ANJALI Bhalshankar

Abstract Others

2  

ANJALI Bhalshankar

Abstract Others

अज्ञात निर्माण कर्ता......

अज्ञात निर्माण कर्ता......

4 mins
30


होय! माझी देव या मानसांनी आपापल्या सोयींसाठी निर्माण केलेल्या व निर्जिव दगडात वसवलेलया संकल्पनेवर विश्वास नाही.पंरतु माझ्या मनात आस्था नाही असेही नाही!!.माझ्यातील संस्कार सदगुण नितीमुलय सृजणशीलता सत्य व सदाचार मला आतुन, घाबरवतात परावृत्त करतात अन्याय अत्याचार असत्य कर्म व कुटनीती कपटीपणावर मात करायला. देवळात माझे मन कधीच रमत नाही !रमनार नाही! तिथे झुकणारया,हात जोडणारया मुखवट्यांना पाहील कीव व राग व प्रश्न उपस्थित होतो दांभिकपणाचा, श्रदधेचा बाजार मांडणारया,देवधर्माच्या आड आपापल्या स्वार्थ साधून घेणारया, विश्वस्तांचे नि भक्त म्हणून घेताना जातीपातीचा ऊदो ऊदो करून जिवंत मानसांना लहान व तुच्छ लेखणारयांना खरच माणुस म्हणाव का?भक्त म्हणावे का? नवजात जीवाचा जन्म, निळ आभाळ, सुंदर समुद्र, हिरवी गर्द झाडे, पक्षांचा किलकिलाट, निसर्गाच संगीत, हवेची मंद झुळुक, गार वारा उन्हाच्या झळा मग पावसाची हलकी सर, भरून आलेले ढग, पहीला पाऊसातला मातीचा सुवास दाट झाडीतलया इवली घरटयातली गुणगुण सकाळच कोवळ ऊन.हे कितीतरी पटीने सुखकारक आल्हाद दायी व अस्था निर्माण व्हायला मजबूर करणार! त्या सृष्टीच्या अज्ञात निर्माण कर्तयाच्या अगाध अपंरपार देणगीसाठी ऊभा जन्म नतमस्तक व्हायला जीवनावरची जगणयावरची श्रद्धा व दृष्टीकोण बदलायला व विचार करायला लावतं नककीच निर्माणा कर्ता भेदभाव करणारा असेल का?जन्म मृत्यू. जल वायू आभाळ पृथ्वी अग्नी पंच तत्व तर सारयांसाठी समान निर्मिली न.त्याने मग माणसाला कसला गर्व?कशाचा अभिमान.पैशाने श्रीमंत असणारा प्रत्येक जण मनान तितकाच मोठा असेल वा गरीब असणारा हलक्या विचारांचा निरबुद्धच असेल का मग गोरया कातडीतला माणूस पांढर्या शुभ्र मनाचा असेलच व काळया रंगाचा अशुद्ध व वाईट विचारांचाच असेल काय?माणसाने दगडाला फकत आकार दिला मग आपलयाला हवा तसा दगडांचा बटवारा केला सोयीनुसार रंग रूप धर्म आकार रीती रीवाज पंरपंरा चालीरीती पुजा विधी यज्ञ, हवन यात्रा जत्रा उत्सवाची रूपे दिली.वस्तु सह मनांचाही व्यापार सुरू केला भावनांचा बाजार मांडला धर्म नीतीची भूमिका ज्याने त्याने आपापल्या तत्वावर मांडली.सुर्याची कोवळी किरण दाही दिशा ऊजळुन टाकतात चंदर आपल्या शितल प्रकाशन काळोखाला दुर करतो वारा पाणी हवा भेदभाव करीत नाहीत असा माणसं दगडांना आकार देऊन मुर्ती घडवतात डोकी आपटत बसतात कल्पनेच्या झापडांवर श्रदधेचे मनोरे रचत बसतात.आपला संघर्ष,परीस्थिती, अडचणी दुःख, निराशा सारयांची गारहाणी मांडत रहातात.माहिती नाही कीती माणसं यातुन सावरतात.पंरतु मानसाला या सारयातुन सावरायला जर माणूस मदत करीत आसेल माणूस घडवायला माणूस कारणीभूत होत असेल तर माझी नीतिमत्ता मला सांगेल मंदीरातलया निर्जिव दगडापेक्षा त्या माणसांवर श्रद्धा ठेवण कधीही श्रेष्ठ होय!