संस्कृती व परंपरा
संस्कृती व परंपरा
*संस्कृती व परंपरा*
हल्ली आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये संस्कृती आणि परंपरा लोप पावताना दिसत आहे.
कोणाची जयंती असो पुण्यतिथी असो अथवा उत्सव असो मोठमोठे स्पीकर लावायचे आणि नादमय गाणी लावून त्या तालावर नाचायचे असे चाललेय सध्या. त्याची पवित्रता दूर राहते. ज्या साठी आपण हे साजरे करतो त्याचे भानच राहत नाही. खरे तर अशा महान पुरुषांचा वसा आपण घेतलेला आहे तो पुढे चालवायचा आहे हे आजच्या पिढीला समजतच नाही. असेच मला म्हणाले वाटते.
उदा :- डॉक्टर आंबेडकरांनी एवढे छान संविधान लिहून ठेवले आहे त्याची अंमलबजावणी करण्यापेक्षा त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरे करताना स्वतःचे मोठे बॅनर लावायचे आपल्या नावाचे... आपण समाजात किती उंच स्थानावर आहे हे दाखवले जाते. आणि त्यांच्या प्रतिमेपुढे कसेही नाचायचे.. हे योग्य वाटतं नाही.
संस्कृती आणि परंपरा या समाजाच्या ओळखीचा पाया आहे. आपल्या परंपरेवरून आपली ओळख होते. आपण आपले संस्कृती कशी जगतो यावरून आपली ओळख होते.
आपल्या घरातील आजी, आजोबा, आई,वडील कसे वागतात, आपल्या घरातील पारंपारिक वारसा काय आहे हे पाहिले जाते.त्यावरून आपली परीक्षा होते व आपली संस्कृती कशी आहे हे बघितले जाते.
संस्कृती म्हणजे जीवन जगण्याची पद्धत, विचार, कला, भाषा आणि मूल्ये यांचा सुरेख संगम होय.
परंपरा म्हणजे पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या चालीरीती आणि रूढी होय.
भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध संस्कृती मानली जाते.जी जगात भारी आहे. जागतिक कीर्ती आहे.
आपल्या संस्कृतीत प्रेम, सहकार्य, आदर आणि मानवता यांना महत्त्व दिले जाते.
वडीलधाऱ्यांचा सन्मान करणे ही आपल्या संस्कृतीची खास ओळख आहे.आणि आज तीच पाळली जातं नाही. वृद्धांचा अनादर केला जात आहे. त्यांचा मानपान तर दूर राहिला पण त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही.
सण-उत्सव हे आपल्या परंपरांचे जतन करण्याचे महत्त्वाचे माध्यम आहेत.ती संस्कृती जपा मुलांनो...
दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, होळी असे अनेक सण आपण आनंदाने साजरे करतो. यावेळी आपले सर्व कुटुंब एकत्र येते. आपण आनंद घेतो.
लोककला, लोकगीते आणि लोकनृत्ये ही संस्कृतीची अमूल्य देणगी आहेत. ती पण हल्ली लोप पावताना दिसत आहे.
आपली संस्कृती आपणच जपावी.तरुण पिढीने ही जबाबदारी घ्यावी. आपण चांगले वागून आपण इतरांना चांगल्या वागण्यास प्रवृत्त करावे प्रेरणा द्यावी.
संस्कृती माणसाला चांगले संस्कार देते. ते संस्कार स्वतःमध्ये रुजवावेत. त्या संस्कारांचा स्वतःच्या कृतीतून प्रसार करावा.
परंपरा समाजाला एकत्र बांधून ठेवतात. तो एकोपा, ती माणुसकी,त्या भावना एकमेकांमध्ये गुंफल्या गेल्या पाहिजेत.तरच आपण एकमेकांना माणुसकीत बांधून ठेवू शकतो.
माणसाने माणसाशी माणसासम वागणे... या प्रार्थनेची जपणूक करावी. तसे वागावे.
आधुनिकतेचा स्वीकार करताना परंपरेचे महत्त्व विसरता कामा नये. किंबहुना आधुनिकता आणि परंपरा यांचा सुरेख संगम घालावा. तर आणखी सुधारणा होईल.
संस्कृतीमुळे आपली राष्ट्रीय ओळख टिकून राहते. राष्ट्रीय एकात्मता जपली जाते.
प्रत्येक पिढीने संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे.
चांगल्या परंपरा समाजाला योग्य दिशा देतात. त्या परंपरा नवीन पिढीने आत्मसात कराव्यात व आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्याला नवीन टच द्यावा. हा संगम झाला तर खूप काही नव चेतना पाहायला मिळतील.
संस्कृती ही समाजाच्या प्रगतीची प्रेरणाशक्ती आहे.
परंपरा आपल्या इतिहासाची आठवण करून देतात.
संस्कृती आणि परंपरा यांचा समतोल राखणे गरजेचे आहे.
त्यामुळे समाजात ऐक्य, बंधुभाव आणि सद्भावना वाढते.
म्हणूनच संस्कृती व परंपरा या आपल्या जीवनातील अमूल्य ठेवा आहे...
संस्कृती ही राष्ट्राची अनमोल देणगी आहे
परंपरेच्या धाग्यांनी ती सुंदर विणलेली आहे...
रीतीरिवाज, सण-उत्सव यांची गोड साथ असते
आपल्या जीवनाची उज्ज्वल वाट असते...
वडिलधाऱ्यांचा मान, गुरूंचा आदर करावा
यातूनच मिळतो संस्कारांचा सुंदर ठेवा...
दिवाळी, दसरा, गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा
परंपरांतून मिळणारा एकतेचा सुगंध पसरावा...
लोककला, लोकगीत आणि नृत्यांची शान
यांनीच वाढतो आपल्या संस्कृतीचा जगात मान...
भारतीय संस्कृती जगभर प्रसिद्ध झाली
माणुसकीची शिकवण संस्कृतीने सर्वांना दिली....
परंपरा जपताना नवे विचारही रुजवूया
प्रगतीच्या वाटेवर संस्कृती उत्तम जपूया...
प्रेम, दया, करुणा यांचे बीज पेरूया
सदाचाराच्या मार्गाने पुढे पुढे जाऊया...
संस्कृती आणि परंपरा हा आपला आहे ठेवा
माणुसकी जपून मिळवूया समाजाचा गोड मेवा...
या वारसाचा सदैव अभिमान बाळगूया
भारतीय संस्कृतीचा गौरव जगभर पसरवूया....
✍️ वसुधा वैभव नाईक, पुणे🖊️
