अनोळखी वाटा......
अनोळखी वाटा......
वेळ साधारण साडे अकरा अकरा मी कुमठेकर रोडवरील अन्नाभाऊ साठे विद्यालयात असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या कार्यालयातून बाहेर पडले व बाजुलाच असलेल्या बसस्टॉपवर येऊन बसची वाट पहात ऊभी राहीले. पाच दहा मिनिटे गेली असतील तीशीतली एक महीला व सोबत पाचसहा वर्ष वयाची छोटी चिमुरडी पाठीवर स्कूल बॅग सावरत माझ्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या.खरतर दुपार व्हायची होती पंरतु मार्च महिना नुकतीच होळी येऊन गेलेली आमची आजी म्हणायची " थंडीला पळवून लावण्यासाठी होळी येते ,,त्याप्रमाणे थंडी कमी होऊन उन्हाच्या झळा वाढू लागल्या होत्या कडक ऊन पडलेले . तरी बरे फुटपाथ च्या कडेला असलेल्या झाडांमुळे बस स्टाॅप वर गर्द सावली होती. पाचेक मिनिटे गेली मुलीला शाळेतून आणलेल, म्हणजे रोजचे येणे असावे असा अंदाज बाधून मी अपल सहजं विचारलं हडपसरची बस असते का?आता. खरतर माझे घर ईथून चालत पंधरा मिनिटावर झालेला कॅमेरा हडपसरमध्ये दुरूस्ती साठी दिला होता तो घ्यायला मी हडपसरला निघाले होते .एकतर भर दुपारची वेळ त्यात वीस मिनीटे झाली बस आली नव्हती आणि नेहमीचा रूट नसलयाने वेळही निश्चित माहीत नव्हती मला वैताग येण्यासाठी तेव्हडं पुरेस होतं.
माझ्या एका प्रश्नांची तीने,येईलच!आता पावणेबाराची असते ना,मी रोज जाते हडपसरला. पंधरावीस मिनिटाला असते येइल इतक्यात तीच इतक बोलण पुरेस, होतं. चला फारच जास्त वेळ नाही थांबावे लागणार, मी मनात विचार केला पुर्वी फोटोग्राफी साठी बाहेर पडलं की तासनतास मी बस स्टाॅप ऊभी असायची. एखादी स्माइल पुरेशी असते बायकांना गप्पांचा फड रंगायला मग अनोळखी व्यकती कधी मैत्रीणी होते हे समजतही नाही. हिची चार वाकय तर पुष्कळ होती. हडपसरला रहाता का?माझा सहज प्रश्न .हो ! हिला शाळेत घेऊन येते सकाळी काय? मी जरा आश्चर्याने पुन्हा विचारले हडपसरवरून ?हो गावातल्या( पेठेतलया) एका नामांकित शाळेच नाव घेऊन ती बोलली होय शाळा चांगली आहे ना! तितकयात तिने बोलल्या प्रमाणे दहा मिनिटाने बस आली ऊन्ह वाढल्याने असावे, बसला आजिबात गर्दी नव्हती तीच्या मागोमाग बसमध्ये जाऊन मागच्या सीटवर बसले.मग तिकीट वगैरे सोपस्कर उरकून ऐसपैस झाल्यावर सवयीने नजर बाहेर ! खिडकीबाहेरील जग निरखणयाची वेगळीच अनुभुती असते प्रवासात. अर्धापाउन तास शांतपणे एका ठीकाणी आपण घरात तरी कुठे निमुट बसतो? तेव्हढ्यात तीने मागे वळुन मघाशी अर्धवट राहिलेले संभाषण सुरू केले. अस आपल्यासोबत कीतीदा घडते, काहीवेळा बस स्टाॅप वर भरभरून बोलत,असलेली मुलगी वा महीला, एकदा बसमध्ये चढलयावर वा, ऊतरताना मागे वळूनही पहात नाही मीही तेच करते म्हणा! बसमध्ये स्थिरस्थावर झाल्यावर मुलीच्या हाती कसले तरी खाऊचे पॅकेट दिले व मागे वळून मला हलकीशी स्माइल ही दिली तिने .मीही!तीचा खरंतर बोलका स्वभाव असावा होते हे मी ताडले आणि मघाशी स्टाॅप वर अर्धवट राहिलेला विषय, मीच नव्याने सुरू केला.
