ANJALI Bhalshankar

Abstract Tragedy

3  

ANJALI Bhalshankar

Abstract Tragedy

ती,ची जिद्द

ती,ची जिद्द

4 mins
579


तीनेक महिन्यांपूर्वी तीला कॅन्सर च निदान झालेले. अगदी तिसर्या स्टेज वर सर्व सामान्य सत्तर टक्के   स्रीया जे करतात तेच तीन, केल. आरोग्याकडे दुर्लक्ष !कितीक वर्षापासून छातीत आलेली गाठ दुखत नाही,काही त्रास नाही मग कशाला डाॅकटरकडे जायच!हे ऊत्तर ठरलेलं शेवटी शरीराच्या, मर्यादा प्रतीकार करून थकल्या आणि आजारान बळ वाढवले. डाॅकटरांनी महिन्याची मुदत देऊन घरी पाठवलं.दहा ,व पाच वर्षाची मुलगा,मुलगी नवरा सारयांच्या आयुष्यावर परीणाम सहाजिक होता आईबाप घरात रडायचे. पोरांचे डोळे कित्येकदा, माझ्याजवळ क्लासमध्ये भरून यायचे काय वय त्यांची त्यांना माहीत तरी आहे काय ?कॅन्सर महणजे काय ?त्याचा परिणाम काय ?कस व्हायच या मुलाचं जर आईच..........?. या विचारान मला भरून यायच. त्या मुलांची वय पाहता त्याना धीर द्यायला मला मोठ बळ आणावे लागायचं..........हे सार कमी होत की काय, नियतीने दुसरा जबरदस्त प्रहार या कुंटुबावर केला पत्नीच्या आजारान, तीन चार महिन्यात खचुन गेलेला. हिच काय बरेवाईट झाले तर मी काय करू? माझ्या मुलाचं काय होईल? या विचारान रात्र दिवस या विचाराने पछाडलेला या लेकरांचा बाप. महानगरपालिकेत करारदधतीने रोजदांरीवरील कामावर असतानाच 20/12/2021रोजी हदयाच्या झटक्याने जागेवर हे जग सोडून गेला .अगदी पाच मिनिटावर, असलेलया मोठ्या दवाखाणयात पर्यंत जाण्याचीही श्वासांनी संधी दिली नाही.आदलया दिवशी डाॅकटरांनी बायकोची कसलीतरी टेस्ट बाहेरून करायला लावली ज्याचा खर्च होता आठ हजार रूपये अनेकांना पैसे मागितले, बाकीचे उपचार मोफत होते. हि टेस्ट जरा महागडी पंरतु पक्के, निदान करून ओपरेशनने गाठ काढून आपण कॅन्सर हारवून या बाइचे आयुष्य वाढवू शकतो त्यासाठी लवकरात लवकर तपासणी करून घ्या अशी आशा व ऊमेद दिली डाॅकटरांनी  आणि याचा धीर वाढला. अनेकापुढे पैशांसाठी हात पसरले. चार जणांची जबाबदारी,भाड्याने घर ठेकेदारी पदधतीत अगदी करोना काळात सुद्धा आठ आठ तास घाणीमधये काम करुन आठ,दहा हजार रूपये महिन्याकाठी मिळणारया व्यकती कडे कुठून पैसा शिल्लक रहाणार?खचून गेलेला मणुष्य शेवटी या काही क्षणात हे जगच सोडून गेला शेवटी.बाईच्या पदरात दोन लेकर शरीरात भला मोठा आजार कोलमडनं सहाजिकच.एक स्री कीती सोशिक असू शकते याची परीक्षा च जणू नशीब पहात होत.तीची अवस्था शब्दात मी नाही मांडू शकत तीच्या वेदना तीची दुःखं अनुभती करू शकेल का?कुणी? ज्या आगीत तिला जन्मान होरपळून काढलं त्याचा दाह सोसेल का कुणी?याच उत्तर नाही!नाही!नाहीच पण तीने ते शोधल आपली आत्म शक्ती जागृत केली. मागे पतीच्या फकत आठवणी आणि पुढे सारा अंधार शारीरिक बळ तर कधीचं संपवले पतीच्या निधनाने ऊरल सुरल मानसिक धैर्य ही संपल.त्याच्या सोबत दवाखाणयात येण,रांगेत ऊभ रहाण सरकारी दवाखाणयात नंबर लवकर येण्यासाठी, मुलांना झोपेतच टिकून सकाळी सहालाच दोघे गाडीवर बाहेर पडलेले पाहिलय कित्येकदा .घरी यायला कधी दुपारचे चार,पाच तर कधी रात्र .किमो साठी तीला तीन,चार दिवस अडमिट व्हावे लागे मधून मधून मग घरात मुलांच्या जेवणापासून स्वता कामावर जाईपर्यंत सार त्यान निभाऊन नेल आणि हे सार आठवून, सांगतांना तिचे हुंदके थांबत नव्हते माझ काय होईल ?माझ्या लेकरांच कस होईल? या प्रश्नांची उत्तरे आमच्या पैकी कोणाकडेच नव्हती कोणत्या तोंडान सांत्वन करायच?जीवघेण्या आजारात खरया अर्थान साथ देणारा जीवनसाथीच निघून गेला. ती रडली,आक्रोश करत राहिली, खचली तीने प्रश्न विचारले त्या प्रत्येकाला जो फक्त सहानुभूती दाखवत होता.आणि त्यालाही ज्याच्या कडे तिचा पती काम करत असतांना मरणं पावला.तिच्या पतीच्या आयुष्याची किंमत ठरवली, इथल्या व्यवस्थेने पंचवीस हजार रूपये!! तो जिथ कामाला होता त्या विभागातले त्याच्या सारखेच काम करीत असलेले तीस बीगारी ज्यांनी आपणहून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे पगारातून दिलेले पंधरा हजार, जो ठेकेदार या बिगारयांच्या जीवावर कोटीवधी रुपयांची टेंडर महापालीकेतून मिळवली त्याने दहा,हजाराचा चेक देउ केला ते ही त्या आजारी बाईने चार पाच चकरा मारलयावर बीगारया पेक्षा ठेकेदार गरीब निघाला?माणूस महणून त्याची किंमत कदाचित हे रोजदांरी मजूर ऊचलत असलेल्या कचरयाहुनही खालच्या दर्जाची आहे हे त्याच्या ऑफीसमध्ये गेलयावर मीही अनुभवलय.तिच्याकडे खर तर तिथवर जाण्यासाठी च्या गाडी खर्चाचे पैसेही मुश्कीलीने असावेत. तरीही दाहा हजारांच्या चेकची भीक व बीगारयांचे पैसेही साभार नाकारून ती शांत बसली.तीलाच तीच्या मुंलासाठी ऊभ रहायचं होत रहावच लागणार होत पतीच्या निधनानंतर तिसर्याच दिवशी तीची किमोची तारीख होती यावेळी सोबत यायला तो नव्हता ती ऐकटीच निघाली नातेवाइकांनी सोबत येण्याविषयी विचारले तर स्पष्ट पणे निर्धाराने नकार दिला चार दिवस तुम्ही आहात!याल! पुढे काय?कोण?याचही ऊत्तर कोणाकडेच नव्हत.ती एकटीच गेली परत परत अडमिट झाली कीमो घेत राहिली सर्व,तपासण्या कित्येक चकरा, परीस्थिती पाहून सरकारी दवाखाणयातील डाॅकटरांनी स्वस्त दरात तपासण्या  होण्या साठी, सुचवलेल्या त्या प्रत्येक ठीकाणी ती एकटिच फिरली आणि शेवटी 7/3/2022 रोजीचा दिवस ऊजाडला तिच्या शरीराला लागलेली कॅन्सर नावाची महाभयंकर किड पाच तास चाललेल्या आपरेशनने काढून टाकण्यात आली.दोनेक तासात ती पूर्ण शुद्धिवर आलयावर तिच्यासमोर गेल्यावर काही बोलणयाअगोदर कर अपोआप जुळले. तिच्या जिददीला हिमतीला तिच्यातलया आईला आणि बाईपणाला आज जागतीक महीला दिनी शतशः वंदन


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract