Ujwala Rahane

Inspirational

3  

Ujwala Rahane

Inspirational

मनाचे खेळ

मनाचे खेळ

3 mins
207


अमावस्याची रात्र ती घरात एकटीच. तिने खिडकीचा पडदा ओढला. क्षणभर बाहेर काहीतरी हलल्याचा भास झाला. धावत जाऊन तिने देवासमोर दिवा लावला. कारण अमावस्याच्या रात्री अतृप्त आत्मे फिरताना म्हणे, असे लहानपणी तिने आज्जीच्या गोष्टीत ऐकले होते. आणि पंधरादिवसापुर्वीच शेजारच्या बिल्डींग मधील हेमा वहिनीने आत्महत्या केली होती. सासरच्या जाचाला कंटाळून. मग तिचा तर तो आत्मा नसेल?


बापरे! कदाचित ती तिच्या पाच वर्षांचा मुलगा राजसला भेटायला आली तर नसेल? बापरे! ती थरथरत परत हॉलमध्ये आली. कारण घाईत तिचा मोबाईल सोफ्यावर राहिला होता. डोळे बंद करून तीने तो उचलला.


पण डोळ्यांनी परत विश्वासघात केला. तिची नजर परत खिडकीत गेली. परत तीच सळसळ. बांगड्यांची किणकिण, पैजणाची रूणझूण, पण अग्नी देताना अंगावरचे सर्व काढून घेतात ना मग हिच्याकडे कसे आले सगळे? माझा माझ्या मनाला प्रश्न?


फिरून नजर परत खिडकीकडे, आता स्पष्ट सावली दिसू लागली. पण हि काय करते माझ्या खिडकीजवळ? तुझे घर त्या बाजूला. मला का आलीस छळायला? मुद्दाम घाबरवतेस?


तुला माहित झाले का मी घरात एकटी आहे? मी तिच्या मनाशी मनातल्या मनात सुसंवाद साथत होते.पण शब्द बाहेर फुटत नव्हते.


परत काहीतरी हालचाल माझ्या डोळ्यानी टिपली. आजून एक सावली. आता मी पुरती गर्भगळित.काहीतरी भयानक आवाज.

दुरूनच कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला बापरे! म्हणजे हि कुत्र्यांना पण दिसली का? का कोठे चोरांची टोळी आली?इतक्यात बाथरुम काहीतरी पडल्याचा आवाज आता माझी बोबडीच वळली. कोण तरी बाथरूम मधून घरात शिरण्याच्या प्रयत्नात. शॉवर सोडल्याचा भास. आता कोणत्या खिडकीत थांबू?


घशाला कोरड पडली. पण मी थंड. ये बाई जा ग, मी काय घोडे मारले तुझे? मी तुझ्या 'अध्यात ना मध्यात' आपण वाटेत कोठे भेटलो तर फक्त ओळखीचे हास्य द्यायचो ग! मग माझ्या का मानगुटीवर बसतेस? मी तिला मनातल्या मनात बोलत होते.


तेवढ्यात बाथरूम मध्ये कोणीतरी साबण घेतल्याचा आवाज.माझी त, त, प्,प् जीव एकवटून मी नवऱ्याला फोन लावला. हॅलो यश तु लवकर ये मला खुप भीती वाटत आहे.


अग आत्ताच तर आलोय. मी सगळा वृतांत सांगू लागले. तोच परत बाथरूममधून आवाज आला. बघ ऐकलास का यश आवाज ?


अग काही नाही तु झोप आता. स्वामींचा जप कर नाहीतर शेजारच्या शरुला बोलव. यश मस्त झोपण्याचे औषध सांगून गेला. पण मात्र इकडे सफर मी करत होते. इतक्यात परत खिडकिवर काहीतरी वळवळ जाणवली. आता फक्त ओरडणे बाकी होते माझे .


पण तोंडातून आवाज बाहेर पडेल तर शप्पथ! शेवटी समर्थांचा जप चालू करून मुटकुळे करून कॉटवर पहूडले.कधी झोप लागली माहित नाही. पण बेल वाजत होती परत तिने खिडकी, बाथरूम सोडून आता चक्क दारावर थाप दिली कि काय? माझी आता बोबडीच वळली. मी स्वप्नातच..


इतक्यात जाग आली. ती परत बेलच्याच आवाजाने. निर्मला कामाला आली होती. ताई किती वेळ बेल वाजवते. बापरे तु आहेस? हो बापरे! एवढे उजाडले तर? निर्मला हातपाय धुवायला बाथरूमकडे जाऊ लागली, मी तिला परत अडवले, अग नको उघडू ते बाथरूम निर्मला! मी सगळा प्रकार तिला कथन केला. ती म्हणाली, हे सगळे तुमच्या मनाचे खेळ ताई, हे भुतबित काही नाही. दिवसभर काहीतरी विचार करता आणि त्यांचा संबध या सर्व घटनांशी लावता. थांबा बघते मी, निर्मलाने बाथरूमचे दार उघडले. तर एक पिटूकले उंदराचे पिल्लू खिडकीच्या काचेतून बाहेर पडण्यासाठी धडपडताना तिला दिसले.


हे मनाचे खेळ सगळे त्याचा संबंध नुकत्याच घडलेल्या घटनेशी जया लावत होती. तर खिडकीत झाडांच्या पानाची सळसळ सुध्दा ती ह्या घटनेशी जोडून बसली होती. खरच 'हा खेळ सावल्यांचा' निर्मला बरोब्बर आहे ते गाणं, थांब तुझ्या साहेबांना फोन करून सांगते म्हणून ती बेडरूम कडे पळाली. इकडे निर्मलाने उंदराच्या पिल्लाला बाहेर हाकलले. काच बंद केली. कामाला लागली. आता निर्मला देखील मनाशीच स्वगत करू लागली. खरच हे प्रत्यक्षात असे घडले तर?आता ती पण मनातून घाबरली.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational