STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

प्रेमाची ताकद

प्रेमाची ताकद

2 mins
10

*प्रेमाची ताकद*

 प्रेम हा अडीच अक्षरी शब्द आहे. पण त्या शब्दात ताकद आभाळाएवढी आहे. प्रेम ही जगातील सर्वात सुंदर आणि प्रभावी भावना आहे.ती व्यक्ती परत्वे बदलत जाते.म्हणजे नातेसंबंध या नुसार... प्रेमामुळे माणसाच्या जीवनाला नवा अर्थ मिळतो. ते नात्यांना घट्ट बांधून ठेवणारा अदृश्य धागा आहे.वीण आहे. प्रेमात स्वार्थ नसतो, तर त्याग आणि समर्पण असते.एकमेकांना सुख देण्याची भावना आहे. आई-वडिलांचे प्रेम मुलांना योग्य संस्कार देतात.शिस्त लावतात.समाजात कसे वागायचे याचे ज्ञान देतात. मित्रांचे प्रेम संकटात आधार बनते.संकट समयी कामास येतो तो खरा मित्र असे म्हणतात. प्रेमामुळे मनातील कटुता आणि द्वेष दूर होतो.वाईट भावना निघून जातात. चांगल्या भावना निर्माण होतात.प्रेम माणसाला संवेदनशील आणि दयाळू बनवते. प्रेमाच्या बळावर अनेक अडचणी सहज पार करता येतात.संकटाना तोंड देता येते. एकट्या माणसाचा धीर खचून जाईल पण सर्वांनी एकमेकांना साथ दिली तर संकटाचा सामना करत प्रेमाने जग जिंकता येते. असे नेहमीच म्हणतात. समाजात शांतता आणि बंधुभाव निर्माण करण्याचे सामर्थ्य प्रेमात आहे.प्रेम द्यावे आणि घ्यावे. प्रेम माणसाला माणुसकीची, बंधुत्वाची जाणीव करून देते. खरे प्रेम विश्वास आणि आदरावर टिकून असते. प्रेमामुळे जीवन अधिक सुंदर आणि आनंदी होते. जिथे प्रेम असते तिथे आनंद आणि समाधान नांदते. म्हणूनच प्रेम ही मानवजातीची सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक नात्यातील प्रेम वेगळे असते. आई-वडील, बहिण- भाऊ,आजी- आजोबा, नातेवाईक यांचे प्रेम मोजता न येणारे आहे. पतीचे प्रेम म्हणजे जणू काही पत्नीला आभाळ ठेंगणे होते असेच म्हणावे लागेल. नवरा बायको आनंदी तर कुटुंब सुखी असते. आपण जे पेरतो ते उगवते असे म्हणतात. प्रेम पेरा, प्रेम उगवेल. प्रेम करा म्हणजे काय, तर समाजात,कुटुंबात,आपल्या मुलाबाळांमध्ये सर्वांना छान प्रेम द्या नक्कीच त्यांच्याकडून तुम्हालाही प्रेम मिळेल..... प्रेमाची ताकद आहे मोठी ताकद नाही बरं ही छोटी... शब्द न बोलता भावना कळती मनामनांची नाती मनात जुळती... प्रेमात असतो विश्वास सारा प्रेमाची भावना अटळ न्यारा... राग, मत्सर सारे दूर पळती प्रेमाने मने एकरूप होती.... प्रेम म्हणजे मायेचा आहे झरा सुख-दुःखाचा तो खरा सहारा.... जग जिंकण्याची नसते घाई प्रेमानेच माणुसकी फुलत जाई... प्रेमाची ज्योत मनात पेटवा नात्यांचा सुगंध सर्वत्र फिरवा... जिथे प्रेमाचा वास असतो तिथेच खरे स्वर्ग नांदतो... वसुधा वैभव नाईक, पुणे मो. नं. 9823582116


Rate this content
Log in