोजचेच नवे नाटक त्याचा आस्वाद घेणारे ,आसपास वावरत होते आसो.
नियतीने त्यातच मार्तृत्वाची चाहूल दिली. गोड बातमी इतरांच्या पचनी नाही पडली.पण तु व मी खुशीने झेलली. दिवसामासी दिवस गेले. तु मात्र मला जपत होतास. मग झाला आपल्या गोड परीचा जन्म.
पुढे दिवस बहरत होते.परत एकदा नव्या अंकुराने मातृत्व बहाल केले. मग सुरू झाली खरी प्रेमाची सुरुवात. आठवणीच्या कप्प्यात गेलेल्या छंदाना मग मिळाली तुझी साथ.
जुनं आठवायला नको कारण आनंदापेक्षा दु:खच पदरी जास्त. आज valentine day आज परत जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
लपूनछपून साजरं केलेले वाढदिवस, valentine day सगळे कसं चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. आज सगळ सुख आहे, मोकळे आकाश आहे. पण तो उत्साह नाही. चोरीछ
ुपी प्रेम काही अवर्णनीयच बघ!त्याची मजा दिलखुलास मध्ये मात्र नाही.आता दोन्हीही पिल्ले मोठी झाली. आता आपल्या बंदिस्त कोषातून बाहेर आली आहेत.
आता लेक सुध्दा सासरी गेली एक एक जबाबदारी कमी होऊ लागली.पण आता आपल्यावर आता वेगळ्याच जबाबदारीच ओझे वाढतआहे. मुक्तता कधी माहीत नाही पण हे जबाबदारीच ओझे जाणवत नाही. उलट आनंद वाटतो.मागचे वादळं विरून गेली.
पण खरे सांगु? कधी कधी जुन्या आठवणी डोकं वर काढतात नको वाटले तरी डोळ्यासमोर फेर धरून चक्क नाचायलाच लागतात. नको तेव्हा त्यांना जास्त चेव येतो.आता हिच बघ ना एक आठवण!..
नवीन संसारात सहजिवनात संसाराचे लोणचे घालताना तिखटमिठाचा अंदाज नव्हता रे!विचारले तर उत्तर यायचे आपल्या परीने घालायचे. पण शिकत गेले कधी खारट झाले कधी झणझणीत तर कधी फोडणीचा अंदाज नाही आला. पण शिकले. हे सगळे सावरताना तुझ्या प्रेमात पडायचे राहून गेलं. प्रेमाला सुरुवात कधीही करता येते आसे म्हणतात त्याला वेळेकाळेचे बंधन नसते बघूया जमते का ते!..
ये ऐक कानात सांगते!.. हे संसाररूपी प्रेमाच लोणचं आत्ताच घातले आहे रे! मुरू दे, मग त्यांची चव बघ थोडी वेगळी असेल, कळ काढ.धीर धर, मग बघ बरेच valentine आपण साजरं करू.
आयुष्य आपलेच आहे. असेलही, मग तुच म्हणशील "कोण होतीस तु? काय झालीस तु?अग वेडे त्रेपन्नातील विशीत कधी आलीस तु? काय जमेल ना?आज थोडी घाईत आहे.
शेवटी एक एक नात्यानी Exist घेतली. काही गोष्टी हातातून निसटून गेल्या पण काही गोष्टी तर आहेतच ना आपल्या हातात. प्रेमाला केंव्हाही सुरूवात करता येते. होना! मग रागावू नको मागे वळून बघ जरा!.. happy valentines day नवरोबा.!
ता. क. यावर्षी प्रेम थोडे पातळ झाले म्हणून नवरोजीवर काहीच नाही लिहिले मागच्या वर्षीचेच पोस्ट केले. शेवटी काय वय वाढले प्रेम थोडे जास्तच मुरले वयोमानानुसार तब्येतीला सोसत नाही हो. मुरलेले लोणचे! .. तुमचे काय जरा कमेंट्स मध्ये कळवा हं!.