किस डे
किस डे
*किस डे*
किस म्हणजे चुंबन. गोड निरागस पापी. आणि लहान बाळाची पापी म्हटलं की ही अशीच असते.
आई आणि बाबा आपल्या बाळाची पापी घेतात हा तर दररोजचा किस डे च आहे. यातून बाळाबद्दलची काळजी,प्रेम, माया दिसून येते.
किस डे हा दिवस प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी व्यक्त करण्याचा प्रतिकात्मक दिवस आहे. ओठांनी केलेला गालाला अथवा ओठांना केलेला हळुवार स्पर्श हा भावना व्यक्त करतो.
किस हा एक स्नेह आणि निरागस भावना जपण्याचा भाग आहे.किस एकमेकांबद्दल सन्मान, विश्वास, समजूतदार पणा जपतो. नाते मजबूत करतो.
प्रेम व्यक्त करताना मात्र समोरच्याची संमती आणि भावना यांचा आदर तेवढाच महत्त्वाचा आहे.
सर्व प्रेमवीर हल्ली लगेच जवळ येतात. किस घेऊन रिकामे होतात. पूर्वी मर्यादा असायच्या. स्वतःच्या बायकोला अथवा नवऱ्याला सुद्धा चोरून भेटावे लागे. मग किस तर कोसो दूरच राहिला. पण मजा यायची.
आजारी माणसाचे सांत्वन करताना त्याच्या कपाळावरचा एक किस त्याला आनंद देऊन जातो. अशा कितीतरी घटना सांगता येतील.
ओठांवरती अलगद स्पर्श
मनी फुलती गोड हर्ष...
शब्दविना भावना बोलकी होते
मनाची कथा सांगून जाते...
असते ही लाजऱ्या क्षणाची हूल
डोळ्यात असते स्वप्नांची चाहूल...
हातात हात, विश्वासाची साथ
राहती नेहमी एकदिलाने, एकसाथ....
खुलतो हा प्रेमाचा दिवस खास
मोदाने भरवी एकमेकांना घास..
वसुधा वैभव नाईक, पुणे
मो. नं. 9823582116
