STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

विचार वसुधाचे

विचार वसुधाचे

3 mins
0

*विचार वसुधाचे*

 "मनातला शब्द हा आपल्या विचारांचा पुत्र आहे "असे म्हणतात. आपण जसे विचार करतो तसे आपले शब्द मुखावाटे बाहेर पडतात. विचार ही माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे. जसे विचार असतात तसे आचरण घडते आणि जसे आचरण घडते तसे व्यक्तिमत्त्व घडत जाते. राग,द्वेष,प्रेम, माया, या विचारांच्या वेगवेगळ्या कलाकृती आहेत .म्हणूनच सकारात्मक, संवेदनशील आणि विधायक विचारांची जपणूक करणे ही काळाची गरज आहे. आजच्या धावपळीच्या जगात माणूस अनेक सोयींनी समृद्ध झाला आहे, पण मनाने मात्र अनेकदा रिकामा होत चालला आहे. संवाद कमी होत आहे, नाती दुरावत आहेत आणि स्वार्थाची भिंत उंचावत आहे. अशा वेळी माणुसकी, प्रेम, आपुलकी आणि परस्पर सन्मान यांची आठवण करून देणारे विचार समाजाला नव्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. आजचा वृद्ध आपल्याच घरात सुखी नाही. बघा बऱ्याच घरांमध्ये वृद्धांकडे पाठ फिरवली जाते. त्यांना फक्त आपला थोडासा वेळ हवा असतो. आज काय केलत?काय जेवलात?एवढे जरी आपण विचारले तरी त्यांना समाधान वाटते. पण आजकाल या धावपळीच्या जीवनामध्ये नोकरी करणारे आहेत त्यांचीच नोकरी 12,12 तास होते. त्यातून टेन्शन असते. मग ही मंडळी आपल्या लोकांना खरच वेळ देऊ शकत नाहीत. मग एकमेकांशी संवाद होतच नाहीत. संवाद घडले तर वाद होणार नाहीत. पण आज वेळेअभावी बऱ्याचश्या घरांमध्ये संवाद खुंटत चाललेले आहेत. आई,बाबा दोघेही नोकरीला जातात. दोघांनाही घराची जबाबदारी पार पाडावी लागते. घरात आजी -आजोबा असतील तर मुलं जरा फ्री असतात. पण विभक्त कुटुंब असेल तर मुलांना पाळणा घरात ठेवावे लागते. आपण काल-परवाच पाळणा घरात काय होते हे पेपरला वाचलेले आहे. इंस्टाला पाहिले आहे.सर्वच पाळणाघर असे असतात असे नाही काही ठिकाणी उत्तम काळजी घेतली जाते आपल्या पाल्याची. मला एकच सांगायचे आहे की आपल्या घरातला संवाद वाढवावा. म्हणजे वाद संपतील. चांगले संवाद घडले तर आपल्या घरातल्या अडचणी आपल्याला समजतील. आपण बाहेर खूप छान बोलतो. पण घरातल्या लोकांशी तेवढा सुसंवाद साधला तर निश्चितच दोन्हीकडे तळमळ बसेल. एक उदा.. माझे सासू आणि सासरे दोघांनाही ऐकायला येत नव्हते. एके दिवशी त्यांचे मित्र मैत्रिणी घरी आले. मी बसण्याची अरेंजमेंट केली. माझ्या उजव्या हाताला ने डाव्या हाताला त्यांची बैठक केली. आणि मी मध्यभागी बसले. सासुबाई सासरे जे म्हणतात ते त्यांच्या मित्र-मैत्रिणींना मी समजावून सांगितले. त्यांच्यात संवाद घडवून आणला. त्यांचा मित्रपरिवार आणि माझे सासूबाई सासरे माझ्यावर जाम खुश झाले कारण मी दोघांमधला संवाद साधण्याचे एक विचार प्रवर्तकाचे काम केले होते. त्यांना तर आनंद झालाच पण मलाही आनंद झाला की आज त्यांच्यासाठी मी काहीतरी करू शकले. अशी ही संवादाची जादू आपल्याला आनंद देते. विचार हे केवळ शब्द नसतात; ते कृतीत उतरले की परिवर्तन घडते. एखादा प्रेमळ शब्द, योग्य वेळी दिलेला आधार, योग्य सल्ला प्रामाणिकपणे केलेले कार्य किंवा समाजासाठी उचललेले एक छोटेसे पाऊलही अनेकांच्या जीवनात आशेचा किरण ठरू शकते. आज वसुधा फाउंडेशन आणि माझी टीम आम्ही अपंग,वृद्ध, अनाथ बालके या संस्थांना भेट देतो तिथे आम्ही खाऊ वाटतो, जेवण देतो, त्यांची करमणूक करतो, गाणी म्हणतो.झाडांची लागवड करतो. जिथे गरज असेल तिथे आणि अशाप्रकारे हे माझे कार्य छान चालू आहे यामुळे मनाला खूप आनंद मिळतो आणि जगात काय चाललंय हे कळते. त्यांच्या सुखदुःखात थोड्या वेळ तरी सामील होता येते. लेखन ही केवळ अभिव्यक्ती नसून समाजाशी जोडणारी एक सुंदर वाट आहे. शब्दांनी जखमा भरता येतात, मनाला उभारी देता येते आणि नव्या स्वप्नांना बळ देता येते. चला, आपल्या विचारांना सकारात्मकतेची जोड देऊया. स्वतःमध्ये चांगले बदल घडवूया आणि आपल्या कृतीतून इतरांसाठी प्रेरणा बनूया. कारण बदलाची सुरुवात नेहमी एका चांगल्या विचारापासूनच होते. जसे आपले विचार तसे आपण वागत असतो. मनातल्या भावना व्यक्त करत असतो. मनातल्या भावनांना शब्दरूप द्यावे, मनापासून या भावना जागृत ठेवा, समाजामध्ये आनंदाचा ठेवा वाटावा, इतरांच्या भावनांचा आदर करावा.... *वसुधा वैभव नाईक, पुणे* *मो. नं. 9823582116*


Rate this content
Log in