बेफीकीर... नाही तरूणाई.
बेफीकीर... नाही तरूणाई.
आठ मार्च जागतिक महिला दिन.जंगली महाराज रस्त्यावर पुस्तकाच्या कामानिमित्त गेलेली बस साठी बालगंधर्व समोरील बस स्टोप वर यायचे म्हणून चौकातुन चालत येत असताना दुरूनच मोठा घोळका दिसत होता जवळ आलयावर नीट दिसल तो महाविदयालयिन तरून तरूनिंचा जथथा होता बस स्टोप च्या मागिल फुटपाथ वर हातात मोठाले पोस्टर घेऊन ही मुल कसल्या तरी घोषना देत होती.मी कुतूहल मिश्रित कौतुकाने हातात सलोगनचे पोसटर घेऊन उभ्या अनेक मुलींपैकी एका मुलीजवळ जाऊन त्यावरील सलोगन वाचले खरोखर स्रीयांविषयी मोजक्या शब्दात समाजाला मोठा संदेश देणारे ते घोषवाक्य च्या प्रत्येक पोस्टर मी भराभर वाचु लागले.ती मुलगी बोलली तुम्ही ही काढता का पोस्टर सह फोटो.नकार देण्याचा प्रश्नच नव्हता शेवटी किमान ऐक दिवस तरी महीलांचा महिलांसाठी चा ती च्या सन्मानासाठी राखूलाय या समाजाने हे ही नसे थोडके?या उक्तीने मी हातात तीन चार निरनिराळ्या घोषवाक्याच्या मोठया पाट्या म्हणूया धरून फोटो काढले आजुबाजुला ऊभी मुलमुली खरतर!मुलच जास्त होत्या पोरी त्या मानान कमी होत्या आपल्या कडे मुलीच्या जन्मदर मुलाहुन कमी आहे म्हणा किंवा समाजाच्या लैंगिक भेदभावाने तो ओढावला आहे म्हणा त्याचा परिणाम आहे की काय हे ऊगाच मनात आल.माझ्याभोवती आता पन्नासाच्या आसपास साधारण सोळा ते पंचवीस वयोगटातला तरूण भारतच जणू ऊभा होता.मीच गोंधळून गेले या हुशार पोरासमोर मला क्षणभर काय बोलावं सुचेना. त्यांनीच मला बोलत केल अगदी नम्र पणे तुम्हाला काय वाटतय,आज महिला दिवस मुलींनी महिलांनी आपल आयुष्य स्वतंत्र पणे जगायला हव महीलांना समान हकक, न्याय व सामाजिक स्थान बरोबरीचे असायलाच हवे ना, घरकामासाठी तीला स्वतालाच एकटीलाच का गृहित धरतो आपण जरी ती बाहेर नोकरी करीत असली तरीही घरातली जास्तीत जास्त जबाबदारी तिचीच का?घरातल्या कामांची जबाबदारी पुरूष कीतपत घेतो?मुलाचं शी,शु,अंघोळ ,कपडे, खाणं,शाळेचं जाणारी असतील तर त्यांच आवरण वस्तू जागच्या जागी ठेऊन पुन्हा दुसर्या दिवशी हातात देण हि किरकोळ वाटणारी कामं ना!मग दुसर कोणि का नाही करू शकत. अगदी लहानातलया लहान गोष्टीला मुलांना आई हवी नवरयाला बायको हवी. मग ती च्या साठी कोण?घरी पाहूने येणार तिनं सुटी घ्यायची किंवा लवकर यायच.जेवणाच्या फर्माईशी पुर्ण करायच्या,जेवण सारयांचा शेवटी करायच का?तीच्या मासिक पाळीतील वेदना कोणि वाटून घेत का?मग किमान तीला आराम मिळावा म्हणून विशेष प्रयत्न किती जण करतात महिणयातले कीमान चार दिवस घराची संपुर्ण जबाबदारी कीती जण घेतात?ती शारीरीक संबधाला विरोध करेल तेव्हा तीच्या नाही चा आदर करणारे तीच्या स्रीतवाचा सन्मान करणारे कीती पुरूष आहेत या समाजात.सारी नाती तीनं जपायची सासुला आई माणायच फकत कितीजणी आपल्या सुनेला मुलगी मानतात.मुलगी झाली म्हणून नाकं मुरडून मुलगीच झाली, होय!अरेरे दुसरी पण मुलगीच का?होईल पुढ मुलगा असे सुनवुन अक्षरशः सांत्वन करणारी लोक आपल्या कडे दिसतात हे सार थांबवाला हवे आपण थांबवायला हवे इ.इ.तावातावाने अतिशय पोटतिकडीने या पन्नास साठ निरनिराळ्या पोरांचा घोळकयात ज्याचा चेहेरा विचार आणि भावना एकच होत्या मी मध्ये ऊभी होती.मी या चेहरयाला आधी ओळखत नव्हते या पुर्वी कधीही भेटले नव्हते पंरतु अवघ्या दहा पंधरा मिनिटात मी ही त्या चेहेरयाचा एक भाग झाले होते .चाकोटया पिटत फिरणे मनसोक्त हुंदडणे कॉलेज बंक करून सिनेमा पहाणे कोणत्या तरी होटेल मधये आपलयातलयाच ऐकाला बकरा बनवून ट्रीट ऊकळणे.