STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

रस्ता शांत नाही

रस्ता शांत नाही

2 mins
5

*रस्ता शांत नाही*

 सो गया ये जहाँ सो गया आसमा सो गयी है मंजिले पर सोया नही रस्ता..., अनिल कपूर आणि माधुरी यांच्यावर चित्रित केलेले हे गाणे. हे गाणे लिहिले आहे यातील एक शब्द मी बदलला आहे ती म्हणजे शेवटची ओळ 'सो गया नही रास्ता.' हे लिहिण्यामागे एक कारण आहे. दिनांक 16/11/2025 रविवार आम्ही घरातून पहाटे तीन वाजता नाशिकला जाण्यास निघालो. सप्तशृंगी गडावर आमचा युवा क्रांतीचा कार्यक्रम होता. पूर्ण महाराष्ट्रातून लोक येत होते. काही आदल्या दिवशी जाऊन राहिले तर काही पहाटे निघाले होते. हे सांगण्या मागचा उद्देश हाच आहे की, पहाटे तीनला जरी आम्ही निघालो तरी रस्ते फुल गाड्यांनी वाहत होते. एका ठिकाणी आम्हाला ट्रॅफिक जाम लागले. सुटका झाली पाच मिनिटात पण तरी पहाटे हे पाहून आश्चर्य वाटले. रस्त्याच्या कडेची काही हॉटेल पण उघडी होती. म्हणजे प्रवाशांच्या चहाची व्यवस्था आणि नाश्त्याची व्यवस्था होती. प्रवासाला पुण्यातून सुरुवात केली. पहाटेचे धुके,थंडगार वारे, निसर्गाची किमया न्यारी दिसत होती.मन प्रसन्न होत होते. सप्तशृंगी गडावर जाताना पहाटेचे ते सूर्य उगवतानाचे दृश्य मनात घर करून बसले. मस्त व्हिडिओ शूट केले.फोटो काढले. पहाटेचा सूर्य कॅमेऱ्यात कैद केला. निसर्ग कैद केला. गाडीमध्ये मॅप लागलेला होताच. सप्तशृंगी गडावर आम्ही साधारण पावणे अकरा,अकरा वाजता पोहोचलो. युवा क्रांतीचे संस्थापक, अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि सदस्य हजर होतेच. दारात रांगोळ्या, वासुदेवाचे आगमन, दीपप्रज्वलन, सर्व पदाधिकाऱ्यांचे मनोगत, संस्थापक अध्यक्ष यांचे मार्गदर्शन पर भाषण उत्तम झाले. जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही परत निघालो. सप्तशृंगी मातेचे दर्शन घ्यायला जाणार पण खूप मोठी रांग पाहून आम्ही ते कॅन्सल केले. पुण्याला परत यायचे होते. आता परतीचा प्रवास सुरू झाला. साधारण पाच वाजता आम्ही शक्यतो सप्तशृंगी गडावरून निघालो. चहापाण्यासाठी एकदोन ठिकाणी थांबलो. आणि साधारण घरी येण्यासाठी आम्हाला पहाटेचे दोन वाजले. पहाटे तीनला निघताना जी रस्त्यांची अवस्था होती खूप गाड्या रस्त्यांवर धावत होत्या तसेच या मध्यान्ह वेळी सुद्धा गाड्या धावतच होत्या. मग सहज मनी विचार आला आपण सजीव आहोत आपल्याला आरामाची गरज आहे. हा निर्जीव रस्ता असेल तरीसुद्धा त्याला शांतता हवी, रस्त्याचे मन छिन्नविचिन्न होत असेल. रस्ता असा विचार करत असेल की" काय हा मानव आहे स्वतःच्या हितासाठी माझा किती वापर करून घेतोय. तो म्हणत असेल अरे हे मानवा तू सजीव आहेस तू झोपतो दिवसात सात, आठ तास मला शांतताच नाही आणि मी किती तुझा भार सहन करू.तुझ्या गाड्यांचा भार सहन करू. आणि मग एक दिवस माझाही तोल सुटतो." रस्त्याला चीरा, भेगा पडतात. खड्डे पडतात. पावसाने काही रस्त्याचे नुकसान होते... असे अगदी सहज सर्व चित्रस्वरूपात डोळ्यासमोर आले. अशा विचारांच्या गर्तेतच या लेखाची निर्मिती झाली.पहा पटतंय का?? नाळ रस्त्याची मानवाबरोबर तुटता तुटेना, मानवांच्या गाड्यांचा भारही रस्त्याला सोसावेना, मिळूदे शांतता रस्त्याला काही तास रस्ता बंद ठेवून पाहू दोन तास, करमेल का रस्त्याला मानवावाचून, मानवाला या रस्त्यावाचून.... वसुधा वैभव नाईक, पुणे मो. नं. 9823582116


Rate this content
Log in