महिलांना रिस्पेक्ट द्यावा पुरुषांचा अनादर नको*
महिलांना रिस्पेक्ट द्यावा पुरुषांचा अनादर नको*
*महिलांना रिस्पेक्ट द्यावा पुरुषांचा अनादर नको* आजच्या या समाजात स्त्री-पुरुष समानतेबद्दल खूप चर्चा होते. पण तेवढा सन्मान केला जात नाही. आणि महिलांना महत्व दिले तर पुरुषांचा अनादर करायला नको किंवा चुकून व्हायला नको. महिलांना सन्मान मिळावा, त्यांचे हक्क जपले जावेत, त्यांच्या स्वाभिमानाचा आदर व्हावा हे नक्कीच आवश्यक आहे. पण या प्रवासात पुरुषांचा अनादर होऊ नये, ही गोष्टही तितकीच महत्त्वाची आहे. महिला सशक्तीकरण म्हणजे पुरुषांना कमी लेखणे नाही. खऱ्या अर्थाने सशक्तीकरण म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि योग्य ते हक्क मिळवणे. जर आपण एका बाजूचा सन्मान वाढवताना दुसऱ्या बाजूचा अपमान करत असू, तर ती समानता नाही, तर असंतुलन आहे.म्हणून एकमेकांना महत्व देणे महत्वाचे आहे. पुरुषाने स्त्रीला आणि स्त्रीने पुरुषाला मानाने वागवले पाहिजे. प्रत्येक पुरुष वाईट नसतो, तसेच प्रत्येक स्त्रीही परिपूर्ण नसते. आणि वाईट नसते दोघांमध्येही चांगल्या-वाईट गुणांचा समावेश असतो. त्यामुळे “सर्व पुरुष चुकीचे आहेत” किंवा “स्त्रियांचाच नेहमी दोष असतो” असे एकतर्फी मत बनवणे चुकीचे आहे. आपल्याला वर्तनावरून त्याचा सन्मान करायला हवा, लिंगावरून नाही.त्याच्या कर्तव्याचा सन्मान होणे गरजेचे आहे. मग ती लहान असुदे किंवा वृद्ध असो. "ती " चा सन्मान होणे, कार्याचा सन्मान होणे फार मनाचे असते. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप असते. प्रेरणा मिळते, आनंद होतो. घर, समाज आणि नोकरीचे ठिकाण या सर्व ठिकाणी स्त्री-पुरुष एकमेकांबरोबर कामं करतात . घरात स्त्री प्रेम, माया आणि समजूतदारपणा दाखवते.तर पुरुष जबाबदारी आणि कुटुंबाला मानसिक आधार देतो.ही पारंपरिक कल्पना असली तरी आज दोघेही सर्व भूमिका निभावू शकतात. म्हणूनच एकमेकांचा आदर आणि सहकार्य हेच नात्यांचे खरे बळ आहे. आज गरज आहे ती “मी मोठा की तू मोठी” या वादातून बाहेर पडण्याची.कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही ही भूमिका हवी.त्याऐवजी “आपण दोघे मिळून मोठे होऊया ” हा दृष्टिकोन स्वीकारावा. तसे वागावे.सन्मान हा नेहमी द्विपक्षीय असतो.तो दिला आणि घेतला जातो. Give and Take Respect.. असे आपण नेहमीच म्हणतो. समाजाची खरी प्रगती तेव्हाच होईल, जेव्हा महिला सन्मानित होतील आणि पुरुषाना आदराने वागवले जाईल . कारण समानता म्हणजे स्पर्धा नव्हे, तर दोघांचे अस्तित्व आहे. एकमेकांना मदत करणे मग ती घरात असेल तरी करावी. बाईला तेवढाच आधार मिळतो. एकमेकांचा सन्मान करावा समाज सुधारणा करावी पहिले आपल्या घरापासून सुरुवात करावी.... वसुधा वैभव नाईक, पुणे मो. नं. 9823582116 युवा क्रांती संघटना राष्ट्रीय जेष्ठ सल्लागार