अभ्यास सोडुन बाकी सार कोलेज मध्येच करायच असत या विचारांच हे अवखळ तारूण्य मदमस्त ,बेफीकीर, बेलगाम,असल सार चित्र डोळ्यासमोर डोळयासमोर ठेवणारी तरूणाई कुठेच दिसत नव्हती त्यांच्यात आणि पोर म्हणल की मुलींची छेड काढणारी ऊडान टपूपणा करणारी सोडाच ऊलट महीला दिनाच्या आयोजित करण्यामध्ये मुलांचाच पुढाकार, ऊत्साह तगमग आणि तळमळ जास्त आणि समजुतीची जाणिव मला मलींपेक्षा संख्येने जास्त असलेलया पोरांनि करून दिली तुम्ही काही बोला मार्गदर्शन करा असे म्हणून खर तर या पोरांनी माझी गोची कली मीच त्यांच्याकडे पाहून भारावले होते काय बोलनार मी पोरिनी आग्रह धरला तुमचि प्रतीक्रीया द्या स्वप्नांच्या पंखावर बसुन मनात ऊमटणारया तंरगासह अलगद सवार होऊन जादुच्या नगरीत भ्रमंती करणारयां या अवखळ उत्साहाला मला आयुष्याच्या वास्तव प्रवासातलया दाहकते च्या अनुभवांचे चटके द्यायचेच नव्हते आणी मी कधीच अनुभवांचा दुखरा पाठ लहानांसमोर वाचत नाही ऊलट माझ वय विसरून नवनव्या गोष्टी बोलण्याची,संवाद साधण्याची शैली अगदी बिनधास्त कोपी करून अगदी अगदी वीशीत असल्याच्या अविर्भावात त्यांच्यात विलीन होते. तरीही काहीतरी बोलायच म्हणून मी म्हणल मला तुम्ही वीस वर्ष मागं घेऊन गेलात तुमच्या इतका समंजसपणा डेंरीग अगदी मासिक पाळी व स्रीच्या संमती शिवाथ शारीरीक संबध नाही म्हणजे नाही या सारख्या गंभीर व नाजुक गोष्टी विषयी तुम्ही मुल जवळ जवळ सारीच अविवाहित घर,संसार किंवा संबधाचा अनुभव नसणारी विचार परखड पणे मांडतात घरात आजुबाजुला जे पाहिल, अनुभवल ते पाहुन कुठेतरी काहीतरी चुकतंय!जे खटकतय ते बदलायला हव म्हणून धडपडताय हे जर आम्ही तुमच्या वयात होतो तेव्हा केल असत तर कद्चित समाज अजुन जास्त सकारात्मक झाला असता बस !टाळ्यांचा कडकडाटात माझे थॅकस विरून गेले............होते ......केव्हाच.दुपारीच एक कविता सुचली सहज म्हणू का हे शब्द त्यांनी एकले की नाही माहीत नाही सारेजन पांगले मला जरा ऊंच जागी ऊभ रहायला सांगून सारी मुलः अर्धगोल करून माझ्या समोर ऊभी राहून मला कविता म्हणून दाखविण्याची विनंती वजा प्रेरणा देऊ लागली कुठून ऊत्साह आला होता माहीत नाही की या युथ ने मला त्यांचा सळसळता उत्साह काही काळासाठी ऊसना दिला होता.मी अगदी काही सकाळी सहज महीला दिन आठवला म्हणे म्हणून कवितेच्या चार ओळी मोबाईल वर टाइप केलेल्या म्हणूण दाखविलया.खरतर हे माझ्या आयुष्यातल पहिल जाहीर काव्यसंमेलन होत ज्याचा मंच, श्रोते मुक्त होते.हा श्रोते वर्ग ओढून आणलेला दिखावा करणारा बेगडी वा ठरवून आलेला नव्हता.तर स्वयभू,अंतर मनाच्या प्रेरणने समाजाला काहीतरी समज देऊन अनुभवी समाजाच्या मार्ग दर्शनासाठी अतुर होता त्या सळसळत्या तारूण्याची धडपड प्रदर्शनासाठी नककीच नव्हती ती परिवर्तना साठी होती अन त्यांचा समोर वाचलेली माझी कविता धन्य झाली होती.कारण इथ माझ्या शब्दाच मूल्यमापन , विश्लेशन व परीक्षण करणारे पौढ पोक्त तत्वज्ञ नव्हते. ऊलट शव्द न शब्द शांतपणे एकाग्रतेने कानात साठवणारा ऊदयाच भविष्य होत जे मोठ्यांच्या भुतकाळतील अनुभवाच्या अभ्यासून आपल्या भविष्यासाठी योग्य आयाम, दिशा व वाटा मजबुत करू पहात होतं आणि त्याचच मला जास्त कौतुक व अप्रूप होतं जे कुठतरी माझ्या अंतर्मनात लोपलेला आत्मविश्वास जागं करीत होतं त्या अर्धातासात हे तर निश्चित समजल माझ्या देशाच भविष्य निश्चितच आशादायी व उज्वल आहे जिथं स्री पुरूष समानतेचा धागा जोडणारया तरुणाइची झेप आहे हे नक्कीच लैंगिक भेदभावा च्या मध्ये दुवा होऊन समनतेला सांधत राहिल यात आजिबात शंका नाही......हे विचार मनात रूजवून मी आनंदाने चालती झाले.मागे ठेवले माझे नाव व फोन नंबर त्यांच्यापैकी अनेकांच्या मोबाइल मध्ये ठेवले .................आणि सोबत मनात त्या सारयानांच घेऊन आले पानांवर ऊतरविण्यासाठी.
