STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract

2  

Sarika Jinturkar

Abstract

जबाबदारी

जबाबदारी

3 mins
358

  "जबाबदारी" हा शब्द सहजच कानावर पडला....आणि वाटल किती महत्वपूर्ण ठरतो हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनात....अगदी लहानपणापासून तर शेवटपर्यंत...जीवनाच्या रंगमंचावर प्रत्येक व्यक्ती बजावतोय वेगवेगळी भूमिका. कोणी पेलतय बहूपात्री तर कोणाला जबाबदारी शिकवते एकांकिका...इथे आपणच असतो प्रेक्षक आणि आपण असतो कलाकार...लिखित संवाद जरी नसले तरी करावा लागतो सारासार विचार व सदैव तप्तर राहून जबाबदारी पूर्वक पाडावी लागतात कार्य पार....असचं काही होत न...


जबाबदारीचं ओझं आपल्या खांद्यावर पडल की आपण हळूहळू का होईना....मोठे होतो.. सगळ्या गोष्टींची किंमत आपल्याला कळते एवढी वर्षे आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टांची जाणीव मग त्यावेळी आपल्याला होते ..कधी कधी नकळत ही उमगते जबाबदारी... जेव्हा जबाबदारीचं ओझं नकळत खांद्यावर पडतं तेव्हा आयुष्य खूप काही शिकवून जातं...कधी कधी तर ज्या खांद्यांना आयुष्यभराचा भार काय असतो...? हे माहित देखील नसतं तेच खांदे सगळा भार मग पेलून नेतात.... खूप काही शिकवते ही जबाबदारी लहान असून मोठेपणाची जाणीव करून देते ही जबाबदारी....  

न थकता न हारता परिस्थितीशी सामना करवते... कधी न अनुभवलेले ते प्रसंग अचानकपणे जीवनात उद्भवतात व त्यांना तोंड देण्याचं सामर्थ्य कुठून येतं माहीत नाही पण तेव्हा कुठेतरी असं वाटतं की आयुष्य खूप काही शिकवून जात...बिकट परिस्थितीत सक्षम बनवते ही जबाबदारी....


आपल्याला सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी प्रचंड आत्मशक्ती तर हवीच... पण... वाट धरावी ही नेहमी सत्याची आणि जिद्द ठेवावी लढाई जिंकण्याची.... परिस्थिती कुठलीही असो जीवनात कधी हार न मानता जे सोबत आहे त्यांना घेऊन पुढे चालायचं.... जबाबदारीची जाणीव ठेवायची आणि जगायचं आपल्या हृदयासाठी, हृदयात असणाऱ्या माणसांसाठी आणि त्या माणसाच्या आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीसाठी...

खरंच प्रत्येकाला आपली कर्तव्य समजावी... खंबीरपणे उभे राहून जबाबदारीही स्वतःहून पार पाडावी तत्परतेने कार्य करून कधी भूमिकाही बजवावी

 आपलं परम कर्तव्य समजून घेऊन कधी दीनदुबळ्यांची ही सेवा करावी.... 

 

आयुष्यात कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाताना आपल्या सर्वोच्च क्षमतेने प्रतिसाद देण्यास समर्थ असणे म्हणजे तर जबाबदारी होय... जबाबदारीचे स्वरूप हे वेगळेच...तस पाहिलं तर एक व्यक्ती म्हणून देशाचा सुजाण नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य असतात काही जबाबदाऱ्या पण असतात.. बघा ना....प्राणाचाही करून त्याग स्वातंत्रवीर झटले हो त्यांच्या पराक्रमामुळेच देशाला स्वातंत्र्य भेटले हो. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले ही बाब आहे गर्वाची पण... स्वातंत्र्याचे संरक्षण ही जबाबदारी आहे आता सर्वांची  


