STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

सदाचार

सदाचार

2 mins
0



 सदाचार म्हणजे चांगले विचार, चांगले वर्तन आणि योग्य आचरण होय.आपले विचार पवित्र, शुद्ध असावेत. आपल्या मनात चुकूनही कोणाबद्दल वाईट भावना, विचार यायला नकोत. मनुष्याच्या जीवनाला योग्य दिशा देणारा सदाचार हा एक महत्त्वाचा गुण आहे.तो प्रत्येकात असतो. पण आपण आपल्यातील ज्या गुणांना जास्त महत्व देतो. तोच गुण तुमच्या स्वभावात दिसून येतो. भोळेपणा, भित्रट, धाडसी, नम्र, प्रेमळ, दयाळू, कनवाळू अशा अनेक मानवी स्वभावातून आपण जातो... मग तेच विचार आपल्या स्वभावातून दिसतात. आणि मानवी मन, समाजातील स्थान जिंकण्यासाठी सदाचारी असणे फार महत्वाचे आहे. सत्य बोलणे, प्रामाणिक राहणे, मोठ्यांचा आदर करणे आणि इतरांना मदत करणे हे सदाचाराचे भाग आहेत. सदाचारामुळे माणसाचे व्यक्तिमत्त्व सुंदर आणि प्रभावी बनते.चेहरा टवटवीत दिसतो. प्रसन्न दिसतो. सदाचारी व्यक्ती समाजात सन्मान मिळवतेच पण खूप लोकांच्या मनातही स्थान मिळवते. त्यांच्या हृदयावर राज्य करू शकते. चांगल्या वर्तनामुळे माणसांमध्ये प्रेम आणि विश्वास निर्माण होतो.विश्वासास तडा जावू देऊ नये. सदाचार हा केवळ शब्दांत नसून कृतीत दिसला पाहिजे. आई-वडील, शिक्षक आणि संस्कार यांमधून सदाचाराची शिकवण मिळते. वाईट सवयींपासून दूर राहणे हेही सदाचाराचे लक्षण आहे. सदाचारामुळे समाजात शांतता आणि सौदर्य टिकून राहते. विद्यार्थी जीवनात सदाचाराला विशेष महत्त्व असते.तिथूनच तो संस्कारक्षम गोष्टी शिकतो. त्या आपल्यात रुजवतो. मोठा झाला की त्याचा समाजासाठी, कुटुंबासाठी वापर करतो. प्रामाणिकपणा आणि शिस्त यामुळे यशाचा मार्ग सोपा होतो. सदाचार असलेल्या व्यक्ती संकटातही योग्य मार्ग निवडतात.डोके शांत राहते. प्रत्येकाने आपल्या जीवनात सदाचाराचा स्वीकार केला पाहिजे. सदाचार, नम्रता हीच खऱ्या अर्थाने माणसाची खरी ओळख आहे. पण हल्ली खूप काही घटना दिसत आहेत. घडत आहेत.हे विसरून चालणार नाही. अशा लोकांच्या नादी न लागणे सर्वोत्तम पर्याय आहे. कुणी वाद घालायला लागले तर sorry बोलून शांत रहावे. समोरचा आपोआप शांत होतो. त्याच्या रागावर त्याचा कंट्रोल नाही पण आपल्या रागावर आपला कंट्रोल निश्चितच हवा... सदाचार संकल्प संकल्पना दे जगी चांगले तेच आमच्या मना दे... उठतात हळुवार सुखदुःख लहरी तयार जाणाऱ्या तूच संवेदन दे... मुलांना मुलींना कळ्यांना फुलांना झुलु दे फुलू दे नवी चेतना दे जगी चांगले तेच आमच्या मना दे... कधी मागतो मी फुलांचीच गावे सुगंधा आता भिजवून दे वेदना दे जगी सांगली तेच आमच्या मना दे सदाचार संकल्प संकल्पना दे.... वसुधा नाईक, पुणे मो. नं. 9823582116


Rate this content
Log in