STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

मुलांशी मैत्री

मुलांशी मैत्री

4 mins
0

*मुलांशी मैत्री*

 तुम्ही म्हणाल आता एवढेच राहिले होते "मुलांशी मैत्री" करायचे. पण खरच सांगते आपल्या मुलांशी आपण मैत्रीपूर्ण वातावरणात राहिले पाहिजे. तर आपली मुलं आपल्याला त्यांच्या मनातील सर्व सांगतात. मुलांना खूप शिस्तीने वाढवले तर मुलं बिघडण्याची शक्यता असते. कारण अतिशय शिस्त मुलांना आपल्या मनातलं पालकांना सांगू शकत नाहीत. मग मनातले मनातच राहते. हे विचार एक तर मनात दबले जातात नाही तर मित्रांपुढे एक्सपोज केले जातात. मग आपल्या मित्रांचा सल्ला चांगला,वाईट काय येईल त्याच्यावर पुढे मूल वागत असते घरामध्ये. घरातून आई-वडील शिस्त कशासाठी लावतात हे मुलांना कळत नाही. मुलांना वाटते आपले पालक आपले आई-वडील आपल्या दुश्मनच आहेत. आपल्या चांगल्या भवितव्यासाठीच आपल्याला थोडी शिस्त लावत आहेत. पण मुलांना हे न समजल्यामुळे बऱ्याच अंशी तिथे आई किंवा वडिलांबरोबर अबोला धरला जातो आपल्या मनातले विचार एक्सपोज होत नाहीत आणि मग तिथे मूल एकाकी तरी होतं नाही तर मुलाच्या मनामध्ये आई-वडिलांबद्दल तिढा निर्माण होतो. मित्रांमध्ये मन रमवले जाते. हे सर्व टाळण्यासाठी मैत्रीपूर्ण वातावरणात आपले मूल वाढले पाहिजे. हल्ली बऱ्याच घरांमध्ये नव्हे तर शंभर टक्के घरामध्ये आपल्या मुलांशी मैत्री पूर्व वातावरणामध्ये राहिले जाते. पूर्वीच्या काळी जरा शिस्त होती. मुली तर वडिलांशी जास्त बोलतच नव्हत्या. पण आता तसं नाहीये आता आई पेक्षा वडील जास्त जवळचे मुलींना. आणि मुलगे त्यांच्या मनातला आईला सांगतात. व बऱ्याचदा आई आपल्या मुलाच्या चुकीवर पांघरून घालते आणि मग कोणतीही गोष्ट वडिलांपर्यंत न पोचल्याने बऱ्याचदा मुल वाईट मार्गाला लागण्याची शक्यता असते वेळीच आईने कान टोचले तर आपलं मूल कधीही वाया जाणार नाही हे 100% खात्री आहे. इथे नुसतं पालकच नव्हे तर शिक्षक,समाज हे सुद्धा येतात बऱ्याचदा शिक्षकांना काही गोष्टी मुलं सांगायला गेले तर शिक्षक हे "आता नको सांगूस नंतर सांग नंतर विचार." असे म्हणून त्या मुलाला टाळले जाते.मग मुलगा कशाला परत सांगायला जायला शिक्षकांना. त्यामुळे त्याचे विचार तिथेच खुंटले जातात. तसेच समाजातला एखादा जबाबदार व्यक्तीला त्या मुलाने काही सांगायला गेले तर त्यानेही जर ऐकून घेतले नाही तर त्याची अवस्था तशीच राहते.तो अबोल होतो.त्यासाठी.... मुलांशी मैत्री करणे ही प्रत्येक पालक, शिक्षक आणि समाजातील मोठ्या व्यक्तीची महत्त्वाची जबाबदारी आहे. मूल समजून घेतलं पाहिजे. मुलांचे मन निरागस, कोवळे आणि संवेदनशील असते. त्यांच्याशी प्रेमाने वागले, त्यांचे विचार ऐकून घेतले तर ती मुलं मनमोकळेपणाने व्यक्त होतात. मुलांशी मैत्री म्हणजे त्यांच्यावर अधिकार गाजवणे नव्हे, तर त्यांना समजून घेणे होय. जरा शिस्त शिथिल करणे हे होय. मुलांना संस्कारात वाढवा शिस्तीत वाढवाच वाढवा पण त्याचा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष द्या. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा मुलांना, पालकांना संवादासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे.त्यांच्याशी बोलणे गरजेचे आहे.मुलांशी केलेल्या मैत्रीपूर्ण संवादातून अनेक गोष्टी मुलांच्या मनातील उलगडत जातात. आणि आपण जर मुलांना योग्य मार्गदर्शन केले तर आपले मूल वाया जाणार नाही. त्यांच्या आवडी-निवडी, समस्या आणि स्वप्ने जाणून घेणे आवश्यक आहे. मुलांच्या छोट्या-छोट्या यशाचे कौतुक केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. चूक झाली तर रागावण्याऐवजी समजावून सांगितले पाहिजे. मुलांशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण झाले की ते भीती न बाळगता आपल्या भावना व्यक्त करतात. अशा नात्यात विश्वास, प्रेम आणि आपुलकी असते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्याशी मैत्री करणे ही काळाची गरज आहे. प्रेमळ शब्द, थोडा वेळ आणि जिव्हाळ्याचा संवाद यामुळे मुलांचे बालपण अधिक आनंदी आणि सुंदर बनते. हा स्वतःचा अनुभव आहे. गेले 36 वर्ष शैक्षणिक कार्य केलेले आहे. यात अनेक पिढ्या घडवलेल्या आहेत. आजही बरीचशी मुलं माझ्या घरी येतात त्यांना हवे ते तर मार्गदर्शन घेतात. आणि छान मोठ्या पदावर मुलं गेलेले आहेत त्यामुळे मनाला समाधान मिळते की आपण 36 वर्ष केलेल्या सेवेमध्ये आपण उत्तम पिढ्या घडवू शकलो.हा अभिमान आहे. आणि माझी स्वतःची मुलं सुद्धा खूप छान घडली आहेत. समाज म्हटलं तर समाजाचे प्रेम हे माझ्यावर खूप आहे. योगेश,गौरव, सायली, मयुरी, तुषार, घडे सर, बाबर सर,खरळकर सर...किती नावे घेऊ आणि माझे वसुधा समूहावरील आपण सर्व... माझ्यावर भरभरून प्रेम करता. हे प्रेम सहजासहजी मिळत नसते. आपण काहीतरी दिल्याशिवाय आपल्याला समाज काही देत नाही. पैसा महत्वाचा नसतो माया,प्रेम जिव्हाळा आणि आपली आत्मिक, आंतरिक ओढ, त्याचबरोबर शब्दांची माया खूप महत्त्वाची असते. माणूस शब्दांच्या फेकी वरून सहज समजतो. मला इतकेच म्हणायचे की आपले मूल घडवताना बोधकथा, संस्कार कथा, मूल्यवर्धित गोष्टी आणि प्रेमळ शिस्त याचा वापर करून आपण मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आपली मुलं घडवूया.मग समाजातील मुलं किंवा आपली मुलं असू दे किंवा शैक्षणिक कार्य करताना आपल्या वर्गातील मुलं असू देत या सर्वांचे मन जपा.सर्वांशी प्रेमाने बोला.सर्वांना मायेन जवळ घ्या. तर निश्चितच आपल्या पिढ्या खूप छान घडतील. आपल्याला देखील प्रेम, माया आणि जिव्हाळा मिळेल. मुलांशी जुळवू या प्रेमाची नाती, हसत-खेळत रंगवू आनंदाच्या वाती... त्यांच्या स्वप्नांना देऊ मनापासून उभारी विश्वासाच्या पंखांनी घेऊ दे त्यांना भरारी... ऐकू या मनातील छोट्या गोष्टी सांगूया त्यांना संस्कारक्षम गुजगोष्टी... मैत्री, माया, आपुलकीचा ठेवा मिळेल त्यांना जीवनातील मेवा.... मुलांच्या मनात प्रेमाची फुले फुलवावीत मैत्रीच्या धाग्यांनी नातती सुंदर गुंफावीत... ऐका त्यांचे मन, द्या विश्वासाचा हात उंचावेल त्यांचे जीवन जनमाणसात... ✍️ वसुधा नाईक, पुणे मो. नं. 98235832216


Rate this content
Log in