माणसाने मानसावर श्रद्धा ठेवावी याला कारण होणारी कीती लोक असतात या जगात?ऐशोआरामाचे जीवन जगताना समाजातल्या भीषण दारिद्र्याची वास्तवाची विसंगतीची गरजांची दुःखाची जाण ठेऊन मानसान माणसावर प्रेम दया व सहानुभुती दाखवून स्वता साठी जगताना इतरांचा विचार काही अंश मात्र जरी केला तरीही तो अंश कुणाच्या तरी जीवनात आनंदाची फुलबाग निर्माण करू शकते. तो खरा श्रेष्ठ निर्माता म्हणता येइल जो शेवटच्या टप्प्यावरील ऊधवस्त जीवनाला चैतन्याचा दिलासा देऊन नव्या आशा पललवीत करतो.मग देवळात देव शोधायची आवश्यकता ऊरेल काय?आपण अविरक्त राहायच, मोह माया लालच खोटेपणा, स्वार्थी, व फसवणूक, वृत्ती, हव्यास ,आणि असंयमी, उतावीळ नाटकीपणा निरदयी,अमानुश रीतीने जगात वावरायचे अवैद्य अनीती चोरी व्यभिचार, गुन्हे करायला सिद्ध व्हायच कारण या सारया पापांवर जालीम मुक्तीचे ऊपचार दानपेटीतलया दानाने व नदीवरचया स्नानाने होतात.देव नावाच्या कल्पनेच्या शकतीशी सरळ समोरासमोर संवाद कधीच साधता येणार नाही. हे ही माहीत असतं व आपल्या प्रत्येक कृतीला आपण स्वःताच जबाबदार असतो दयाळू व संस्कृत माणसाला.आपले गुणअवगुण नीतिमत्ता माहित असते त्याला परमेश्वर या सःकलपनेची भीती व शोध व अंध विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही वाटत कारण त्याला आपले मोल व मुलय परीणाम गुणधर्माची पावती सजिवा कडूनच मिळत असते.आपणच श्रेष्ठ आहोत असे म्हणून माणसाला दाबून टाकायचे खोटे नितिनियम व फसव्या निती मूल्यांची जपणूक रूजवून माणसाचं स्वतंत्र हिरावायच.देवाची भीती घालून अज्ञानाच्या अंधकारात अडाणी व निरबुद्ध ठेवायच सांस्कृतिक व धार्मिक परखड विचारात माणसाला घटट रूतवून त्याला झेप घेणयापासून थांबवायचं हा कुठलया देवाचा? न्याय ऊलट जगण्यासाठी बळ लागत ऊडणयासाठी मनाचे बळकट पंख लागतात व्यकत होण्यासाठी वैचारीक आणि मानसिक संचित लागत परस्परांना सहकार्य परिश्रम व संघर्षाला साथ मिळाली तर आयुष्याचा अर्थ स्वःताच माणूस शोधायला लागणार नाही काय? मग मंदिराची गरज काय?मंदीरातलया दगडांचा उद्देश काय?आणि या सारयांना मजबूत आधार देणारया भक्कम दांभिक व्यवस्था कशाला?याच्या आड दडलेलया मूठभर लोकांना प्रचंड मोठ्या समुदायांवर खोटे कायदे नितीमूल्य थोपवून राज्य करायला?सत्ता गाजवायला?की गुलाम बनवून ठेवायला?आपली जाचक अन्यायी व ढोंगी कार स्थाने रचुन अज्ञानात खितपत पाडणयासाठी?असेल तर मी कधीही मंदीरात जात नाही हयाचा मला अभिमान आहे उलट माझ्या अर्थ शुन्य जीवनात जगण्याची उमेद धडपडणयाची हिम्मत,गेलेला आत्मविश्वास संघर्षमयी जीवनाला प्रेरणा व प्रवास सुलभ करणारया व्यकतीबद्दल मी नितांत श्रद्धा आदर ठेउन माझ्यावरील विश्वासाला सार्थ करण्यासाठी अथक प्रयत्न करीत राहीन मात,मात्र देव ही संकल्पना कधीही मान्य करणार नाही...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract