मिरची आणि भूखंड...
मिरची आणि भूखंड...
सकाळची गोष्ट उपमा करताना लक्षात आले हिरवी मिरचीच नाही.🌶 घरात मग बाजुच्या छोट्या मुलाला पाच रूपये देऊन मीरची आणायला पाठवताना पीशवी घेऊन जा म्हणेस्तोवर पोरग पळालं🌶 पाचच मिनिटात त्याने माझ्या हातावर मिरच्या ठेवल्या हो एवडयात, येतच नाहीत म्हणत होते ते काका!! पण दिल्या!छोट पोरग भाबडे पणाने सांगून पळालं🌶 मी मात्र माझ्यावरच हसले पीशवी घेऊन जा असे त्या पोराला म्हणले यामुळे हातातल्या सहा मिरच्या पाहून खजीलही झाले.🌶पाच रूपायाला सहा मिरच्या किंवा मग पाचावर एक फ्री असा हिशोब धरला तर एक रूपयाला एक मिरची पडली होती मला🌶यातला म्हणजे रूपयाला कीतवा भाग प्रत्यक्ष अन्न दात्या पर्यंत पोहोचला असेल???.काल वर्तमान पत्रात बातमी वाचली श्रीमंत तीरूपती संस्थानाला, म्हाडाचा आकरा एकर भूखंड एक रूपया चौरस दराने देण्यात आला🌶त्यासाठी वरील पातळीवरून आदेश आले म्हणे 🌶अह!वरून म्हणजे आकाशाकडे नका पाहू !ते सारे जण राजकारणी लोकांच्या हातातले बाहुले होऊन सत्तेसाठी रस्त्यावर ठाण मांडून बसलेत🌶 इतका गलिच्छ वापर होतोय हे पाहून खरोखरच राम हनुमान अस्तित्वात असते ना !आता तर तेही लाजेने चुर झाले 🌶असते इतके निरलज्ज बेभान लोक आपण सत्तेत बसवले आहेत 🌶.म्हणजे पहा सर्वसामान्य जनतेला साधे जेवणं बनविण्यासाठी लागणार्या मिरची सारखी साधारण फळभाजी जर एक रूपयाला एक या दरात घ्यावी लागते🌶 म्हणून झोंबत असेल असेही मी म्हणनार नाही🌶 कारण ती मिरची कमी तिखट कींवा तिखट नाहीच या प्रवर्गातील होती🌶.खरा प्रश्न हा की चैनिच्या ऐशोआरामाची साधणं प्रवास, कपडे, कोसमॅटिक,पेट्रोल वगैरैचै भाव तर दररोज चढत्या क्रमाने वाढत आहेतच पंरतु🌶 साधारण मनुष्य भाज्यांसाठी वा तत्सम कीराणा सामान, फळे वा जीवनावश्यक पदार्थ अन्न पदार्थ बनविणयासाठी लागणारे तेल वेगैरे गोष्टींचे दरही गगनाला भिडलेले आहेत🌶सर्व साधारण सामान्य माणसाची स्वप्न व अपेक्षा फार मर्यादित व आटोपशीर असतात🌶.घर नसेल तर घर घ्याव झोपडपट्टीत असेल तर फ्लॅट मध्ये जावे🌶.किंवा फ्लॅट लहान असेल तर जरा मोठा कीमान टू बी एच के चा असावा🌶.मुलांना थोडीफार प्रायोरीटी मिळावी जरा मोठा हाॅल आसावा जेणेकरूण चार पाहूने आलेच तर बसायला ऐसपैस जागा असावी🌶 इत्यादी इत्यादी माफक व गरजू अपेक्षा कारण सर्वसामान्य गरीब माणूस व त्यापुढे सामान्य मध्यमवर्गीय स्तरातील लोकांची मानसिकतेत एकदा मुलेबाळे हीऊन ती मोठी होऊ लागली की फक्त त्यांचे सुख, भविष्य व आपण त्यांच्यासाठी जास्तीत जास्त काय करू हीच धडपड व विचार पालिकांच्या डोकयात सतत घोळत रहातात🌶 आपली परीस्थिती ऊनिवा त्यांना कळत असतात 🌶आणि आपल्या घरामुळे आपण रहातो त्या विभागाचा आपल्या मुलांना शाळा कॉलेज वा पुढे नव्या नोकरीच्या बाबीवर पडेल ही भीती ही असते🌶 तसेच नात्यांचे ही कीमान समाजात खालच्या तळागाळातील समाज नाती मजबुत टिकवून आहे🌶 वस्तीपातळी वर आजही लोक दोन तीन एकत्रीत रहातात🌶 मध्यमवर्गीय माणसंही नात्यांना धरून रहाण्याचा पुरेपुर प्रयत्न करतात🌶 म्हणूनच आपल घर हे पैपाहूणयामधये,मुलांच्या मित्रमंडळीमध्ये अडचणीचे