STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

जीवाशी खेळणे बंद करा रे मुलांनो...

जीवाशी खेळणे बंद करा रे मुलांनो...

5 mins
0

*जीवाशी खेळणे बंद करा रे मुलांनो...*

 हा विषय घेण्यामागे एक कारण आहे. आज दिनांक १० जून चा पेपर उघडला आणि त्यात नदीत पोहायला गेलेल्या पाच मित्रांना जलसमाधी ही बातमी वाचली. चंद्रपूर जिल्ह्यातील हे बातमी वाचली आणि मन खूप बेचैन झाले. आजकाल नदीपत्रात पोहायला गेलेले मुलं किंवा माणसं लहान मुलं, त्याचबरोबर विहिरीत पोहायला गेलेली माणसं, समुद्रात मजा करायला गेलेली माणसं यांना अचानक जलसमाधी मिळाली अशा बातम्या वाचल्या की मन खूप बेचैन होते.सुन्न होते. मुळात हे पाण्याची खेळणे सर्वांनी बंद केले पाहिजे. पाण्याशी खेळणे म्हणजे जीवाशी खेळणे होय. तुम्ही गुडघाभर पाण्यात उतरा पण अगदी कमरेच्या वर पाण्यात जाण्याचा काय मतलब असतो.काय होते बरं, काय मिळते यातून.... तुम्हाला पाण्याची खोली समजत नाही. पाण्या खाली जमिनीमध्ये पाय रुतले जातात. पायाखालची वाळू घसरली जाते. तोल सावरता येत नाही. पाणी किती खोल आहे याचा अंदाज येत नाही. उगाच डेअरिंग करत बसायचे.याला मुळी अर्थ नाही. यामुळे काय होतंय घरातले एकुलता एक मुल जीवनीशी जात आहे. आई वडील पाहणार कोणाकडे?? मुलांच्या हट्टा पायी आई वडील त्यांना परवानगी देतात. मुळात त्यांच्या जाण्याला आई-वडिलांनी देखील परवानगी देऊ नये. अथवा स्वतः त्यांच्याबरोबर जावे. आपला मुलगा कितीही पट्टीचा पोहणारा असेल तरीसुद्धा पाण्याचा अंदाज मात्र लागत नाही हे शंभर टक्के खरे आहे. त्यासाठी पाण्याशी खेळ अजिबात नको. आजची ही बातमी वाचून बऱ्याचश्या मागच्या घटना माझ्या बाबतीतील नजरेसमोर सर्रकन आल्या. मी स्वतः फलटण या शहरी शिकलेली आहे. मलठण हा त्याचाच एक भाग. शाळा सकाळी सातची असायची. घर लांब त्यामुळे घरातनं आम्हाला सकाळी सहा वाजता घराबाहेर पडावे लागायचं. मध्ये एक नदी यायची. भर पावसाळ्यामध्ये नदीला पूर आलेला असायचा. माझे वडील आम्हा दोघा भावांना हाताशी धरून नदी पार करून सोडवायचे. नदीवर फुल होता पण त्या पुलावरून जायचं म्हटलं तर आम्हाला घरातून जवळ दोन तास आधी बाहेर पडावं लागायचा आणि खूप अंधारात जावे लागत असे. त्यामुळे बरेचदा आम्ही नदी पार करून जायचा पर्याय निवडत असे. पावसाळ्यामध्ये नदीला एवढा पुर आलेला असायचा की आमच्या कमरेला पाणी लागायचे. आणि खाली झाडांचे छोटे-मोठे रोप वाहून आलेले, कधी सापांचे पिल्लं असायची कधी साप असायचा नशीब ते विषारी नसायचे..त्यामुळे नदीत न चालताना खूप काळजी घेऊन चालत जावे लागे. अक्षरशः वडील माझ्या छोट्या भावाला खांद्यावर यायचंय माझे दप्तर एका खांद्याला आणि माझा हात घट्ट धरून आम्ही नदी पार करायचो. नदी पार करण्यासाठी अंदाजे दहा मिनिटे लागायचे. पण पायाखाली काय येईल हे माहीत नसायचे. पावलं खूप काळजीपूर्वक टाकायला लागायची. या सर्वांमुळे पाण्याबद्दल माझ्या मनात एक भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी बघितलं की उगाचच मन खचते आणि असं वाटतं की आपल्याला चक्कर येत आहे. त्यामुळे समुद्रावर जाताना आज मी माझी मुलं, नातवंड यांना स्वतः घेऊन जाते माझ्या नजरेसमोर खेळा काय खेळायचे ते?खूप खोलवर जाऊ देत नाही समुद्राशी मस्ती करू देत नाही आणि नदीचा प्रश्नच येत नाही कारण त्याचा अंदाज मला अजिबात नाही. आता हल्ली माझ्या मुली 39 च्या झालेल्या आहेत. सुनबाई पण मला आलेली आहे. पण त्यांनी समुद्राचे नाव काढले की माझ्या मनात चर्र होते. कायम त्यांना सूचना असतात. शेवटी मुलं चिडतात माझ्यावरती "आई काय ग तुझं हे?आम्ही जरा आनंद घेतो ना!" माझे म्हणणे असते आनंद घ्या!खोलवर जाऊ नका! त्याच्याशी खेळू नका. अनमोल जीव आहे त्याचे मोल गमवू नका. आई-वडिलांच्या जीवाला घोर लावू नका. शेवटी जन्म आणि मरण वरच्याच्या हाती आहे पण आपण का स्वतः ओढवून घ्यायचे.. असे माझे म्हणणे आहे. फक्त पाण्याच्याच बाबतीत हे असे आहे असे नाही,पण सेल्फीच्या नादात विविध पॉईंटवर जायचे पॉईंटच्या अगदी जवळ जाऊन खाली दरी असेल तरी त्याचा अंदाज न घेता मुल सेल्फी काढतात. त्या नादात आपला जीव गमावून बसतात. अशी कितीतरी उदाहरण आपण वाचलेले आहेत TV वर पाहिलेली आहेत. मी स्वतः पाचगणीला टेबल लँड वरती दोन मुलींना वाचवलेले आहे. मुली सेल्फी काढण्यात एवढ्या गुंग होत्या की त्या कुठपर्यंत पोहोचल्यात हेच त्यांना कळत नव्हतं आणि त्यांच्या टॉपमध्ये वारं शिरलं होतं मला ते बघून माझा जीव खालीवर होत होता. अक्षरश: मी त्यांना मागे खेचलं. ओरडले असते तर त्या आणखी बावरल्या असत्या.. आणि वेगळेच काही घडले असते. पण आपल्यामुळे दोन मुलींचा जीव वाचला याचा आनंद मला खूप झाला आणि मुली अक्षरशः माझ्या पाया पडल्या आणि म्हणाल्या तुम्ही वाचवलं नसतं तर आज आमचं वेगळं काहीतरी झालं असतं. असेच आजकाल अनेक मुले आणि तरुण थराराच्या नादात स्वतःच्या जीवाशी खेळताना दिसतात.त्यात 40,50,60 च्या व्यक्ती पण काही मागे नाहीत. मोबाईलवर व्हिडिओ बनवण्यासाठी धोकादायक स्टंट करणे, वेगाने वाहन चालवणे किंवा नियमांकडे दुर्लक्ष करणे ही चिंतेची बाब आहे. क्षणिक प्रसिद्धीसाठी आयुष्य धोक्यात घालणे योग्य नाही. जीवन हे अनमोल देणं आहे आणि त्याची काळजी घेणं प्रत्येकाची जबाबदारी आहे. आई-वडिलांची स्वप्नं, कुटुंबाचं प्रेम आणि समाजाची अपेक्षा यांचा विचार केला पाहिजे. एक छोटी चूक आयुष्यभराची वेदना देऊ शकते. आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाचा आधार जातो दुसरी गोष्ट म्हणजे लहानपणापासून आपल्याला वाढवलेल्या आई-वडिलांना किती दुःख होते हे तुम्हाला कळणार नाही.याचे कारण काय माहित आहे का??आपण जगातच नसतो ना!! आपली सुरक्षितता आपणच घ्यायची असते. कोणतेही स्टंट करण्यापूर्वी किती खोलात आहोत हे पहावे आणि आपण जीवनाशी खेळत नाही ना याकडे दुर्लक्ष मुळीच करू नये. मित्रांबरोबर गेला असाल तर हसी मजाक मध्ये सुद्धा एकमेकांशी ढकलाढकली करायची नाही. कोणी आपल्याला कमकुवत म्हटलं तरी चालेल. स्वतःची काळजी घेणं हा शहाणपणाचा मार्ग आहे. तसेच वाहतूक नियम पाळा, धोकादायक आव्हानांपासून दूर राहा. सिग्नल तोडू नका. आपल्या चार चाकी वाहनाचा दरवाजा उघडण्यापूर्वी मागेपुढे बघा कोणी आहे का? परवाच एका व्हीडिओ मधे पाहिले. एक जण कारचा दरवाजा उघडत आहे. मागून एक टू व्हिलर आली दरवाजाचा धक्का लागून गाडीवरील कंट्रोल गेला. समोरून येणाऱ्या टू व्हिलरची धडक झाली. अक्षरश: दोघे फेकले गेले... असे होऊ नये... प्रत्येकाने विशेष काळजी घ्यावी. मैत्रीच्या नावाखाली चुकीच्या गोष्टींना बळी पडू नका.मित्र ओळखायला शिका. स्वतःची किंमत ओळखा आणि जीवनावर प्रेम करा. यश मिळवण्यासाठी मेहनत करा, धोक्याचा मार्ग निवडू नका.जीवन दिले ते सन्मानाने जगा. परत हे जीवन मिळणे शक्य नाही. तुमचं हसू अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवतं. म्हणून स्वतःची काळजी घेणं हीच खरी जबाबदारी आहे. जीवन सुंदर आहे, ते जपणं आपल्याच हातात आहे. म्हणूनच, जीवाशी खेळणे बंद करा रे मुलांनो!..... जीवाशी खेळणे बंद करा रे मुलांनो.. आयुष्याच्या वाटेवर जपा जीवन आपले मुलांनो... क्षणिक थरारासाठी धावू नका कोणी आईच्या डोळ्यांतील स्वप्नांना जीवनी उतरवा मुलांनो... जीवनाची बाग आहे फुलांनी भरलेली चेतना जागवा त्यामध्ये लाडक्या मुलांनो... हास्य तुमचे अनमोल ते दिसू दया चेहऱ्यावर काळजी घ्या आई-वडिलांची मुलांनो.... तुमच्यामुळे उजळते घरातील प्रीत ज्योत स्वप्नांना द्या पंख गगनाला मिठी मारा मुलांनो... सुरक्षिततेची कास कधीही सोडू नका वसुधावर जन्म घेतला आहे तर त्याचे ऋण फेडा मुलांनो.... जीवन जपा मुलांनो, जीवन जपा....हाच खरा ध्यास महान... 🌹🖊️ वसुधा वैभव नाईक, पुणे वसुधा फाउंडेशन संस्थापिता आणि अध्यक्ष. युवा क्रांती फाउंडेशन राष्ट्रीय जेष्ठ सल्लागार....


Rate this content
Log in