योगायोग
योगायोग
योगायोग... / Universe..
जीवनातील काही माणसे आता व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी या तांत्रिक युगामध्ये योगायोगाने खरंच मिळत आहेत.
या माणसांच्या माध्यमातून आपण काय घ्यावे हे आपण शिकले पाहिजे. कोणताही माणूस वाईट नसतो. पण त्याचे विचार त्याला वाईट कर्म करायला लावतात. जसे विचार तसे कर्म बाहेर पडते.
योगायोगानं चांगल्या विचाराची व्यक्ती या माध्यमातून खरच मिळते. याचा मलाही प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे.
योगायोगाने मिळालेल्या या व्यक्तींचा आदर करावा. त्यांना आपल्या जीवनात स्थान द्यावे. त्यांच्याशी छान संबंध प्रस्थापित करावेत.
योगायोगाने मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीशी मैत्री करताना तो खरच मैत्री करण्यासारखा आहे का याचीही आपण खात्री करावी.
एखाद्याला फक्त आपली मैत्री हवी असते ती बोलण्यासाठी, कोणाला प्रेमाची भाषा बोलण्यासाठी, कोणाला मनातील दुःख कथन करण्यासाठी तर कोणाला आणखी कशासाठी..
म्हणून अशा तंत्रयुगीन क्षेत्रातून मिळालेली मैत्री तपासूनच मग त्यात पुढे जावे. पण एखादा किंवा एखादी खरेचच खूप गोड असतो/ असते. आपले विचार आहे पटतात एकमेकांना. चांगल्या पवित्र विचारांची देवाण-घेवाणही केली जाते.
मानसिक आधाराची गरज लागल्यास आपल्याला मानसिक आधारही दिला जातो. अशा योगायोगाने मिळणाऱ्या मैत्रीला खरच सलाम आहे. आणि हे मैत्री मात्र टिकवून ठेवावी. अशी माणसं एकमेकांच्या जीवनात येऊन एकमेकांच्या अंतरात घर करून बसतात.
यालाच असं म्हणावं लागेल योगायोग नव्हे तर ही तर ईश्वरी देणगी आहे.
आपले मन लागणारी व्यक्ती मिळाला तर त्यास सांभाळा. मन जपा. आनंदी ठेवा. एकमेकांचा आदर ठेवा.
वसुधा वैभव नाईक, पुणे
