STORYMIRROR

Ujwala Rahane

Tragedy

4.0  

Ujwala Rahane

Tragedy

दीप आमावस्या

दीप आमावस्या

3 mins
189


सुमन काही आणायचे आहे का बाजारातून? मी चाललो तिकडेच? हो हो आहो ती पितांबरी तेवढी घेऊन या. आजकाल तिच्या शिवाय माझं पान काही हलत नाही माझे! हो आजकाल मेहनत ती नको कशी प्रभाकररावांनी टोमणा मारलाच.


 असू द्या थोडे अघाडा,दुर्वा पण आणा हो, बर, बर म्हणत प्रभाकरराव बाहेर पडले.


 पितांबरी वरून आठवले खरच किती चकचकीत असायची हि समई सासूबाईंच्या काळात.कधी पितांबरी का बाकी काही लागायचे नाही. रोजच्या रोज नियमित देवपुजेच्या साहित्याची स्वच्छता काटेकोर पाळली जायचीच तिथे कामचुकार पणा चालायचाच नाही. नित्यनियमाने नंदादीप असायचा देवासमोर.पण कधीही काजळी नाही.


 पुढे पण हि परंपरा आम्ही दोघी जावांनी चालू ठेवलीच आजपर्यंत खंड पडला नाही पण आताश्या वयोमानानुसार कामात संथता आली एवढेच. 


 सासुबाईंच्या पाश्चात्य सणवार जाऊबाई व मी हौशीने करत. जाऊबाईंच्या पोटी मुलबाळ नव्हते. पण माझ्या दोन्हींही मुलांवर खुप माया त्यांची.त्यानी पण मला खुपच सांभाळून घेतले.हेवा वाटावा असं सगळं.श्रावण महिना तर आमचा आनंदाचा ठेवा.दोघी मिळून घराची साफसफाई पासून व्रतवैकल्ये पर्यंत वाटून करायचो. मुलंपण एकत्र कुटुंबात छान वाढली. कधीच तुझं माझं नाही. दरवेळी आठवण येते आणि ती येत राहणारं


सुमनताई आठवणीत रमल्या.बघता बघता सात वर्ष झाली मोठ्या जाऊबाईंना जाऊन. नेहमीप्रमाणे श्रावण महिना तोंडावर येऊन ठेपलेला.आमची साफसफाई चालू. दुसऱ्या दिवशी दिपअमाव्यसा. आदल्याच दिवशी जाऊबाईंनी घरातील सगळे दिवे गोळा केले. व म्हणाल्या सुमन आजच उजळून घेऊ ग दिवे,सकाळी फार गडबड होते. दुपारी करूया हे काम.मी पण हो म्हणाले,मीही थोडी चिंच भिजत घातली.वामकुक्षी नंतर दिवे उजळायला सुरूवात केली. सगळे दिवे कसे चकाचक झाली.करताना सासूबाईंची आम्हांला आठवण आलीच.लवकर उठून आम्ही दिपपुजा केली अगदी साग्रसंगीत.मग नैवेद्य आरती केली.सगळे नमस्कार करून आपापल्या उद्योग धंद्य

ाला गेली.आम्हीही सगळे आवरले. जाऊबाई म्हणाल्या,जरा थकल्यासारखे वाटते.थोडं पडते मी.मी ही होकार दिला. त्या आतल्या खोलीत जाऊन पडल्या. 


 उरलीसुरली आवरासावर करण्यात मी गुंतले.आवरल्यावर खोलीत गेले तर बापरे थंडगार.मी घाबरले सगळ्यांना बोलावून घेतले. डॉ. नी सांगितले.अचानक चालता बोलता. संसाराचा सगळा भार माझ्यावर सोडून जाऊबाई अनंतात विलीन झाल्या. घर दिव्याने प्रकाशित करून.सौभाग्य मरण पण चटका लावून गेलं.आज बघता सात वर्षे झाली.पण आठवणी ताज्याच,जागा तिच सगळे तेचं पण जाऊबाई नाहीत.दिपअमाव्यसा आली कि आठवते. खरच काही काही व्यक्ती कायम अंधारातच काजव्यासारख्या चमकतात तो प्रकाश अजरामर करतात. मागे आपल्या आठवणी ठेवतात आणि तो प्रकाशही मागे सोडून जातात इतरांसाठी.


 जाऊबाईंची आठवण मनातून पुसली जात नाही. क्षणोक्षणी ती आठवण मनाला वेदना देऊन जाते घरात चार हात राबणारे होते आता दोन हात ते किती उरकणार? 


  सुमनताई विचारातच गुंतल्या होत्या.आजकाल दीर पण संसारातून अलिप्त होते.सगळा भार प्रभाकरराव पेलत होते.मुलं करतीसवरती होऊन शहरात गेलेली.नोकरी पेशा वेळ कोणालाच नव्हता प्रत्येक जण नवीन प्रकाशाकडे वाटचाल करत होते.


 सुमनताईंनी कुकरच्या शिट्ट्या काढल्या गुरगुट्या भातवर मेतकूट व तुप,मीठ घालून दीरांना जेवायला वाढले. बाजूला लिंबाचे गोड लोणचे. वयोमानानुसार ते फारसं जेवतच नसत. हलका आहार घ्यायचे.हळूच दीर म्हणाले,सुमन उद्या दिपअमाव्यसा आहे का ग?तुझं आणि प्रभाकरचे बोलणं कानी पडलं? 


 सुमनताईंचा कंठ दाटून आला.दोघांच्याही डोळ्यात पाणी. दारात पितांबरी व दुर्वापत्री घेऊन प्रभाकरराव उभे होते.त्यांना प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आलेच.


 शेवटी रितीरिवाजाप्रमाणे सगळे सणवार तर करणे भागच ना मग तो दिवस आपल्यासाठी आमावस्या असली तरी? शेवटी काळ कोणासाठी थांबत नाही एवढे खरे?. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy