STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Action Classics Inspirational

3  

ANJALI Bhalshankar

Action Classics Inspirational

निमिष

निमिष

5 mins
216

आयुष्य सुर्य आभाळाच्या अंगणातुन क्षितिजाला ,मावळतीच्या ऊंबरयात पोहोचलाय तप्त कीरणं आता मवाळ होऊन विझत चालली आहेत पिवळया धमम रंगाची आग दिवसभर ओकुन आता कुठे शांत होऊन काळोखाचे साम्राज्य पसरणया अगोदर गगणावर केशरी लाल रंगाची ऊधळण अस्ताला जाण्या आधी मुक्त हळूवार पणाने करीत आहेत.नदीचं सकाळच सळसळतं रूपडंही आता संथ शांत झालयं किरणांची लालीमा आताही विखुरली आहे तिच्या कुशित पंरतु सकाळचा ऊत्साह अजिबात नाही ऊलट तीच चैतन्य लोप पावलेय व ती ऊदास भासत आहे.तिच्या ऊदरात निवारा असलेले असंख्य जीव आता अदृष्य झालेत.हो ! काठावर तरंगणारे बगळयांची भुक शमलीच नाही अजुनही गटागटाने घिरट्या घालून सकाळच्याच उत्साहाने सावधपणे आपले सावज टिपाणयाच्या पावित्र्यात आहेत.

नदी हळु हळु शांतच होत आहे. पाणयावरचे हलकेसे तंरगही आता लुप्त होत आहेत. काळयाभोर आंधारच सावट काही क्षणात तिला आपल्यात गुडुप करणार आहे सार जग अंधारात डुंबुन जाईल अनामिक भीतीनं क्षणभर डोळे पानावले ऊदास एकाकी पणाची खरोखरच भीती वाटली स्तब्ध शांत राहून हे सार आपण पहात रहायच फक्त! आपण सुर्याला आडवू शकत नाही! नदीची चंचलता पुन्हा परत आणू शकत नाही !त्या जलचरांचा सळसळतं उत्साह, त्या बगळयांच सावज टिपनं, व चहुबांजुना काही वेळात मीटट काळ्या रंगाचा शिरकाव होईल,त्या काळोखालाही आपण आडवू शकत नाही!नाहीच थोपवू शकत आपण!! या अखंड ब्रम्हांडाच्या व्यापक नजरेतून पाहिले तर मी सूक्ष्मति सूक्ष्म शूद्र जीव आपली कुवत काय? कोण आपण?या पृथ्वीतलावर जन्मदात्यांच्या मार्फत पाठवलेला ?की स्वेच्छेने आलेला ?आपण त्या जणू धुळीतला कण जो वारयाचा सहाय्याने ऊंच ऊंच झेप घेतो. गरगरतो.

अलगद इकडे तिकडे बागडतो हवेचा दाब ज्या दिशेला असेल तसतसा हेलकावे घेतो. सुर्य प्रकाश पाणी समुद्र झाडे डोंगर या निसर्गातील विविध घटकाच्या सहाय्याने निर्मान होणार्या वारयाच्या,हवेच्या तालावर हा कण मस्ती करतोयस, हेलकावे खातोय, कधी संथ कधी वेगाने कधी आक्रमक तर कधी शांत चित्ताने इथला प्रवास करतोय. निसर्गाच्या तालावर नाचतोय .कधी ऊंच आकाशात ऊंच जाउन फुशारकी करतोय. तर कधी पानोपानी रानोमाळात,डोगरदरयांचया खडतर वाटा काटेकुटे कधी मऊ गवतावर संचार करतोय खाचखळगे तर कधी मोकळी सपाट सुंदर पायवाटेवर मुक्त विहारतोय त्या वारयाच्या,हवेच्या, दिशेनुसार आपले मार्ग क्रमण सुरू आहे ह्याची त्याला जाणिव असते का? त्याला हे माहीत असत का की एक ना एक दिवस वारयाचा वेग मंदावेल हवा ही शांत होईल वेगाच्या मस्तीतलया वारयाला स्थिर शांत किंवा मग काही काळासाठी नष्ट ही व्हावे लागेल आणि त्याचक्षणी या कणाला ही पृथ्वीवर कुठेतरी मातीत मिसळून विलीन व्हावे लागेल. प्रवास संपेल त्याचा इथला. तो मुक्त होईल कदाचित आधी मातीत मासळलेलया इतर अनेक सूक्ष्म कणांसह तो ही गुडुप काळाच्या ऊदरात आणि मी ही अशीच.............. .???

अंगावर सरकन काटा आला.सर्वांग शहारले मी निशब्द होते. आत विचारांच वादळं थैमान घालत होतं.आयुष्य वेगळ काय असत? त्या कणाची सारी मुशाफीरी वा-याचा तालावर. वा-याची समुद्र, झाड,डोंगर नद्या दर्याखोरया व दिशांच्या जीवावर दिशांचे अस्तित्व पृथ्वी च्या गमनावर, पृथ्वीचे आकाशाच्या सथिरतेवर,हे सारं चक्र परीणाम करतं शूद्र कणाच्या असण्याला, उत्पत्तीला .मग मानवी जीवणाच्या अस्तित्वाची वीण कोणाच्या इशारयावर?का?मी कोण आहे माझे इथ असणयाच प्रयोजन काय? नि माझ्या नसल्याने जगाला फरक काय?शून्य! का? अशा कातरवेळी नदीकाठावर आले मी?किती भयान,ऊदास, नीरस, बकाल ,आजचा दिवस अस्त पावत आहे.दिवसाचं चैतन्य ऊत्साह जीवणांचा कलकलाट आता लोप पावेल सार जग अंधाराच्या ऊदरात शांत होऊन निजेलआसमंत भर फक्त बस अंधार अंधार अंधार !! भरल्या डोळ्यांनी पश्चिमेला पाहीले सुर्य कुठवर पोहोचलाय नजरेच्या टप्प्यातून गेलाय की? आहे अजुन ! तोच..... हजारो काळे हिरवे टिपकयांचे शेकडो समुह  एकामागुन एक नदीच्या ऐलतीरावरून पैलतीरावर जिथे गर्द हिरवी दाट झाडे अचल ऊभी होती पान न पान निपचिप व्हायला सुरवात झाली होती फांदीफांदी तुन नाजुकशी किलकिल अगदी तीव्र ओढीने सुरू होती त्या मंद शांत हालचालीत तो टिपकयांचा समुह पानोपानी विलीन होत होता. एकापाठोपाठ एक शेकडो जथथे नदीच्या त्या शांत विस्तीर्ण पात्रावरून जाताना एकच लगबग  किलकिलाट करीत होते. ज्यातली ओढ ही त्या फांदयातनं येणार्या नाजुक किलकिलाट इतकीच.कदाचित् त्याहून जास्त पटीने कासावीस भासत होती. दिवसभर अन्न पाण्याच्या शोधासाठी घरट्यात आपली इवली पिले सोडून गेलेले,दमून भागुन आलेले असंख्य पोपट चिमणया घारी बदके कावळे साळुंखे.आपापल्या समुहासह शिस्तीत जाणारा एकेक पक्षी तितक्याच वेगान, ओढीन मार्ग क्रमण करीत होता.ऊडता ना निरनिराळ्या आकारत लयबद्ध हालचाल करीत होता .आपलया इवल्याशा पंखात मोठं बळ आणून विस्तीर्ण विशाल अथांग अभेदय आभाळालाच जणू आव्हान देत होता !.इतभर पंखात केवढ मोठ बळ होत त्याच्या! कीती ऊंच भरारी होती !आपल्या अस्तित्वाच्या खुणांची दखल घ्यायला गगनाला उद्युक्त करीत होता.मी निश्चल अवाक होऊन पहात ऊभी होते.त्या टिपकयांवरून माझी नजर हटत नव्हतीचं पक्षी चिवचिव, कावकाव, किलकिल आणि कोणकोणत्या आपापल्या भाषेत व्यकत होत होते.अलीकडच्या दुर क्षितिचातून जितके टिपके विखरत होते तितकेच पलीकडच्या झाडीत लुप्त होत होते.देहभान, स्थळ, काळ ,वेळ विसरून मी तो नजारा डोळ्यात सामावुन भरभरून गच्च साठवत होते.कीतीक वेळ गेला अर्धा, पाउन तास माहीत नाही.काही वेळाने पक्षी येणं थांबल या पक्षांनी खरंतर त्या काही निमिषात मला जीवनाच गुढं समजावल पंख असुदे लहान त्यात आपल्या मनाची ताकत ओतली मग भरारी घ्यायला आभाळ ठेंगणे होते हेच जणू ते चिमुकले जीव सांगत होते लहान आयुष्य असुनही जगण्याची अतिव महत्वाकांक्षा होती .त्या चिमुकल्या जीवांचे नियमन नियोजन कीती शिस्तबद्ध होते.त्या जीवांनी आयुष्य कीती दिवस जगलो यापेक्षा कसे जगतोय हे महत्वाचं आहे हे मला सांगितले.नवी ऊर्जा दिली होती. ऊदासी काही प्रमाणात ढळली होती .मी सभोवती नजर फीरवली गडद काळोख दाटून आला होता.एकादं दुसरा पक्षी दिसतोय का?पुन्हा आकाशाकडे पाहिल तर पूर्वेला नाजुक अशी चंद्राची कोर नुकतीच ऊगवून आली होती.काळयाभोर आभाळाला आव्हान देण्यासाठी ..........तेजस्वी चंद्राची कोर.. जणू सांगत होती काळोखा!तुला भेदायला मी समर्थ आहे..............जणू मलाही शिकवण देत होती अग!!!काळोख क्षणाचा असतो त्या मध्ये झाकोळून न जाता, मागे न फिरता,त्याला पार करून पुढे जा स्वताला सिद्ध कर.तु धुळीचा कण समजुन मातीत मिसळणयाच दुःख करीत बसु नको. तू तूला चंद्राची कोर समज की!!! जी काळोखाच्या मस्तकावर स्वार होऊन आपल्या कर्तुत्वाची चमक व अस्तित्व मागे ठेऊन ऊद्या येणार्या नव्या ऊषकालात विलीन हो!!!आता सारच मोकळ झाल होत. मुक्त वाटत होतं. साचेलेली ऊदासी निरसता, बकाल, भयान काहीच नव्हत आकाशातल टिपूर चांदण मनाच्या प्रांगणात उद्याची स्वप्ने विखुरत होतं मी नव्यान जगायला,नव्या प्रश्नांची ऊत्तर शोधायला जगण्याच्या लढाईला सामोरे जायला नवा दृष्टी कोन घेऊन निघाले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action