STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

सामाजिक योगदान

सामाजिक योगदान

4 mins
4

*सामाजिक योगदान*
 सामाजिक योगदान म्हणजे समाजाच्या प्रगतीसाठी, कल्याणासाठी आणि विकासासाठी केलेले निःस्वार्थ कार्य होय. प्रत्येक व्यक्ती समाजाचा एक भाग असतो आणि त्या व्यक्तीच्या कृतींमुळे समाजावर थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. म्हणूनच सामाजिक योगदान हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य मानले जाते. समाज म्हणजे फक्त लोकांचा समूह नसून, त्यात परस्पर सहकार्य, आपुलकी, जबाबदारी आणि संवेदनशीलता या गोष्टींचा समावेश असतो. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन इतरांच्या भल्यासाठी काम करते, तेव्हा त्याला सामाजिक योगदान म्हणतात. प्रत्येक जण सामाजिक योगदान करतोच असे नाही. किंवा करावे असेही नाही. पण सामाजिक बांधिलकी बांधिलकी मात्र जपायला हवी. सामाजिक योगदान अनेक प्रकारे करता येते. काही लोक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करतात. गरीब मुलांना शिक्षण देणे, शाळा उभारणे, मोफत पुस्तके वाटप करणे, हे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे.मुलांच्या भावना समजून घेणे महत्वाचं आहे. त्यांच्या प्रत्येक कृतिकडे लक्ष देणे गरजेचे असते. मी स्वतः मुलाच्या समस्या समजून घेते. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करते. वयात येणाऱ्या मुलांच्या अनेक समस्या असतात. मी मुलांना समजावून सांगते म्हणून मुलं माझ्याशी बोलतात. मनातले सांगतात जे आईवडिलांना सांगू शकत नाहीत ते मुलं माझ्याशी बोलतात. मन मोकळ करतात आणि त्यांना योग्य मार्ग सापडतो. अशा अनेक केस मी सोडवल्या आहेत. आणि लेख स्वरूपात लिहिल्या आहेत. इतरांना त्या मुळे प्रेरणा मिळते. आरोग्य क्षेत्रात केलेले योगदान देखील महत्त्वाचे आहे. गरिबांना मोफत वैद्यकीय सेवा देणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे, रक्तदान करणे, अवयवदानाबद्दल जनजागृती करणे, ही सर्व कार्ये समाजासाठी उपयुक्त आहेत. निरोगी समाज हा प्रगतीचा पाया असतो. सध्या मी आरोग्य शिबिराचे नियोजन करत आहे. माझी वसुधा फौंडेशन आहे त्या द्वारे हा उपक्रम चालवावा ही संकल्पना सुरु करत आहे. पर्यावरण संरक्षण हे आजच्या काळातील गरजेचे आहे.कोरोना काळातील प्राणवायू पुरवठा कमी असल्याने खूप लोकं गेली हे सर्व ज्ञात आहे. त्या साठी झाडे लावणे, ती वाढवणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य झाले आहे. मानवाची जबाबदारी वाढली आहे."वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे " हा तुकाराम महाराजांचा अभंग खूप काही सांगून जातो. मी दर तीन महिन्याला 6 रोपे वाटते. त्याचे संगोपन करतात की नाही ते पाहते. मी स्वतः, माझी टीम झाडे लावते, जगवते.प्रचार करते. "झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण सांभाळा. " तसेच पाणी वाचवणे प्लास्टिकचा वापर कमी करणे,कुठेही न टाकणे, स्वतः स्वच्छता राखणे इतरांना करायला लावणे.यामुळे पर्यावरण टिकून राहते. "स्वच्छ भारत" सारख्या उपक्रमांमुळे लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी हे करावेच. महिलांचे सशक्तीकरण हे देखील एक महत्त्वाचे सामाजिक कार्य आहे. महिलांना शिक्षण, रोजगार, स्वावलंबनाच्या संधी देणे, त्यांचे हक्क जपणे, यामुळे समाजात समता निर्माण होते. महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे.यासाठी वसुधा फौंडेशन कार्य करते. मी पोलीस मित्र आहे. महिलांच्या अनेक समस्या माझ्याकडे येतात त्या सोडवते. कोणी समोरच्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फसते. कोणी त्याच्या जाळ्यात फसते. कोणावर अतिप्रसंग येतात. त्या नंतर काय? असे अनेक प्रश्न असतात या महिलांचे. अशा सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते कधी पोलिसांची मदत पण घ्यावी लागते. गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे हेही सामाजिक योगदान आहे. अन्नदान, वस्त्रदान, निवाऱ्याची सोय, अनाथ मुलांची काळजी घेणे, वृद्धाश्रमात सेवा करणे, ही कार्ये मानवतेचे प्रतीक आहेत. मी आपुलकी वृद्धाश्रम ( आळंदी ), निवारा वृद्धाश्रम ( धनकवडी ), अनाथ मुलांचा मानवसेवा आश्रम ( पाथर्डी ), मूक बधिर मुले शाळा ( बारामती ), आदिवासी मुली ( टिळक रोड )इत्यादी ठिकाणी भेट दिली आहे. त्यांना जेवण खर्च, शैक्षणिक साहित्य, धान्य या स्वरूपात मदत केली आहे.मला जे आणि जसे जमेल तसे मी करत असते.बऱ्याच शाळांना भेटी देऊन त्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप केले आहे. यात सर्व नामवंत शाळा आहेत. युवकांची भूमिका सामाजिक योगदानात अत्यंत महत्त्वाची आहे. युवकांनी समाजासाठी वेळ द्यावा, सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, नवीन कल्पना मांडाव्यात, आणि सकारात्मक बदल घडवून आणावा.देशाचे ते उत्तम नागरिक आहेत. देशाचे भवितव्य त्याच्या हाती आहे. सामाजिक योगदानासाठी मोठे कामच करावे लागते असे नाही. लहान लहान गोष्टींमधूनही मोठा बदल घडू शकतो. जसे की, रस्त्यावर कचरा न टाकणे, वाहतुकीचे नियम पाळणे, इतरांना मदत करणे, प्रामाणिकपणे वागणे, खोटे न बोलणे, मोठ्यांचा आदर राखणे, उलट उत्तरे न देणे, गुरुजनांचा आदर ठेवणे ही देखील सामाजिक बांधिलकी आहे. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर करूनही सामाजिक योगदान देता येते. योग्य माहिती पसरवणे, समाजातील समस्या मांडणे, जनजागृती करणे, हे सर्व शक्य आहे. मात्र, चुकीची माहिती पसरवणे योग्य नाही. दि. 12/04/2026 ला मिसिंग केस आली. अगदी काही तासात ते आजोबा त्यांच्या घरी होते. असेही माझे सामाजिक कार्य आहे. पण एकटी नाही तर टीमने काम करणे महत्वाचे आहे. सामाजिक योगदानामुळे मनाला आनंद मिळतो. समाधान मिळते. इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणणे, त्यांच्या आयुष्यात बदल घडवणे, हीच खरी कमाई आहे. पैसा आणि संपत्तीपेक्षा माणुसकी मोठी असते. " माणसाने माणसाशी माणसासम वागणे "ही प्रार्थना अगदी उत्तम आहे या प्रमाणे आपण सर्वांनी वागावे.अनेक जणांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग करून समाजाच्या कल्याणासाठी काम केले.स्वातंत्र्य पूर्व काळ पाहिला तर संत, शिवाजी महाराज, देश रक्षणार्थ लढणारे सर्व अशी अनेक उदाहरणं देता येतील त्यांच्या कार्यामुळे आज आपण एक चांगल्या समाजात जगत आहोत. आपणही आपल्या परीने समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. प्रत्येकाने एक छोटी जबाबदारी घेतली, तर समाजात मोठा बदल घडू शकतो. "मी काय करू शकतो?" या प्रश्नापेक्षा "मी काय करणार?" हा विचार महत्त्वाचा आहे. जन्म घेतला मानवा समाजात समाजाचे ऋण फेडूया समाजाची सेवा करून स्वतःचा आनंद शोधूया... वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा - पुणे मो. नं. 9823582116


Rate this content
Log in