निसर्गाचा समतोल बिघडला पर्यावरण दूषित झाले वृक्षतोड झाली... मनाला प्रसन्नता देणारी ती हिरवळ ही कुठेतरी जणू हरवली पर्यावरण संवर्धन करणे ही जबाबदारी आपली आहे पण आपल्याला वाटतं. नाही लागत आपण कोणाचे देणे या जगात कारण गुरफटलो आपण नोकरी, व्यवसाय आणि एकटच या संसारात ..व्यस्त झालो आहे मोबाईलच्या नादात आणि वेळच नाही भेटत आपल्याला रोजच्या या जीवन प्रवासात....एकदा तरी डोकावून बघितला का आपण.. कधी बाहेरचा नजारा खूप काही सांगत असतो.... हा निसर्ग साजरा....आभाळ सांगते उत्तुंग भरारी घेण्याचे स्वप्न मनी ठेव चंद्रासारखे शीतल तर सूर्यासारखे तेजस्वी हो दमला तर पानझडी सारखे गळून जा पण... पुन्हा मोगऱ्या सारखे बहरून या....सभोवताली प्रत्येक गोष्ट काही ना काही सांगून जाते हो... काहीच मागत नाही हा निसर्ग आपल्याला शिवाय एक सहवास कृतज्ञ नाही पण कृतघ्न तरी नका होऊ दिवसेंदिवस हे सांगण्याचा करत असतात ते प्रयास...  


तसेच... अमृतरूपी पाण्याविना सगळ्यांचा जीव होतो बेजार करू या पाणी जतन करण्याचे आपणच सर्वश्रेष्ठ काम दृष्टी परिवर्तन गरजेचे... करू या पशू पक्ष्यांचे रक्षण त्यामुळे होईल निसर्गाचंसुद्धा संरक्षण... आपल्यासाठी देशासाठी झटण्यारया व्यक्तीसाठी जबाबदारी म्हणून सामाजिक भान राखून कधीतरी समोरच्याला सहकार्य करूया...एक पाऊल पुढे टाकत समाजात प्रसंगानुरूप काय॔रत राहू या...कुटुंबाप्रती आपली काहीतरी जबाबदारी असते.... आपण ती व्यवस्थित रित्या पार ही पाडतो, कधी प्रयत्नशील राहतो. परंतु रोजचा अत्यंत व्यस्त असा दिनक्रम महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे अनेक बारीक-सारीक गोष्टी राहून गेलेल्या किंबहुना त्या कधी प्राधान्यक्रमावर न आलेल्या किंवा खूप मागे राहिलेल्या, आयुष्यात अमुल्य असणारया खूप काही गोष्टी करायच्या कधी राहून जातात...


एकीकडे फेसबुक आणि इतर सामाजिक माध्यमाच्या मार्गाने प्रचंड विस्तारलेले आपले जग कुटुंबाच्या बाबतीत आणि नात्यांच्या बाबतीत मात्र अत्यंत संकुचित होऊन पाहत... नाही का... या सर्वातून डोके वर काढून किंवा काही वेळापुरते हे सर्व बंद करून... कुटुंबात आपल्या आजी आजोबा असेल तर त्यांच्याकडून मस्त गोष्टी कधी ऐकून पहा...संवाद साधा... आपल्यासाठी नेहमीच छान छान पदार्थ करणाऱ्या किंवा आपल्या खाण्यापिण्याची काळजी घेत असलेल्या आजीला तिच्या आवडीचा पदार्थ करून तिला कधी आश्‍चर्याचा सुखद धक्का द्या... 

 

आईला घरातील काम करतांना थोडी मदत करा ती सांगेल ती सोपी कामे करा आणि पहा कामे करताना तुमच्या गप्पा कशा रंगतात मनीचे गुज कसे सांगितले जातात... ते गुप्त तर गुप्तच राहील पण अगदी त्यावर ती रामबाण मार्गसुद्धा सुचवेल ...अलीकडच्या काळात गमतीजमती चा अर्थ बदलला असला तरी... एक जबाबदारी म्हणून संकल्प करू या साधा सरळ आणि सोपा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा...


एक जबाबदारी ही... सुजलाम-सुफलाम हिरव्यागार धरतीच्या कल्पनेच्या पूर्णत्वाची संगोपन आणि संवर्धनासाठी गरज आहे फक्त आपल्या दृष्टी परिवर्तनाची...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract