मोबाईल आणि जीवन प्रवास
मोबाईल आणि जीवन प्रवास
*मोबाईल आणि जीवन प्रवास*
मोबाईलचे कॉपी-पेस्ट डिलीट आणि आपले जीवन जमीन असमानचा फरक आहे.
एका बोटाने व्हाट्सअप जीवन चढ - उतार होते.
आणि प्रत्यक्ष जीवन सारिपट बापरे!! अनेक सुख दुःख milestone पार करून जीवन निभावून नेणे, यश संपादन करणे कठीण असते. एका बोटावर क्लिक नाही करता येत.
मोबाईलमध्ये एखादा मजकूर कॉपी केला की तो पेस्ट करता येतो, चुकून काही लिहिले तर डिलीट करता येते. पण जीवनात असे नसते.आनंद आणि संकट यांचा सामना करूनच पुढे जावे लागते. आनंदात हुरळून जावू नये. संकटात धीराने घ्यावे. ही जीवनाची गणिते पाळावीच लागतात.
जीवनात बोललेले शब्द परत घेता येत नाहीत, दिलेली जखम सहज पुसता येत नाही. गेलेला वेळ पुन्हा कॉपी-पेस्ट करता येत नाही, आणि गमावलेले क्षण डिलीट करून नव्याने लिहिता येत नाहीत.
म्हणून प्रत्येक शब्द जपून बोलावा,प्रत्येक नातं प्रेमाने सांभाळावे , आणि प्रत्येक क्षण मनापासून जपावा आणि जगवा. कोणाला वाईट वाटेल असे बोलणे टाळावे. नात्यातील दुरावा वेळीच निपटावा.
कारण मोबाईलमध्ये डिलीटचा पर्याय असतो, पण जीवनात फक्त शिकण्याची आणि पुढे जाण्याची संधी असते.नात्यातील जिवन्तपणा हरवला की जीवन निरस होते. मैत्री हा जीवनातील हिरा आहे त्याला सांभाळून ठेवावे. म्हणजे जीवनातील कोरी पाने फिरुनी जगता येतील. आनंद घेता येईल. सर्वांनी मिळून वर्षातून एकदा जरी GTG केले तरी हरवलेले क्षण कॉपी - पेस्ट करता येतील. आणि वाईट क्षण, वेळ डिलिट जरी करता आले नाही तरीसुद्धा विचारांच्या सागरात काही काळाने त्या लुप्त होताना जाणवतात.
मोबाईलमध्ये कॉपी-पेस्ट, डिलीटची असते सोय,
जीवनाच्या पानांवर मात्र नसते अशी कुठलीही रीत न्यारी...
जपावे शब्द, जपावीत नाती जपा प्रत्येक क्षण मनापासून
कारण जीवनात आहेत आपल्याला बरीचशी गोड नातीगोती...
वसुधा 🖊️🍫
