ANJALI Bhalshankar

Abstract Action Inspirational

2  

ANJALI Bhalshankar

Abstract Action Inspirational

जात

जात

1 min
45


जातींची छाननी आडनावां वरून  होते.अंदाज बांधता येतात तोलून मापुन मग संवाद साधले जातात.'त्यांना" जास्त जवळ नसतं करायचं 'ते" तसेच असतात 'त्यांचेच" आहे ना?हे लोक आसेच! जय श्रीराम,नमस्कार सहज स्वीकारता.जयभीम ऐकुन का डोळे मोठे करता?किव येते असल्या भ्याड वृत्तीची.कारण राग व्यकत करायचा कसब डाॅ. भीमराव आंबेडकर नावाच्या ज्ञान सूर्यानं दाखवून दिलंय.सारया जगातला ज्ञानप्रकाश स्वःतामध्ये एकवटून जांतिना संकुचित केलंय.धर्म वजा करून मानवाला माणूस केलयं.फिकीर नाही वाटतं मला तरि कुणी जात विचारो वा आडनावं समजुन जायचं हा त्यांच्या असंस्कृत,धर्मांध मेंदुतला किळसवाण्या चेतापेंशीचा पिढ्यान्पिढ्या हस्तांतरीत झालेला गाभारा आहे.आपलयासाठी खुल करून गेलाय ना जग आपला बाप मग पेठेतल्या गल्लीबोळात कशाला घुटमळत रहायचे.करा ना धडपड सिद्ध करायची स्वःताला माणूस नावाचं लेबल मिळवलं मग आवघड नाही !


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract