STORYMIRROR

Ujwala Rahane

Inspirational

3.3  

Ujwala Rahane

Inspirational

"आधुनिक श्रावणी सोमवार"

"आधुनिक श्रावणी सोमवार"

2 mins
164


आटपाट नगरात एक कुटुंब राहत होते. घरात सहा सदस्य राहत होते. सासूसासरे सुन मुलगा दोन मुलं. अठरा विश्व घरात दारिद्र्य.सासूसासरे वयोवृद्ध ,दोन चिल्लीपिल्ली नवरा बश्या.नुसता घरात बसूनच असायचा. 


 सुन तशी जिद्दीची आणि कर्तबगार होती.पण पण चार बुके शिकलेली.त्यामुळे घरकामाचे काम तिला मिळाले.चारघरी धुनी भांडी करायची..आवड म्हणून कामाच्या वाटेवर असलेल्या शिवमंदिराची साफसफाई ती करायची विना मोबदला.पुजारी कधी देवाला चढवलेले प्रसादाचे जिन्नस तिला द्यायचा.मग तेवढाच तिच्या संसाराला हातभार लागयचा.


 श्रावणात तर दुध, तुप शिवामुठ या जिन्नसांची रेलचेल तिच्या घरात असायची.नवरा सगळ्यावर ताव मारायचा. वर तिच्या चारित्र्यावर ताशेरे पण ओढायचा.ती शिवावर श्रध्दा ठेऊन राह्यची तुच मार्ग दाखव म्हणायची.


  सासुसासऱ्यांना तिच्या कष्टाची जाणिव होती पण तेही काय करणार? दोनदा तिनदा मुलाला सुधरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण तो सुधारण्याच्या पलीकडे गेला होता.


 हिच्या जिभेवर साखर आणि हातात कसब.नवीन शिकायची आवड त्यामुळे आपसूकच तिला काम मिळत गेली. मग कामाचा व्याप थोडा वाढवला गरजेला कोणाकडे स्वयंपाकाचे काम ती करू लागली.


 चार पैसे हातात खेळू लागले. कुटुंबाला चांगले दिवस दिसू लागले. मुले देखील हुशार निघाली आईच्या कष्टाचे चीज करून आभ्यास जोमाने करत व पहिल्या पाचात येत.


 दिवस सरत होते. ती शिवभक्त होती तिची भक्

ती फळाला आली वरचेवर देव तिला सुखाचे दिवस दाखवू लागला. आजही तिने सकाळची आन्हिकं उरकून ती पहिल्या पर्वाची स्वयंपाकाची कामं करायला बाहेर पडली. श्रावणातला पहिला सोमवार प्रत्येकांच्या घरी गोडधोडाचा स्वयंपाक करून ती लगभगीने घरी आली.


  पोराबाळांच आवरून दिले,त्यांना शाळेत धाडलं. वृध्द सासूसासऱ्यांना जेवायला वाढलं. आपला जन्म सार्थकी लागावा म्हणून बेलफूल घेऊन देवळात गेली. शिवचरणी अर्पण केले.दिवसभर उपवास केला. शिवपार्वती मात्र ठरवलं आता हिचे दिवस पालटू या.त्यांनी चमत्कार केला.तिला अचानक सोमवारी एका शिवभक्तांनी शंभर लोकांच्या जेवणाची ऑर्डर दिली. तिनं मोठ्या धाडसानं स्विकारली. 


  तो शिवभक्त सोळा सोमवरचं उद्यापण करत होता. सोळा मेहूण जेवायला घालणार होता. हिने होकार दिला. सोळा मेव्हणात हिचा पण नंबर लागला.त्यामुळे नवरा देखिल जेवायला आला. प्रसादाचे जेवण तो जेवला आणि त्यांच्या स्वभावात फरक पडला.स्वयंपाकाची तारीफ सगळ्यांच्या मुखात होती.आणि पुढील आॉर्डर तिच्या हातात पडत होती.नवऱ्याने अचानक तिच्या हातात हात मिळवला.


 आजपासून मी पण तुझ्या कष्टात साथ देणार म्हणाला.तिची भक्ती सफल झाली शिवपार्वतीने तिला चांगले दिवस दाखवले.दोघं मिळून कष्ट करू लागले. मुलं हि आभ्यासात चुनूक दाखवून प्रगतीपथावर पोंहचले.सासूसासरे तोंडभरून आशीर्वाद देऊ लागले. सगळीकडे आनंदीआनंद झाला. तिला जसा महादेव प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हांला होवो हिच शिवचरणी प्रार्थना!.. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational