STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

नाती

नाती

1 min
5

काय असतात बरं ही नाती...
 काही मनापासून जोडलेली असतात,तर काही सहज तोडलेली असतात...
 काही जिवाभावाने जपलेली असतात, तर काही नुसतेच नावापूर्वी उरलेली असतात...
 काही नाती प्रेमासाठी जपलेली असतात, तर काही बांडगुळासारखे दुसऱ्याच्या जीवावर वाढलेली असतात...
 काही नाती बिनधास्त सगळ्यांच्या समोर मांडलेली असतात, तर काही भीतीपोटी गुपितच ठेवलेली असतात...
 काही नाती मैत्रीचं नाव पुढे केलेले असतात, तर काही त्या पुढील प्रेमाच्या गावी पोहोचलेली असतात.....
 काही नाती प्रेमाच्या गावी जाऊन ओझ्याखाली वाहिलेली असतात, तर काही ओलाव्यासारखी जपून ठेवलेली असतात...
 काही नाती नकळत मनाशी जुळलेली असतात, तर काही नाती स्वतःचाच अस्तित्व हरवलेली असतात... काही नाती नुसतीच नावापुरती असतात, तर काही उराशी जिवापाड सांभाळलेली असतात....
 काही नाती मनसोक्त एकमेकांसोबत बागडलेली असतात, तर काही अपमानाच्या ओझ्याखाली दबलेली असतात...
 काही नाती सोन्यासारखी अनमोल ठरलेली असतात, तर आहे नाती भंगारासारखी विकायला काढलेली असतात...
 काही नाती गोत्यात आणणारी असतात, तर काही नाती संकटात मदत करणारी असतात...
 कशी आहेत ना ही नाती काही मनापासून जोडलेली, तर काही सहज तोडलेली.... वसुधा वैभव नाईक, पुणे मो. नं. 9823582116


Rate this content
Log in