21व्या शतकातील स्री
21व्या शतकातील स्री
एकविसाव्या शतकातील स्री!! निसर्गची सर्व श्रेष्ठ निर्मिती! जिचे मन अथांग सागरासारखे खोल असते. ज्याचा तळ शोधण महाकठीन काम आहे.तिच्या शोषणाच्या सहनशक्तीचा अंत कोठे होतो?तिच्या आयुष्याला प्रेमाचा एक किरण ही पुरेसा होतो त्या हजारो आडचणींच्या अंधारया दाहक वाटेवर चालायला.एक स्री प्रेम, माया, ममता, कर्तव्य संसारातील सुख दु:ख तडजोडी सारयाच बाबी खुबीने निभावत नेते. जन्मभर घर संसार तत्व चारित्र्य मैत्री एकनिष्ठपणे सांभाळते.या सारयां च्या बदलयात तिच्या स्वःता साठीच्या अपेक्षा मात्र शुन्य !!काही दिल,मागितले तरीही ती दुसय्रासाठी मागेल संसारात संस्कारात ती ढोंगीपणा नाही करत.!!मानसाने निर्मान केलेल्या जाचक नियमातून ती अजुनही पुरेशी मुक्त झालेली नाही पंरतु ती सुज्ञ झाली आहे तशी तिला हजारो वर्ष स्वताःला सिद्ध करण्याची संधीच या रूढीवादी जहाल व्यवस्थेने दिली नाही हे भीषण वास्तव आहे ती स्वत: साठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगत आली .इथल्या विषमतेने तीची विवेक बुदधी च नष्ट केली होती पंरतु आता ती जागी होत आहे .आपल्या न्याय हकक अधिकार व कर्तव्य सारयांबाबत जागरूक होत आहे कुटुंबाने समाजाने,आपल्या गरजा तिच्यावर थोपलया त्या जबरदस्तीला, थोपविणयाची प्रबळ प्रतिकार करण्याची जाण तिला येत आहे.शोकांतिका म्हणजे तिला समजावून घ्यायला इथली व्यवस्था अजुनही असफल आहे. नैतिकतेचे सारे डोस आजही स्रीला पाजले जातात. त्यातल्या त्यात विधवा घटस्फ़ोटीत अविवाहित एकट्या रहाणारया स्वतंत्र स्रीला काही लोक आजही स्वैर समजतात. तीने कितीही लोकांच्या नजरेतून स्वतःला पाहून कुचंबणेत जगले तरीही!! लोक त्यांच्या नजरेत विचारात त्यांना जे पहायचय तेच पहातात हे नक्की!! काहीच स्रीयांना जमत दुसर्याच्या नजरेतून स्वतःला पहायच नाही या वर त्या बिनधास्त, ठाम, ताठ मानेने जगतात. पुरुष मग तो नवरयाला बायको, भावाला बहीन सासुसासरयांना सुन व आईबापाला फकत मुलगीच चरित्रवान, संस्कारी सर्वगुण संपन्न नीतीवान हुषार लागते. हिच गोष्ट मुलगा, जावई ,भाऊ ,पती यांच्या कसोटीवर कीतपत उतरते ?स्रीला नाटक अगदी उत्तम जमत दुनियाभरचा ताण मेंदूत असतानाही ती उत्तम हास्य आपल्या चेहेरयावर आणेल मात्र दुःखाच नाटक खरया आयुष्यात कोणी करेल काय?मनात असेल तर प्रेम आपुलकी भावनांचा ओलावा जपताना स्री आपल सर्वस्व हरवेल,हरेल जीव देईल. पंरतु मनाविरुद्ध आपल्या तत्वाला अस्तित्वाला, चारित्र्याला जर कुणी साध डिवचले तर जीव घ्यायला ही ती कमी करीत नाही.प्रतिष्ठा व नितीमुलयाच्या कसोटीवर स्वताःच अस्तित्व कोळुन तावून सलाखून बाहेर यायला आपल्या आंतर मनाच्या क्षणिक मोहाला सावरणयाची धमक प्रत्येक स्री मध्ये असतेच असे नाही. पंरतु जगातल्या कोणत्याही स्रीचे चरित्र हेच तीच्या साठी मौल्यवान असते.ज्या वाटेला आपल्याला जायचेच नाही त्या कडे ढुंकूनहि पाहिले नाही, किंवा आपण आपल्या चौकोनात राहीलो तर कोणाचीच हिंमत होत नाही तो चौकोन पार करण्याची.मग तुम्ही कुठे रहाता हा प्रश्न उरत नाही !!आपणं जगात सुरक्षितच असतो तोपर्यंत जोपर्यंत जगाला आपल्या चारित्र्याचे भय वाटतेय!!नाही तर आपल्या अस्तित्वावरचा तीळभर डागही पुरेसा असतो समाजातल्या रानटी प्रवृत्तीला आपल्याला ऊधवस्त करायला. असो............हे तिला चांगलेच समजते .आज ती स्वतंत्र सुशिक्षित आहे जगण्याचा अर्थ शोधत आहे नव्या आभाळात आपल अस्तित्व सिद्ध करीत आहे दुःखाबददल बोलण्याचा विरोध व निषेध करण्याचा अश्रु न ढाळता न्यायासाठी लढण्याचा निर्धार करत आहे ती जाब विचारते संवाद साधते आपले मत मांडते.प्रसंगी पुरूष तीच्या आयुष्यातून निघून गेला तरीही तिचे आडणार नाही इतकी मजबूती हिंमत व धडाडी पणा नक्कीच तीच्यात आला आहे. एकविसाव्या शतकात स्रीकडे फक्त भोगवस्तू म्हणून पाहणारया नजरांना अंतिम पाडाव सुरू आहे. कारण आज ती प्रखर, प्रगल्भ,परखड आहे