कुतूहल ही होते की पाचसहा वर्ष वयाची पोर घेऊन हि रोज हडपसर ते लक्ष्मी रोड म्हणजे साधारणतः पंधरा दुणे तीस की. मी. अंतराचा प्रवास करते.अर्थात तिची ही तडजोड केवळ मुलीला चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे यासाठीच होती तरीही.......जरा तिरके होऊन, बसल्या जागी मागे वळत माझ्याशी बोलायला सुरवात केली हो!सकाळी सातच्या बसने येतो आम्ही मग आठ ते अकरा हि वर्गात बसते व मी बाहेर बसते लॅपटॉप च्या बॅगेकडे पहात,माझे काम करत बसते. अकराला शाळा सुटली की मग दोघी घरी जातो. बस कधी लवकर पोहोचते कधी एक वाजुन जातात.मग दुपारचे स्वयंपाक आवरून तीन साडेतीन होतात जेवायला. त्यानंतर सातपर्यंत माझे ऑनलाइन काम करते मग रात्रीचा स्वयंपाक हिचे बाबा व मी मिळून करतो.ते ही दमुन येतात सात वाजता पंरतु मदत करतात.. पुर्ण दिनक्रम च तीने एका दमात सांगुन टाकला. तोपर्यंत बसने कुमठेकर रस्ता पार करून शनिपारला चितळे क्राॅस केले मग मंडइचा स्टाॅप गाठला. काही मानसं उतरली काही नवी माणसं आतल्या प्रवाशयात मिसळली. तिथे मेट्रो स्थानकाचे काम सुरू असल्याने गर्दीतुन निघायला बसला वेळ लागत होता मी खिडकीतून बाहेरील गर्दीचा अंदाज घेत आहे हे लक्षात आल्यावर कदाचित मला फार घाई आहे वाटून ती बोलली, जाईल हो ! बस लवकर !पावणे एक पर्यंत पोहोचू आपण हडपसरला. सध्या तीनचार दिवसापासून हि बस आतुन म्हणजे, नानापेठ,काशेवाडी लोहियानगर, भवानी पेठेतील आतल्या गललयामधुन नाही जात. टिंबर मार्केट क्रोस करून रामोशीगेट वरून सरळ सेवन लव चौकातुन जातेय. त्यामुळं लवकर पोहोचते.हो का!ते एक बर झालं! मग काय तीन तास रोज शाळेबाहेर बसुन कंटाळा येत असेल ना!काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून मी बोलले.खरतर जरा लांबचा प्रवास असेल आणि बसायला जागा मिळाली की मीही बरयाच लोकांप्रमाणे मोबाईल मध्ये असते पंरतु एखादा विषय सुचतोय का, ज्यावर मी लिहू शकेन या विचारात काहीतरी टाइप करणे सुरू असते .पंरतु त्या पाचसहा वयाच्या मुलीला दररोज इतक्या दूरून शाळेत घेऊन येणारया व तीन तास बाहेर बसुन रहाणारया आईच मला कौतुक वाटलं आणि कसलिही ओळख नसताना मला भरभरून बोलत मी न विचारलेल्या प्रश्नांच्या अंदाजाने, मोकळेपणान ऊत्तर देण्याची तीची धडपड मला आवडली होती.कारण आजकाल लोक इतके बीझी असतात की एकाच घरात राहून एकमेकांची चौकोशी सुद्धा करत नाहीत.आणि बाहेर वावरतानाही ऊगाचच शिष्टपणा दाखवणे, एखादाच शब्द मुश्कीलीने ऊचारणारे किंवा ठराविक प्रश्न तिरकस बेमालूम पणाने विचारून येणार्या उत्तरावर मग पुढे बालायचं की नाही हे अगदी सावधपणे ठरवणारे कावेबाज लोक खुप भेटतात. अनोळखी लोकांचा तर प्रश्नच नाही.ओळखीचेही कधी कधी तसेच वागतात . ही मानासातली होती!! तिकडे जवळपास असतील की बरया शाळा!! .मोठयांच काही नाही हो पंरतु ही छोटी आहे अजुन खुप, बाहेर भांडी आळीतलया दुकानातील चकचकीत तांबेपितळ स्टीलची आकर्षक व चकचकीत भांडी कुतुहलाने न्याहाळनारया चिमुरडीकडे पहात मी बोलले.आहेत की! परंतु माझी इच्छा होती माझ्या मुलीला याच शाळेत शिकवणार बारावी पर्यंत मला कळजी नाही तिची आता पासून शिक्षण चांगल्या प्रतीचे भेटेलं तर पुढे तिचे भविष्य चांगले घडेल. असा टिपीकल सर्वसाधारण आईचा विचार तिने फक्त बोलून दाखवला नाही, त्यानुसार तिची तयारीही व प्रयत्न ही दिसत होते .रामोशी गेट पास करून ती मघाशी म्हणाली त्यानुसार बस आतल्या बाजुला न वळता सरळ सेवन लव चौकाकडे वळली.ती थोडीशी पुढे सरळ बसुन मुलींला आज काय शिकवलं वगैरे प्रश्न विचारण्यात गुंतली.मी खिडकी बाहेर पाहिले पुण्यातल्या मध्यवर्ती गल्ली बोळा,व अरूंद तुडुंब गर्दीच्या रस्त्यातून वाट काढत आता सुटसुटीत अशा सोलापूर रोडवरून जाणारया बस प्रमाणे माझे विचारही भरघाव सुरू होते. माझ्या वस्तीत हीच्या मुलीच्या वयाची कित्येक मुलमुली आहेत त्यांच्यावर प्रेम करणारयां,भविष्याची चिंता करून धडपडणारया आया ही आहेत. त्या दिवसभर चार घरची धुणीभांडी ,सोसायट्यांची झाडलोट करतात, कुणी पारलर, मध्ये कुणी शिवणकाम करून तर कुणी साफसफाई, भाजी विक्री तर कुणी डबे तयार करून देतात लेंकरासाठी त्या वाटेल तेव्हडे कष्ट करतात. शाळेत पाठवतात आपल्या परीस्थिती नुसार जे शक्य होइल ते सगळं करतात. सगळेच पालक आपापल्या कुवती नुसार हे करत असतात. पंरतु झोपडपट्टीत जन्मलेल्या ,महानगर पालिकेच्या वा तत्सम साधारण शाळेत शिकणारया मुलांच्या शिक्षणाचा दर्जा नक्की काय आहे? हे मी अगदी जवळून गली अठरा वर्ष अनुभवत आहे त्याहून पुढे काही ठराविक,जे थोडेफार शिकलेले पालक वगळता कीतीजण आपलया मुलांच्या अभ्यास, गुणवत्ता,मार्क व भविष्यात कोणती दिशा किंवा नक्की काय बनायचय? माझ्या मुलाला वा मुलीला या गोष्टीचा विचार गांभीर्याने करतात ,हा मोठा प्रश्न आहे.आगदी सत्तर टक्के पालकांना हे ही माहीत नाही,किंवा कसलेच नियोजन वा पकक नाही की,पुढे चालून मला माझ्या मुलाला अमुक क्षेत्रात पाठवायचे आहे. मुलांना शाळेत पाठवले की झाले??परतु आपल पोर काय शिकतय कोणत्या विषयात रूची आहे काय समजत नाही ?हे जाणून घेण्याची गरजच वाटत नाही अर्थात झोपडपट्टीतले बरेच पालक अडाणी किंवा कमी शिकलेले आहेत त्याचा ही परीणाम असेल काही मुल आर टी ई नूसार मोठ्या नावाजलेल्या इंग्रजी माध्यमात शिकतात ,ही पंरतु त्यानांही धड एक वाकय इंग्रजी मधून नाही बोलता येत. कधी कधी मुलांना बागेत घेऊन गलयावर, आरटीई नूसार शिकत असलेली व माझ्याकडे शिकवणीला येत असलेल्या,पैकी काही आर टी इ नूसार शिकत असलेलयाही मुली आहेत. या मुलींना बागेत खेळायला आलेली, उच्च सोसायटयातत रहाणारी उच्च शिक्षित पालक असलेली एखादी वर्ग मैत्रीण भेटते पंरतु ती ओळखही दयायला मागत नाही. वा इंग्रजी मधून एकादे वाकय बोलते,ज्याचे ऊत्तर द्यायला माझ्या वस्तीत रहाणारया मुलींला शब्दांची जुळवाजुळव करताना शरमलयासारखे होते.का?तर हिच्या घरात कुठे ?मिळतय हिला पोषक वातावरण यांचे आईवडील कुठे इतके एजुकेटेड? आहेत की यांच्याशी रात्र दिवस इंग्रजी बोलतिल,इंग्रजी सोडा मराठीही वाचता न येणार्या आईबापाची पोर !!परंतु समाजातल्या काही तिरसट प्रवृत्ती या मुलांना व पालकांना दुषणे लावतात हे असलेच!यांना कितीही सवलती द्या हे नाही सुधारत!सरकारणे कितीही दिलं तरी कमीच आहे?.त्यांना प्रश्न विचारावा वाटतो, हजारो वर्ष प्रस्थापितांच्या पायाखाली चिरडलेला दबलेला शोषित वंचित,मनुवादयांच्या विचारांखाली, तुडवून चिरफाड, होऊन विखरून चिंधया झालेल्या, बहुजण, दलीत समाजाला, मुख्य प्रवाहात यायला जरा किमान काही पिढ्या तर जातीलच अर्थात इथल्या सत्ता धारयांनी मनुवादी धोरण अवलंबण्याची व्यर्थ व फुकाची शर्थ चालविणे बंद केले तरच, समाजात हजारो वर्ष ज्यांच्या कडे सत्ता संपती साधन सामग्री होती .वाव होता धन,जमीन हकक होते .त्यानी तर किमान चंद्रावर वस्ती करायला हवीत होती ना आजवर.आणि इथली वंचित बहुजण मुनिवादी कष्टकरी रयत जी पिढयानपिढया शिक्षणापासून वंचित राहुन मतिमंद केली. तिच्याकडून कसली अपेक्षा करताय??? बुध्दिवान होण्याची तेही फक्त मागच्या काहीशे वर्षात छत्रपती शिवाजीराजे, म.फुले,शाहू आणि परम पूज्य डाॅकटर भीमराव साहेब आंबेडकर यांच्या अफाट अलौकिक कष्ट व ज्ञानने मिळवून दिलेले हक्काची त्यांना किमान जाणिव तरी होऊ दया!! ते ही काहींच्या डोळयात खुपत आहेत.हि मुलं कीमान घटनेतील तरतुदीमुळे इंग्रजी माध्यमांच्या गुणवत्ता असलेल्या शाळांपर्यंत पोहोचली हे ही नसे थोडके !पंरतु समाजातील काही प्रवृत्ती या मागची खोली विचारात घेत नाहीत वा त्यांना तसे जाणून बुजुन करायचेय .अशा लोकांशी मी नाही लढू शकत मी किमान माझ्या झोपडपट्टीत वाढणारया नव्या पिढीला जागृत करण्याचा प्रयत्न शेवट पर्यंत करत राहीन. तुम्हाला हडपसर गावात उतरायचंय ना?मगरपटटा आलाय.समोरून आलेल्या ती च्या आवाजान माझी विचार शृंखला तुटली हो!हो!चला येते मी म्हणत मी ऊठून बसच्या दाराकडे निघाले खाली ऊतरून मी तिला वळून निरोप तर दिलाच पंरतु मनातुन धन्यवाद ही दिले इतक्या सखोल विचार करायला मला प्रवृत्त केलेल्या तिच्यातलया जबाबदार आईला............
