ANJALI Bhalshankar

Inspirational Others

3  

ANJALI Bhalshankar

Inspirational Others

राकट देशा......

राकट देशा......

3 mins
194


राकट देशा कणखर देशा, दगडां च्या देशा. नाजुक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा.

अशा धारदार शब्दांनी कवी गोविंदाग्रज यांच्या सह अनेक साहित्यिकांनी आपल्या भारदस्त शब्दसुमणांनी

गौरवाचा साज चढविलेला असा आपला मंगलमयी पवित्र महाराष्ट्र देश.आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

आजच्या दिनी एकोनाविसशे साठ साली द्विभाषिक अखंड राज्य अर्थात आपल्या महाराष्ट्र राज्याची खरया अर्थाने निर्मिती झाली. लाखो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वतंत्र भारताची मुहूर्तमेढ रोवली मग निरनिराळ्या राज्याची पुनर्रचना करण्याच्या प्रक्रीयेला वेग आला.द्विभाषिक प्रांतांचे शक्तिशाली राज्यात रूपांतर व्हावे म्हणून अनेक दिग्गजापासून सर्वसामान्य जनता एकत्र आली.अनेक नेते पत्रकार लेखक बुद्धीजीवी लोकनेते यांनी वैचारीक पातळीवर लढा दिला.यासह मराठी भाषिक समाज एकत्रीत आणण्यासाठी एस एम जोशी प्र .के अत्रे काॅमरेड श्रीपाद डांगे सेनापती बापट प्रबोधनकार ठाकरे या सारखे समाजिक विचारवंत एकत्र आले .सयुकत महाराष्ट्र चळवळीचा इतिहास लिहिताना लोकशाहीर अन्नाभाऊ साठे क्रांती सिंह नाना पाटील कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा उल्लेख केल्याशिवाय पुर्ण होणार नाही कारण शाहीर अन्नाभाऊ साठे अमर शेख नारायण सुर्वे यांनी आपल्या शाहीरी लेखणीतून काव्यातून सर्वसामान्य कामगारांना व जनतेच्या भावनांना हात घातला म्हणूनच सत्तेला मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीला नकार दिला तेव्हा सर्वसामान्य जनताही पेटुन उठली आंदोलनात सहभागी होऊन सरकारचा तीव्र विरोध केला ज्याचा निषेध करून आंदोलन मोडीत काढण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी दिलेल्या गोळीबाराच्या आदेशामूळे एकशेसहा आंदोलक हुतात्मे झाले.अशा बलीदानातुन आपले राज्य विसाव्या शतकाच्या मध्यावर पुन्हा नव्याने ऊभे राहिले.........

होय नव्यानेच कारण बलीदान त्याग व शुरवींराची शकती व भक्ती ची परंपरा हजारो वर्षापासून या भुमिने पाहीली आहे.महाराष्ट्र अवघ्याअवघ्या देशातच नाही तर जगात आपली प्राचीन सांस्कृतिक शौर्याची परंपरा दाखवून दिली आहे. थोर संतांची परंपरा लाभलेली पढरीची वारी हे त्यापैकीच शिस्तीचे दैदिप्यमान उदाहरण आहे. संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव चोखामेळा जणाबाई यापासून लोककलयान व खरा धर्म जागृतीचे सुरू झालेले कार्य अगदी अलीकडे गाडगेबाबा पर्यंत सामाजिक ऐकयाचा संदेश जपणारी व अध्यात्मिक समता सत्य व त्याग शिकवणारी आहे.

छत्रपती शिवरायांनी मराठे शाहीची मुहूर्तमेढ याच भूमीत रचली तुकड्या तुकडयात विखुरलेला ऊधवस्त झालेल्या सह्याद्री च्या कडेकपारयात मराठा तितका मेळवावा ची साद दिली बसुजनांना साथीला घेऊन स्वराज्याची स्थापना केली.महाराणी जिजाऊ माँसाहेब शाहाजीराजे यांसह अनेक मर्द मराठी मावळ्यांची साथ महाराजांना लाभली नव्हे त्याशिवाय स्वराज्य अशक्य होते असे हे वीर तानाजी मालूसरे संताजी घोरपडे जीवा महाला सूर्याजी पिसाळ ऊमाजी नाईक बहिरजी नाईक इत्यादी सरदारांनी प्रसंगी जीवाची बाजी लावून सह्याद्री च्या कुशीतील महाराजांनी निर्मान केलेली गड किल्ले व दौलतीचे राखण केले. पूढे छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज महाराणी यसुबाई ताराराणी अहिल्याबाई इ.दिंनी मोलाचे योगदान महाराष्ट्र रक्षणया दिले.

बारा कोटी जन संख्या असलेले आपले महाराष्ट्र राज्य तीनशेसात हजार सातशे तेरा की मी क्षेत्रफळात विस्तारले असुन सातशे वीस की मी लांबीचा समृद्ध असा सुजलाम सुफलाम .दक्षिणोत्तर विस्तारलेला समुद्र कीनारा आपलयाया लाभला आहे.छततीस जिल्हे व अठठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायती असलेले हे अखंड राज्य ऊत्तर पूर्व छततीसगड, मध्य प्रदेश व दक्षिणेला कर्नाटक गोवा तर वायवयेला गुजरात दादरा नगर हवेली असे विखुरले आहे.कोकण पुणे नाशिक औरंगाबाद नागपुर अमरावती तसेच मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र व प्रादेशिक विभागातील देशातील मुख्य आर्थिक राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर असे पसरलेले आहे.विविधतेने संपन्न राज्यात अनेक निसर्ग रम्य व प्राचीन गड किल्ले, सरोवरे लेणी मंदिरे व समुद्र कीनारयावर वसलेली अलीबाग, गणपती पुळे, रत्नागिरी दापोली निसर्ग रम्य विलोभनीय ठीकाणे आहेतच यासह कास पठार लोनार सरोवर वेरूळ अंजठा लेणी इत्यादी जागतिक दर्जा असलेली स्थळे ही आपलयाला लाभलेली आहेत.संपूर्ण देशाचा आर्थिक वाटा मोठ्या प्रमाणावर चालवणारे ऊदयोग मुंबईत आहेत राजकीय औदयोगिक आर्थिक व्याप असलेले शहर मुंबई व सारया जगाला भुलविणारी बाॅलीवुडची मायानगरी आपल्या मुंबईत अर्थात आपल्या महाराष्ट्रात आहे.

पहीले मुख्यमंत्री स्वर्गीय मां यशवंतरावजी चव्हाण या पासुन सध्याचे मा.मुख्यमंत्री ऊदधवजी ठाकरे यापर्यंत सारयांनाच विविध राजकीय सामाजिक घडामोडींना सामोरे जावे लागले आहे. ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्र उभारणी मध्ये महाराष्ट्रातील ऊदयोग कारखाणे शेतीने नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे.येथील गिरणी कामगारांचा लढा एकुनच जागतीक पातळीवरच्या कामगारांच्या पिळवणुकीच्या विरूदधचा लढा यशस्वी ठरलेला दिवस म्हणूनही आपण आजचा दिवस जागतिक कामगार दिन कामगार कष्टकरी यांच्या न्याय हक्काचा दिवस म्हणूनही ऊत्साहाने साजरा करतो.

असा हा दैदिप्यमान प्राचीन सांस्कृतिक सामाजिक प्रेरणादायी व शाहु फुले आंबेडकरांचा, महात्मा फूले सावित्री बाई फुले पासून आलीकडे नरेंद दाभोळकर गौरी लंकेश इत्यादी पर्यंत निधड्या छातीने सत्याची लढाई लढणारया बुद्धिवंत विचारवंत सुधारणावादी पुरोगामी महाराष्ट्राची कीर्ती जगभर अखंड वाढतच राहो. असा हा महाराष्ट्र देश बहूजणांचा कष्टकरयांचा शेतकरयांचा लढवय्या विचारवंताचा महाराष्ट्राचा वारसा आपण सारयांनीच जपायला हवा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational