STORYMIRROR

Vasudha Naik

Abstract Others

2  

Vasudha Naik

Abstract Others

जादुई झप्पी

जादुई झप्पी

3 mins
64

जादुई झप्पी...


  गेली 34 वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत आहे. कायम चौथीचे वर्ग होते. मुले मोठी होती. मुलांना जरा समज होती. स्कॉलरशिप, टी. म.. वी. अशा बाह्य परीक्षा होत्या. मुलांना शिकवायला मजा यायची. त्यातून बौद्धिक खाद्य द्यायला म्हटलं की आनंद व्हायचा. मराठी बुद्धिमत्ता गणित हे तीनही विषय माझे लाडके विषय आहेत. मुलांना समजेपर्यंत शिकवण हा माझा धर्म. मुलांची अक्षर सुधारणे,लेखन स्वच्छता ठेवणे यासाठी विशेष प्रयत्न करणं मला नेहमीच आवडते. वर्गात विविध उपक्रम राबवणं आणि त्याद्वारे मुलांना शिक्षण देणं हे देखील माझ्या अत्यंत आवडीचे काम. शैक्षणिक साहित्य निर्मिती करून मुलांना त्याद्वारे शिक्षण देणं हे अत्यंत आवडीचं काम. यामुळे या शैक्षणिक साधनाच्या द्वारे शिक्षण देताना मुलं अभ्यासात रममाण होतात. दृकश्राव्य साधनांमधून ते प्रभावशाली शिक्षण घेतात. हा अनुभव गेले तेहेतीस वर्षांचा आहे.

   आता इयत्ता पहिलीचा वर्ग आहे. या मुलांच्या मनावर बोधकथेतून संस्कार करणं अतिशय साधा आणि सोप आहे. मुले ही निरागस मनाचे असतात. त्यांच्या मनात आपण जे रुजू त्याची पेरण होते आणि त्यातलं मौलिक असे विचार त्यांच्या मनातून साकार होतात. मनातून आलेला प्रत्येक शब्द त्यांचा हा विचार करून आलेला असतो. म्हणतात ना शब्द हा विचाराचा पुत्र आहे. त्याचप्रमाणे या मुलांना लहानपणापासून आपण संस्कारक्षम कथा सांगून त्यांच्या मनावर जादुई शब्दांची पेरणी केली असता त्यातून उगवणारा प्रत्येक विचार आपला चांगलाच असतो. हे प्रत्यक्ष मी गेली अनेक वर्ष अनुभवत आहे.

  बाईंचे शब्द मुलं खाली पडू देत नाहीत. बाई जे म्हणतील ती पूर्व दिशा असते. घरी सुद्धा जर का मुलांना काही पटले नाही तर सरळ म्हणतात आमच्या बाई असंच सांगतात. बाईंवर मुलांचे अति प्रेम असते, याचा अनुभवाचे काही उदाहरणे तुम्हाला मी आता सांगते.

  पहिलीची एक छोटी मुलगी नटून थटून आवरून यायची. स्वच्छ अंघोळ करून,छान केस विचारुन,शाळेचा छान गणवेश घातलेला,मस्त आवरून यायची.

   पण शाळेमध्ये येऊन पाच मिनिट झाले की तिला तिच्या आई-बाबांची आठवण यायची, आणि ती खूप रडायला लागायची. स्वतःच्याच गालावर ओरखाडाची, गाल लाल करायची. स्वतःला मारून घ्यायची. मग हे रोजचे झाले. तीन शाळेत यायचं मी पालकांना फोन करायचा आणि पालकांनी तिला घेऊन जायचं. तिसरा महिना शाळेचा उजाडला तरी देखील ही शांत बसायला तयार नाही. अनेक उपाय करून झाले रागवून झालं चिडून झालं खूप गोड बोलून झालं तिला काही काही कारणास्तव बक्षीस दिली गेली. चॉकलेट्स गोळ्या बिस्कीट दिली गेली थोडावेळ ती शांत बसायची पण ती नंतर काही केल्या ऐकत नसायची. सर्व शिक्षक देखील त्तिला समजावून सांगायचे. पण ही अजिबात ऐकायची नाही. बरे ती शाळा संपेपर्यंत रडत बसायची. आणि सारखं बाई माझ्या बाबांना फोन करा बाई माझ्या बाबांना फोन करा. त्यांना बोलून घ्या. माझा मोबाईल घेऊन मोबाईल वरती स्वतः नंबर टाकून ती स्वतःच्या वडिलांशी बोलायची. आई वडील पण त्रासले होते तिच्या या वागणुकीला. पण अतिशय लाडाची त्यांची ही लेक तिला शाळा नको होती असे काही नव्हते. पण का कोण जाणे तिला वर्गात आलं की नको वाटायचं.

  पेपरच्या वेळी मात्र यायची बसायची पेपर लिहायची आणि जायचे. हे मात्र ते फार छान करत असेल. वाढदिवस असला की गिफ्ट घेण्यापुरता रडायचं बंद. गिफ्ट घेतलं की परत रडणं चालू. अशी ही माझ्या वर्गातली छोटी मुलगी प्रथम सत्राला शेवटच्या दिवशी तिने जरा माझे दोन धपाटे खाल्ले.आई वैतागलेली होती. जरा मलाही चीड आली होती. ती रडायची काही बंद झाली नाही. तिचे अजूनच रडू वाढले. तिच्या बाबांना फोन करून बाबांना बोलावून घेतले आणि तिला घरी पाठवून दिले.बाबा पण तिच्या या वागण्याला कंटाळले होते. पण खूप लाडात वाढत होती त्या मुळे ते यायचे आणि तिला घेऊन जायचे.

   दिवाळीची सुट्टी संपून दहा दिवस झाले. वर्ग नियमित चालू झाले. तरीही तिचा पत्ता नव्हता वर्गामध्ये येण्याचा. शेवटी फोन करून पालकांना विचारून तिला बोलवून घेतले.

   ही छोटी वर्गात आली. माझ्या कमरेला विळखा घातला. खूप गोड हसली. आणि म्हणाली " बाई किती छान दिसताय मला तुमची खूप आठवण येत होती. मला तुम्ही खूप आवडता. "

 मी बोलले अगं मी तुला धपाटे घातले होते ना! आता रडणार नाहीस ना तू बाळा. ती हसली. नाही म्हणाली.मी तिला जादुई झप्पी दिली.अशी जादुई झप्पी मुलांना नेहमी दयावी. या जादुई झप्पी मधे खूप ताकद असते. ती लहान थोर सर्वांनाच हवी असते. यामुळे मानसिकता बदलते.

  इथे मुलांची निरागसता दिसून येते. नंतर काहीही मुलगी रडली नाही. पण आली की थोड्यावेळ रडायची तिला जादुई झप्पी द्यायची आणि मग ती शांत बसायची. जरा सहा महिन्यांनी त्याचा मोठी झालेली होती त्यामुळे तिला कळत होते.

 आपल्याच माणसांना जादूची झप्पी नेहमी द्यावी त्यामुळे आपल्या नात्यांमध्ये खूप फरक पडतो.


 वसुधा वैभव नाईक,पुणे


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract