STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

ओव्हर कॉन्फिडन्स

ओव्हर कॉन्फिडन्स

2 mins
0

*ओव्हर कॉन्फिडन्स*

 *(अति फाजील आत्मविश्वास)* आत्मविश्वास हा यशाचा पाया असतो हे आपल्याला डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेले आहे. इयत्ता चौथीला धड्यांमध्ये हे वाक्य आहे. आपण स्वतः ते अनुभवत असतो.पण जेव्हा तो आत्मविश्वास मर्यादा ओलांडतो तेव्हा तो ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजेच अति फाजील आत्मविश्वास बनतो. आत्मविश्वास आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतो, तर अतिआत्मविश्वास आपल्याला आपल्या चुका दिसू देत नाही. अतिआत्मविश्वासामुळे माणूस इतरांचे मत ऐकणे टाळतो. त्याला स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याची सवय झालेली असते. बऱ्याचदा चुकीचे निर्णय सुद्धा घेतले जातात. त्याला वाटते की त्याचेच निर्णय नेहमी योग्य आहेत. अशा वेळी चुका होण्याची दाट शक्यता वाढते. अनेकदा पुरेशी तयारी न करता कामाला सुरुवात केली जाते. त्यामुळे अपेक्षित यश मिळत नाही. मग नशिबाला दोष दिला जातो. पण उत्तम तयारी केली तर निदान आपला आत्मविश्वास वाढीस लागतो. ज्ञान, अनुभव आणि कौशल्य असणे चांगले, पण त्याबरोबर नम्रताही तितकीच महत्त्वाची आहे. यश मिळाले की पाय जमिनीवर ठेवणे आवश्यक असते. इतरांच्या सल्ल्याचा आदर करणे गरजेचे आहे. आत्मविश्वास आणि नम्रता यांचा समतोल साधल्यास प्रगतीचा मार्ग सुखकर होतो. अति फाजील आत्मविश्वास टाळून वास्तवाचे भान ठेवले तर यश अधिक टिकाऊ ठरते. म्हणूनच आत्मविश्वास असावा, पण तो विवेकाच्या मर्यादेत असावा. उदा :- हल्ली ड्रायव्हिंग मुलांचे रश झाले आहे. आई वडील सांगतात गाडी हळू चालव. पण मुलांना असे वाटते आपण विमान चालवतोय. ही तरुण मंडळी ड्रिंक अँड ड्राईव्ह करतात. मग होतात एक्सीडेंट. नाहक जीवानिशी जातात. याला त्यांचा फाजील आत्मविश्वास असेच म्हणावे लागेल. नुकत्यात अशा तीन बातम्या आपण टीव्हीवर पाहिल्या आहेत आणि पेपरला वाचलेल्या आहेत. खूप वाईट वाटते अशा घटना ऐकल्यानंतर. मुलांनी फाजील आत्मविश्वासा ऐवजी आत्मविश्वास जोपासावा आई-वडिलांचे मोठ्यांचे ऐकावे. त्यांच्या अनुभवचा हात आपल्या माथ्यावर असतो. आत्मविश्वास देई बळ यशाची उघडते दार अतिआत्मविश्वास मात्र उघडतो अपयशी द्वार... "मलाच सारे कळते" असा नको अभिमान नम्रतेच्या संगतीने उंचावतो खरा मान.... यश आले जीवनात ठेव पाय जमिनीवर अनुभवांचे बोल ऐक राहशील समाजात उंचीवर.. विवेकाची साथ घेऊन कर प्रत्येक प्रयत्न खास तेव्हाच यश मिळेल खरे टाळून फाजील आत्मविश्वास.. ✍️ वसुधा 🖊️


Rate this content
Log in