तृप्ती...........
तृप्ती...........
तृप्ती तीचं नांव! नांवाप्रमाणेच तृप्त असलेली, तृप्ती जेमतेम चौथी शिकली. सर्वसामान्य साधारण गदीब कुटुंबातला जन्म. वयात आली लग्न झाले जोडीदारा बद्दल जे काही सांगितले गेले त्याच्या अगदी विरूद्ध ,ना शिक्षण ना कामधंदा, ते कमी की काय अटटल दारूडा. घरात सासू सासरे दोन दीर पैकी एक गुन्हेगारी जगतात वावरणारा, इतक्या पुढच्या पातळीवर की घरात चाकू तलवारी कोयते इ.प्रकारची हत्यार राजरोस पणे ठेवली जायची .पंधरा सोळा वयात,अशा घरातुन गलेली हि पोर जिथं पोलीस गुन्हेगारी, झेल असले शब्द नावालाहि कुणी उच्चारले नसतील. तिथ सासरी वारंवार घरी पोलीस येत तेव्हा नेमकी ही पोरगी घरात! हिला कधी दरडावून तर कधी सौम्य भाषेत दिराबददल विचारले जाई. कधी नवरा घरी असेल तर त्याला पोलीस ऊचलून नेत. ह्या पोरीला असलं हे सार थरारक होतं बर काही बोलायला जावे तर घरात हत्यार पाझरून ठेवलेली. किती दिवस हे सार चालणार काय करावे कुणाला आपली व्यथा सांगावी कांहीच समजत नव्हते.
कधी माहेरी आली तरी घरी सार ठीकच आहे म्हणायचं. का तर आपल्या गरिब साध्या भोळया आईवडीलांना दुःख. त्याहून कीतीतरी पटीने भीती वाटेल जी गोष्ट स्वप्नातही त्यांनी पाहीली नसेल अशा वातावरणात दहशतीत आपली पोरगी जगतीय, हे पाहुन आधी त्यांनीच जीव सोडला असता.हि सार सोसत राहीली सासुचे टोमणे दिराच्या अप्रत्यक्ष धमकया, सासरयाच्या शिव्या आणि हे सारे कमी की काय नवरयाचे काहीही कामधंदा न करता किंवा केलेच तर दारू पिण्याची सोय फक्त. काही बोलायला म्हणायला जावे तर मार खावा लागे वर घरातलयांची दहशत होतीच अशा कठीन परीस्थितीत दिवस काढीत होती. घरातली सारी काम करायची मिळेल ते खायच पडेल ते काम करायच.अशात पदरी दोन मुल. लहान होती तोवर कोडकौतुक झाली मात्र पोर मोठी व्हायला लागली तशी हीची धाकधूक वाढली. अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या घरात माझी मुल मोठी झाली तर! त्यांच्या आयुष्यावर नक्कीच वाईट परीनाम होणार या चिंतेने तिचं मन ग्रासल यावर एकमात्र ऊपाय होता त्या घरातुन बाहेर पडणं पंरतु कसे नवरयालाही काही बोलून फायदा नव्हता. लग्न झालयापासून तीनं पाहिल होत फकत दारु पिण्याची सोय होइल एवढीच रोजची कमाई त्याची. सासु सासरा काम करून दोन दिरांसह हिला हिच्या पोरांना आणि नवरयाला पोसत होते. त्यांचे वेगळे टोमणे ऐकावे लागत. फोटोग्राफी च्या निमित्ताने मी त्या साईडला गेले की मी तिला भेटत असे प्रत्येक वेळी तेच गुन्हेगारी पार्श्वभूमीतला दिर, दारूडा नवरा, सतत घालून पाडून बोलणारा सासरा, खाष्ट सासू पुढे मात्र खुप संवेदनाशील विचार तिला छळू लागला तो मुलांच्या बाबतीतला की जर माझी मुल या घरात वाढली तर त्यांच भविष्य काय? माझी मुलगीही माझ्यासारखीच अडाणी राहिल मुलगा गुन्हेगारी क्षेत्रातच जाइल या भितीने तीचे अश्रू थांबत नव्हते. मलाही सर्व दिसत होते तीची तगमग कळत होती पंरतु सूचत नव्हते हिला, काय व कसे समजवावे. एकदा अशीच दुपारच्या रणरणत्या उन्हात मी तिच्या घरी गेले. सहसा मी दुपारीच घरात एकटी आसताना भेटत असे. नेहमीचाच विषय सुरू झाला वेगळ रहा असेच आजही मला सांगावेसे वाटले पंरतु कशी सुरवात करावी या विचारात असताना तिनेच माझा गोंधळ दूर केला ती सरळ व आत्मविश्वासाने बोलली मी वेगळ रहायच ठरवलंय!! अवघड होत पंरतु अशक्य नव्हत अवघड यासाठी की सासु आपल्या पोराला व नातवंडांना सहजी दुर करणार नव्हती. आणि तीला भरपुर त्रास होणार आहे मानसिक, व शारीरीकही याची जाणीवही हिला होती. पंरतु आता ती मागे हटणार नव्हती. कारण सुन,पत्नी वहिनी या नात्यांच्या पुढच्या नात्यात ती बांधली गेली होती ते नातं जगातल सर्वश्रेष्ठ नात होत आईच! त्याच नात्याने तीला मजबुत खंबीर बनवलं होत. इतकं मजबूत की तिला तिच्या लेकरांच्या हितापुढे कोणिही दिसत नव्हत ना सासू दिर ना, नवरा ना कुणाच्या सहकार्याची अपेक्षा तीने केली.
घरात समजले तेव्हा आकंडताडव माजले माझी लेकर सोड तुझं तू निघ. नवरा व सासूसासरयाचा शब्द एक झाला. घरात हि एकटी विरूद्ध बाकी सगळे असे दोन गट पडले. मारहान ऊपासमार सुरू झाली. हिने पाऊल मागे घ्यायचे नाहीच पक्के केलेले शेवटी एक दिवशी दुपारी घरी कोणि नाही पाहुन दिडदोन वर्ष वयाच्या लहान मुलगा घेऊन बाहेर पडली चार वर्षे वयाची मुलीला सासू सासरे बाहेर घेऊन गेलेले नेहमी प्रमाणे. हि माहेरी आली मात्र जीव सारा पोरीमधये गुंतलेला माझी पोर काय करत असेल जेवायला दिले असेल का अंघोळ घातली असेल का? बापाने दारूच्या नशेत कुठ फिरवायला म्हणून नेली अन तिथेच सोडून आला तर असल्या भयंकर विचाराने दोन दिवस हिची तहान भूक झोप हरली का?आले मी?पोरीला सोडून जाते मी परत! जाऊ दे माझे जे व्हायच ते होईल. निदान माझी दोन्ही लेकर डोळ्यासमोर रहातील!असे म्हणून दोन दिवसात हि आठदहा वेळा परत जायला निघाली. ती खंबीर होती पंरतु शेवटी तिच्यात हळवी आई होती.खुप विचार केला कशाप्रकारे मुलीला आणावे घरी जाण्याची सोय नव्हती कारण चाकू सुरे खूण,मारामारीच्या धमक्या हेच मिळणार होत. खूप विचारांती व शांतपणे निर्णय सांगितला तिलाही पटला शेवटी मुलीसाठी ती काहीहि करायला तयार होती.ती रहात असलेल्या संबंधित पोलीस चौकीत जाऊन घाबरतच पंरतु नम्र पणे पोलिसांना सर्व हकीकत सांगितली हिच सर्व ऐकुन आणि दिराचे नाव ऐकुन पोलीस जे समजायचे ते समजले. हिला विचारलेल्या प्रश्नाच तुला परत जायचंय की नाही तिथं ,नाही हे ऊत्तर ऐकलं आणि पंधरा मिनिटात पोलिसांनी चार वर्षांची मुलगी हिच्या ताबयात दिली सोबत आणलेल्या नवरयाला समजावले नि वेगळं का रहायचं हेही पटवून दिले. पोलीसांसमोर हो म्हणण्या शिवाय पर्याय नव्हता नाहीतर पोलीसी खाकया काय असतो हे अनेकदा भावाला पकडायला घरी आलयावर तो न सापडलयाने याला ऊचलुन नेऊन पोलीसी भाषेत कसे समजावतात हा अनुभव होताच .सहाजिकच वेगळ रहायला कबुल झाला. ठीक झाल किमान दहशतीत राहण्यापेक्षा किमान चार घास कमी पंरतु सुखाने खाइल असे वाटून तीने वेगळ रहायची तयारी सुरू केली अगदी खोली पहाणयापासून संसार नव्याने जमवावा लागणार होता सासुने चमचा सुद्धा मिळणार नाही अशी स्पष्ट ताकीद दिली. आईकडून थोडेफार संसारोपयोगी साहित्य घेऊन हिने भाड्याच्या खोलीत नवा संसार सुरू केला.आता घर कस चालवायच हा मोठा प्रश्न समोर ऊभा. नवरा फक्त नावाला सोबत रहात होता बाकी दारूच्या सोयीपुरतेच पैसे रोजचे रोज मिळवुन भरपूर पिऊन घरी यायचे जेवण आईकडे करून यायचे एकंदर आपले व्यसन व पोट दोन्हीची व्यवस्थित काळजी घेत होता बायको दोन मुल काय करत असतील, खात असतील घरभाडे, रोजचा खर्च मुलांची शाळा यापैकी कसलीच फिकीर न करणारा बेजबाबदार नवरा व बाप. हिच्या पुढे कामासाठी बाहेर पडणे या शिवाय पर्याय ऊरला नाही पंरतु दोन मुल सांभाळण्याचा मोठा प्रशन ही होता चार व दोन वर्ष वयाच्या मुलांना एकट सोडून ती कशी बाहेर पडणार आणि काम नाही केल तर त्यांना काय खायला घालणार अशा दुहेरी कोंडीत सापडली आणि तीची कमजोरीच ताकद बनली नवरयाला स्पष्ट बजावले तुला आमच्या सोबत रहायचे तर घरी बसून मुलांचा सांभाळ कर मी काम करते. मग नवरा घरात अन हि कामासाठी बाहेर असा विरूदध संसार सुरू झाला काळाने आपले काम चोख केले दिवस,सरत गेले मुल मोठी झाली. हिने दिवसातले बारा चौदा तास काम करून संसार पुढे रेटला घर,मुलांच शिक्षण सांभाळत.स्वता कधी ऊपाशी तर कधी अर्धपोटी राहून थोडा थोडा पैसा गाठीशी जमा करून छोटेसा का होइना हककाचा निवारा मिळवला...............जीडीदार फकत नावालाच आणि नातेवाइक हळहळ करणयापुरते संसाराचा गाडा तिने एका चकावर पुढे हाकत आणला नवरा आजही तीच्या जीवावर बसुन खात आहे. मुल उच्च शिक्षण घेत आहेत ती पहात आलीत लहानपणापासुन आईने केलेले कष्ट तयांचासाठी त्यांच्यासाठी रात्र दिवस राबराब राबली आई तिच्या नवरयाला नाहि कीमान मुलांना तरी याची जाणिव राहिल का?आपल्या अवतीभवती अशा कितीतरी तृप्ती वावरतात त्याचे प्रत्येकीचे प्रशन अडचणी निरनिराळ्या असतात.परतु त्याची मानसिकता अशी असते की स्वताःला कितीही त्रास झाला तरी आपल्या मुलांना नवरयाला एकुनच घरातल्या प्रत्येक सदस्यांच्या सुखांतच त्या तृप्त असतात आणि हि तर मी अगदी जवळून पाहीलेलं वास्तव आहे.