वा चर्चेचा विषय ठरू नये 🌶यासाठी धडपडत असतो रात्रदिवस कष्ट करून पै पै जमवून निदान हप्तयाने बॅंकलोन करून का होइना नव व त्याच्या दृष्टीने सोयीसुविधांनी युक्त ऐसपैस घर घेण्यासाठी जीवाच रान करतो 🌶जन्मभर जमा केलेली पुंजी घेऊन बिल्डर बँकेत खेटे घालतो शेकडो कागद पत्र तीन चार जामीनदार याची पाच दहा वेळा खात्री करूनही रहाते सध्याचे घर पहायला ,नोकरीचे ठीकाण पाहायला बॅंकेचे लोक गुपचुप येऊन जाणार 🌶🌶त्यात अगोदर कुठे छोटस कर्ज घेतलेल असेल ते सिवील तपासणार🌶.मग कुठे जाऊन कर्ज मूंजूरी होते. 🌶🌶लोकेशन नुसार चटई क्षेत्र वा मजलयानुसार कीतीही कशीही तडजोडी व्यवहार केला तरीही कमीतकमी सातशे ते मग पुढे काही हजारोंच्या घरात चौरस मीटरचे दर वाढत जातात🌶🌶.याही पुढे खरा मोठा प्रश्न असतो तो थोडी थोडकी नाही कधी पंधरा पासून तीस वर्षापर्यंत कर्जाचे हप्ते फेडण्याचा🌶🌶.एखाद दुसरा हप्ता चुकलाच तर चक्रवाढ व्याज वसुल करणार हे निश्चित असुनही बॅंकांचे बाऊन्सर दारावर धमक्या द्यायला तयारच असतात🌶.पंरतु हे सगळं गरीब मध्यमवर्गीय, कष्ट करी प्रामाणिक इमानी कुटूंब संसार काम यात गुरफटलेलया सतत आपल्या माणसांच्या सुखासाठी झटणारया चाकरमाणयांसाठी.🌶आपल्या देशात कित्येक राजकारणी आहेत ज्यांची मालमत्ता धुळ खात पडुन राहीली 🌶आहे कदाचित यातल्या काहींना कल्पनाही नसेल आपल्याकडे कुठे व कीती व घरतील कोणत्या सदस्याच्या नावे पैसा,वा स्थावर वा जंगम मालमत्ता आहे ते.🌶आपल्या कडील बॅंका ज्या सामान्यांच शोषन करतात त्यांची मस्ती जिरवायला हे विजय मललया वा निरव मोदी सारखे कर्ज बुडवे आहेतच🌶परंतु परंतु ाहा पैसा कोणाचा?सामान्यांचाच ना.🌶.सत्तेत बसलेले लोकांनी सरकारी पडीक जमिनी माती मोल भावात विकत दुसर्याच्या नावावर विकत घ्यायच्या🌶 खोटे टेंडरस काढायचे खोटे दलाल ऊभे करायचे जनतेचा पैसा हवा तसा हवा तिकडे वळवायचा संस्था काढायच्या पुन्हा त्या विकसित 🌶करायला सर्वसामान्यांनी बँकेत जमा केलेले पैसाच कर्ज रूपाने घ्यायचा त्यातही शासकीय अनुदानात बसवायचे🌶 मग बुडवायचे संस्थांमार्फत होणारा नफाही आपलयाच घशात घालायचे हे फार मोठे रॅकेट म्हणा वा सायकल ह्याला स्थैर्य नाही 🌶हे थांबणारही नाही याला लगाम घालणारे कायदे व न्याय व्यवस्थाही बुरसट बोथट करून टाकलीय🌶 सत्तेत बसलेल्या रक्त पिपासु काही लोकांमुळे समस्त राजकीय व्यवस्था कोलमडलीय.🌶म्हणूनच काही लाखांची रोजची कमाई असलेलया तीरूपती संस्थाना च्या बनियांना एक रूपया प्रती चौरस फीट दराने अकराच काय अकराशे एकर भूखंड ही एक रुपया दराने मिळेल 🌶आणि आम जनतेला निवारा शोधायला स्व कष्टाच्या मेहनती च्या पैशाने अकराशे चौरस फुटाची सदनिका( फ्लॅट )घ्यायला हजारदा पायपीट करावी लागेल 🌶म्हणूनच वाटतंय दिसतय पिचतोय तो साधारण मनुष्य 🌶 सकाळच्या न्याहारी पासून पेट्रोल पर्यंत अंगातलया वस्रापासून निवारापर्यंत सारीकडे काॅमन मॅन ची गोची होतेय 🌶कीमान सुख त्याच्या वाटयाला कधी येईल?????मिरची अगदी बेचव सपक होती पंरतु वास्तवाचा झणझणीत पणाने डोळयात पाणी आणून मेंदूला झिणझिणया देऊन ऊपम्यात मिसळली होती हे मात्र खरे...
